UPSC full form in Marathi | यूपीएससी फुल फॉर्म इन मराठी

नमस्कार मित्रानो आज आपण या लेखात (UPSC full form in Marathi) यूपीएससी फुल फॉर्म काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. सोबत UPSC द्वारे घेतल्या जाणारया परीक्षा, यूपीएससी परीक्षेतील तीन टप्पे तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य कार्ये काय असतात ते समजून घेण्याचा प्रयत्न करू.

भारतात सरकारच्या विविध सरकारी नोकरयामध्ये असंख्य संधी आहेत. त्या मध्ये कोणत्या जॉब ची निवड करावी या मध्ये बरेच तरुण गोंधळून जातात. त्या पैकी बऱ्याच लोकांची निवड हि यूपीएससी असते. तर आम्ही आपल्यासाठी या विशिष्ट आणि मोठ्या परीक्षेसंबंधी तपशीलवार माहिती घेऊन आलो आहोत.

UPSC full form in Marathi:

सर्वप्रथम, UPSC चा फुल फॉर्म काय आहे ते आपण माहित करून घेऊ. UPSC – Union Public Service Commission तसेच मराठी मध्ये केंद्रीय लोक सेवा आयोग होतो. UPSC हा एक आयोग असून त्या द्वारे भारतातील केंद्र सरकारच्या अनेक स्पर्धात्मक परीक्षांसाठी परीक्षा घेण्याचे काम केले जाते. या परीक्षांच्या माध्यमातून विविध प्रतिष्ठित अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जातात. ऑल इंडिया सर्व्हिसेस तसेच ग्रुप A आणि ग्रुप B सर्व्हिस साठी कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यासाठी जबाबदारी UPSC वर देण्यात आली आहे. संघ लोक सेवा आयोग (UPSC) ची स्थापना १ ऑक्टोबर, १९२६ करण्यात आली होती. केंद्रीय भरती प्रक्रियेत ज्या परीक्षा घेण्यात येतात त्यांना सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन म्हणूनही ओळखले जाते.

UPSC द्वारे घेतल्या जाणारया परीक्षा.

१) नागरी सेवा परीक्षा – Civil Services Examination (CSE)

२) अभियांत्रिकी सेवा परीक्षा – Engineering Services Examination (ESE).

३) भारतीय वनीकरण सेवा परीक्षा – Indian Forestry Services Examination (IFoS).

४) केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची परीक्षा – Central Armed Police Forces Examination (CAPF).

५) भारतीय आर्थिक सेवा आणि भारतीय सांख्यिकी सेवा – Indian Economic Service and Indian Statistical Service (IES/ISS).

६) एकत्रित भू-वैज्ञानिक आणि भूगर्भशास्त्रज्ञ परीक्षा – Combined Geo-Scientist and Geologist Examination.

७) एकत्रित वैद्यकीय सेवा – Combined Medical Services (CMS).

८) विशेष वर्ग रेल्वे शिक्षु परीक्षा – Special Class Railway Apprentices Exam (SCRA).

९) सहाय्यक कमांडंट निवडीसाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा. सीआयएसएफ मध्ये – Limited Departmental Competitive Examination for selection of Assistant Commandant. (Executive) in CISF.

१०) केंद्रीय सशस्त्र पोलिस दल – Central Armed Police Force (Assistant Commandant)

यूपीएससी परीक्षा देशातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षा असल्याने या परीक्षांच्या पात्रतेनंतर देण्यात आलेल्या पदांचादेखील खूप सन्मान केला जातो.

वय, शैक्षणिक पात्रता यासारख्या पात्रतेच्या अटी पूर्ण केलेले उमेदवार अशा परीक्षांसाठी अर्ज करू शकतात. सर्वांनी हे देखील लक्षात घेतले पाहिजे की परीक्षा क्रॅक करने हे एक कठीण काम आहे, जेथे प्रयत्नांच्या पराकाष्टा करावी लागते. UPSC च्या अभ्यासक्रमाची हि काठीण्य पातळी लक्षात ठेवून चांगली तयारी केली पाहिजे.

यूपीएससी परीक्षेतील तीन टप्पे:

१) पूर्व परीक्षा

२) मुख्य परीक्षा

३) मुलाखत

केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य कार्ये:

१. विविध सेवांसाठी थेट भरती घेणे.

२. विविध सेवा व पदांच्या भरती संबंधित नियमांची रचना व सुधारणा.

३) वेगवेगळ्या नागरी सेवांशी संबंधित अनुशासनात्मक प्रकरणे.

४) भारतीय राष्ट्रपतींनी आयोगाला संदर्भित केलेल्या कोणत्याही बाबीवर सरकारला माहिती देणे.

आम्ही आशा करतो की UPSC full form in Marathi ही माहिती आपणास उपयुक्त ठरली असेल आणि आपल्याला या UPSC चा फुल फॉर्म पण समजला असेल.

आपण हे पण वाचू शकता …

१) MPSC चा फुल फॉर्म काय आहे ?

२) UPSC syllabus in Marathi PDF.

३) Shivaji Maharaj information in Marathi.

Leave a Comment