MPSC full form in Marathi | mpsc exam age limit, educational and physical qualification

Table

MPSC EXAM – राज्यसेवा परीक्षा

Mpsc full form in marathi – महाराष्ट्र लोकसेवा आयोग Maharashtra Public Service Commission महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतीत येणाऱ्या सेवांसाठी आणि पदांसाठी महाराष्ट्र सरकार Mpsc द्वारे स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचं काम करते. या आयोगाची स्थापना भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३१५ नुसार करण्यात आली आहे.

MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा

MPSC द्वारे महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या विभागात महाराष्ट्र राज्याच्या वैधानिक कक्षेत राहून हि पदे भरली जातात. त्यासाठी राज्याने या आयोगाची स्थापना केली आहे. MPSC द्वारे महाराष्ट्रात उपजिल्हाधिकारी, पोलीस-उपअधीक्षक, तहसीलदार, नायब-तहसीलदार, गट-विकास अधिकारी, मुख्याधिकारी इत्यादी वर्ग-१, ची तसेच वर्ग-२ व वर्ग-३ ची पदे भरली जातात. खालील प्रमाणे काही MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा.

१) राज्य सेवा परीक्षा – MPSC State Services Examination

२) महाराष्ट्र वनसेवा परीक्षा – MPSC Maharashtra Forest Services Examination

३) महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा – MPSC Maharashtra Agricultural Services Examination

४)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा – MPSC Maharashtra Engineering Services Gr-A Examination

५) महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा – MPSC Maharashtra Engineering Services Gr-B Examination

६) दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा – MPSC Civil Judge (Jr Div), Judicial Magistrate (Ist Class) Competitive Exam

७) सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा – MPSC Asstt. Motor Vehicle Inspector Exam

८) सहायक अभियंता (विद्युत) श्रेणी -2, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट-ब – MPSC Assist. Engineer (Electrical) Gr-II, Maharashtra Electrical Engg Services, B

९ ) पोलीस उपनिरीक्षक परीक्षा – MPSC Police Sub-Inspector Examination

१०) विक्रीकर निरीक्षक परीक्षा – MPSC Sales Tax Inspector Examination

११) कर सहायक गट-क परीक्षा – MPSC Tax Assistant Examination

१२) सहायक परीक्षा – MPSC Assistant Examination

१३) लिपिक-टंकलेखक परीक्षा – MPSC Clerk Typist Examination

MPSC द्वारे खालील पदासाठी परीक्षा घेतल्या जातात

उपजिल्हाधिकारी
पोलीस उपाधीक्षक
विक्रीकर आयुक्त
निबंधक सहकारी संस्था
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
सहाय्यक संचालक (महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा)
राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक
तहसीलदार
गटविकास अधिकारी
१०महानगरपालिका उपायुक्त
११सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी
१२नगरपालिका मुख्याधिकारी
१३लेखाधिकारी
१४भुमी अधिक्षक
१५नायब तहसीलदार
MPSC द्वारे भरली जाणारी पदे

MPSC साठी खालील पात्रता आवशक आहे

MPSC वय मर्यादा – Mpsc age limit

MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा साठी वयाची आट घातली गेली आहे. जे उमेदवार या अटी पूर्ण करतील असे उमेदवार MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा साठी बसू शकतील.

१) कमीतकमी १९ वर्ष.

२) जास्तीतजास्त ३८ वर्ष सर्वसाधार उमेदवारांसाठी.

३) मागासवर्गीय उमेदवारांना ४३ वर्ष.

४) माजी सैनिक उमेदवारांना सर्वसाधार गटातून ४३ वर्ष तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४८ वर्ष.

५ खेळाडू उमेदवारांना सर्वसाधार उमेदवारांसाठी व मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्ष वयाची आट ठेवण्यात आली आहे.

६) अपंग उमेदवारांसाठी कमीतकमी १९ ते जास्तीत जास्त ४५ वयाची आट ठेवण्यात आली आहे.

MPSC शैक्षणिक पात्रता -MPSC Educational qualification

एमपीएससी परीक्षांचे शैक्षणिक निकष खालील प्रमाणे

१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पात्रता.

२) एमपीएससी परीक्षेत विविध प्रकारच्या पोस्ट असतात त्याप्रमाणे पात्रतेचे विशिष्ट त्या त्या पोस्ट नुसार वेगवेगळे असतात. (शैक्षणिक पात्रता किंवा शारीरिक तंदुरुस्ती)

३) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आदेशानुसार काही पदांवर इच्छुकांना विषय-विशिष्ट कौशल्य असणे आवश्यक आहे.

MPSC शारीरिक पात्रता – MPSC Physical qualification

पोलिस अधीक्षक किंवा परिवहन खात्याशी संबंधित पदांसाठी विशिष्ट शारीरिक पात्रतेचे निकष आहेत.

डीवायएसपी पदासाठी किमान उंची पुरुष उमेदवारांसाठी 165 सेमी आणि महिला उमेदवारांसाठी 157 सेमी आहे. MPSC full form in Marathi हा लेख कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा.

हे पण वाचा...

१) UPSC अभ्यासक्रम.

२) MBA म्हणजे काय? एमबीए कसे करावे?

Leave a Comment