Portfolio meaning in Marathi | पोर्टफोलियो म्हणजे काय?

नमस्कार मित्रानो, आज आपण बघणार आहोत पोर्टफोलिओ म्हणजे काय? अर्थात Portfolio meaning in marathi. वित्तीय मालमत्ता किंवा गुंतवणूकीच्या साधनांद्वारे संग्रहित जी मालमत्ता एखाद्या व्यक्ती, वित्तीय संस्था किंवा गुंतवणूक फर्मद्वारे स्वता जवळ ठेवली जाते तिला पोर्टफोलियो असे म्हणतात. फायदेशीर पोर्टफोलिओ विकसित करण्यासाठी, त्यातील मूलभूत तत्त्वे आणि त्यास प्रभावित करणारया घटकांशी परिचित होणे आवश्यक आहे.

Portfolio meaning in marathi:

पोर्टफोलिओ म्हणजे काय?

पोर्टफोलिओच्या व्याख्येनुसार, हे गुंतवणूकदारांच्या मालकीच्या मालमत्तांच्या विस्तृत श्रेणीचे संग्रह असतात. असे म्हटले जाते की वित्तीय मालमत्तेचा संग्रह सोने, शेअर, विवध फंड, अस्थिर मालमत्ता, रोख समकक्ष, बॉन्ड्स इ. पासून मौल्यवान वस्तू मध्ये केले जाऊ शकते. मालमत्ता किंवा भांडवलाची मूळ किंमत याची खात्री करुन घेताना व्यक्ती आपले पैसे अशा मालमत्तेत ठेवतात. ज्यानुसार मालमत्तेचे मूल्य वेळेनुसार वाढत जाते.

गुंतवणूकीमध्ये व्यक्ती एकतर त्यांचे पोर्टफोलिओ स्वता व्यवस्थापित करू शकतात किंवा त्यासाठी व्यावसायिक आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकतात. आर्थिक तज्ञांच्या मते, पोर्टफोलिओ व्यवस्थापन करतांनी विविधता संकल्पना महत्वाच्या असतात. ते आज आपण बघणार आहोत.

येथे क्लिक करून आपण शेअर मार्केट चे खाते उघडू शकता.

पोर्टफोलिओचे घटक

पोर्टफोलिओ साठी काही घटक महत्वाचे असतात ते खालील प्रमाणे-

1) स्टॉक किवा समभाग

स्टॉक किवा समभाग हे गुंतवणूकदारांची त्या कंपनीत असलेली मालकी दर्शवतात. विशेष म्हणजे त्या कंपनीत त्या गुंतवणूक दाराची मालकीची टक्केवारी हि त्याच्या कडे असलेल्या शेअर्स च्या प्रमाणात असते. शेअर धारकास कंपनीच्या नफ्यात वाटा मिळण्याचा हक्क आहे आणि तो त्याला लाभांश स्वरूपात मिळत असतो. त्याचप्रमाणे गुंतवणूकदार शेअर्स ची अधिक किंमतीला विक्री करुन त्यांच्या गुंतवणूकीवर अधिक उत्पन्न मिळवू शकतात. शेअर्स हे पोर्टफोलिओचा महत्वाचा घटक मानला जातो. परंतु ते आपल्या सोबत जोखीम पण घेऊन येतात.

2) बाँड्स

बाँड्स हे मॅच्युरिटीच्या तारखेसह येतात आणि स्टॉकपेक्षा कमी धोकादायक मानले जातात. मॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदारांना व्याजासह गुंतवणूकीची मूळ रक्कम परत मिळते. बाँड्स हे गुंतवणूकीच्या पोर्टफोलिओची जोखीम कमी करत असतात. त्यामुळे बरेच लोक बाँड्स ला आपल्या पोर्टफोलिओ मध्ये समाविष्ट करतात.

याशिवाय गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलिओ मध्ये स्टॉक आणि बाँड्स या व्यतिरिक्त तेल, रिअल इस्टेट, सोने इत्यादी पर्यायी गुंतवणूक साधने देखील समाविष्ट करू शकतात.

पोर्टफोलिओचे प्रकार

जरी गुंतवणूकीचे अनेक प्रकार उपलब्ध असले तरी गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणूकीच्या उद्देशाने आणि जोखमीच्या क्षमतेशी जुळणारे पोर्टफोलिओ तयार करत असतात. त्यानुसार गुंतवणूकीच्या रणनीतीवर आधारित खालील काही प्रकार पडतात. या प्रकारचे पोर्टफोलिओ गुंतवणूकीच्या मार्गातून मिळकतीचे स्थिर प्रवाह निर्माण करण्यास मदत करत असतो.

1) उत्पन्न पोर्टफोलिओ

उत्पन्नाचा पोर्टफोलिओ भागधारकांना लाभांश किंवा इतर आवर्ती लाभ देण्यावर लक्ष केंद्रित करतो. जरी हा पोर्टफोलिओ बचावात्मक वाटत असला तरी बऱ्याच अश्या कंपन्या आहे ज्या चांगला परतावा भागधारकांना लाभांश स्वरुपात देत असतात. अश्या पोर्टफोलिओ साठी आपण चांगल्या (FMCG) कंपन्यांची निवड केली पाहिजे.

2) वाढीचा पोर्टफोलिओ

या पोर्टफोलिओ मध्ये आपणास बहुधा कंपनीच्या सक्रिय वाढीच्या अवस्थेत गुंतवणूक करावी लागते. हे पोर्टफोलिओ मोठ्या जोखमीच्या अधीन असतात. या प्रकारचा पोर्टफोलिओ उच्च जोखीम आणि उच्च परतावा सादर करण्यासाठी ओळखले जातात.

3) मूल्य पोर्टफोलिओ

या पोर्टफोलिओ मध्ये कमी भाव असतांना स्वस्त शेअर मध्ये पैसे टाकले जातात. ज्या वेळेस अर्थव्यवस्था धडपडत असते आणि कंपन्या केवळ टिकाव धरत असतात, तेव्हा मूल्य-लक्षित गुंतवणूकदार अशा फायदेशीर कंपन्यांचा शोध घेतात, आणि ज्यां शेअर्सच्या किंमती त्यांच्या किंमतीपेक्षा कमी असतात त्या मध्ये गुंतवणूक करतात. जेव्हा बाजार पुन्हा वाढीकडे जातो अश्या वेळेस मूल्य पोर्टफोलिओ धारक मोठ्या प्रमाणात कमाई करतात.

येथे क्लिक करून आपण शेअर मार्केट चे खाते उघडू शकता.

गुंतवणूकदारांनी हे लक्षात घेतले पाहिजे की पोर्टफोलिओ तयार करतानी वेळेला खूप महत्व असते. त्यामुळे पोर्टफोलिओ हा योग्य वेळ आणि योग्य मूल्यामध्ये तयार आणि खरेदी करावी.

आपण हे पण वाचू शकता

१) शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी?

2) एस आय पी म्हणजे काय?

Leave a Comment