Prem kavita marathi | प्रेम कविता मराठी | Love poem in Marathi

नमस्कार मित्रानो, आज आपण (Prem kavita marathi) प्रेम कविता मराठी या लेखात, मराठी मधील प्रेम कविता बघणार आहोत. ज्यामध्ये मराठीतील ज्या कविता सर्वाधिक गाजल्या त्यांचा पण समावेश करण्यात आला आहे. सोबत ज्या कविता मराठी चित्रपटामुळे गाजल्या गेल्या, त्यांचा पण समावेश या लेखात करण्यात आला आहे.

Prem kavita marathi – प्रेम कविता मराठी

Table

फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश

फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
दरीखोर्‍यांतून वाहे एक प्रकाश प्रकाश

रान जागे झाले सारे, पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या सावल्या
एक अनोखे लावण्य आले भरास भरास

दंव पिऊन नवेली झाली गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी
क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास

झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास

Prem kavita marathi – प्रेम कविता मराठी

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला

सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला
सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला
रंग कधी दिसणार तुला
रंग कधी दिसणार तुला, लाजणाऱ्या फुलातला
सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला

गंधित नाजुक पानांमधुनी सूर छेडिते अलगद कोणी
गंधित नाजुक पानांमधुनी सूर छेडिते अलगद कोणी
अर्थ कधी कळणार तुला
अर्थ कधी कळणार तुला धुंदणाऱ्या सूरातला
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला

निळसर चंचल पाण्यावरती लयीत एका तरंग उठती
निळसर चंचल पाण्यावरती लयीत एका तरंग उठती
छंद कधी कळणार तुला
छंद कधी कळणार तुला नाचणाऱ्या जलातला
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला

Prem kavita marathi – प्रेम कविता मराठी

रुपेरी वाळूत मडाच्या बनात ये ना

रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना
बनात ये ना, जवळ घे ना
चंदेरी चाहूल, लावित प्रीतीत ये ना
प्रीतीत ये ना, जवळ घे ना

बेधुंद आज आसमंत सारा
कुंजात गात मंद धुंद वारा
दाटे उरी प्रिया तुझा इशारा
देहावरी फुले असा शहारा
तुझा इशारा, असा शहारा

लाजेत आज ही फुले नहाती
गाली अनार प्रीतगीत गाती
तू ये निशा अशी करे पुकारा
दे ये प्रिया मला तुझा निवारा
तुझा निवारा, तुझा निवारा

Prem kavita marathi – प्रेम कविता मराठी

हृदयात वाजे समथींग

हृदयात वाजे समथींग
सारे जग वाटे हॅपनिंग
असतो सदा मी आता ड्रीमिंग

हो…
असतो उगाच स्मायलींग
बघतो तुला मन जम्पिंग
वाटे हवे गोड फीलिंग
त रारारा रारा

असतो उगाच स्मायलींग
बघतो तुला मन जम्पिंग
वाटे हवे गोड फीलिंग

धुंद धुंद क्षण सारे
हलके हलके फुलणारे
फिरुनी ओठांवर येई
तुझेच गाणे

खिडकीतून डोकावुनि
दिसतेस का पाहतो तुला क्षणोक्षणी
कळता तुला मी संपतो
रोखू कशी तगमग आता हि रोज ची

नजरेतूनच माझ्या सांगतो मी तुला सारे
समजेल का तुला काही
पाहतो जिथे जिथे मी चेहरा तुझाच आहे
विसरतो आता मलाच मी

हृदयात वाजे समथींग
सारे जग वाटे हॅपनिंग
असतो सदा मी आता ड्रीमिंग

वाटेवरी मी रोजच्या असतो उभा
दिसशील का कधी तरी
दिसलीस कि झंकारते
उठते मणी किणकिण हि गोड गोड अशी

रोखुनी मला तू बघशी
गोड तू जराशी हसशी
ऐशी अन तशीच तू जशी
शब्द ना सुचे मग काही
बोलणे हि जमतच नाही
गोंधळून वेडे मन जाई

हृदयात वाजे समथींग
सारे जग वाटे हॅपनिंग
असतो सदा मी आता ड्रीमिंग

Prem kavita marathi – प्रेम कविता मराठी

अधीर मन झाले, मधुर घन आले 

अधीर मन झाले मधुर घन आले
धुक्यातुनी नभातले, सख्या प्रिया
सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले

मी अशा रंगाची, मोतिया अंगाची
केवड्या गंधाची, बहरले ना …
उमगले रानाला, देठाला पानाला
माझ्या सरदाराला समजले ना …
आला रे काळजा घाला रे
झेलला भाला रे, गगन भरी झाले रे

सोसला वारा मी, झेलल्या धारा मी
प्यायला पारा मी, बहकले ना …
गावच्या पोरांनी, रानाच्या मोरांनी
शिवारी साऱ्यांनी, पाहिले ना …
उठली रे, हूल ही उठली रे
चालरीत सुटली रे, निलाजरी झाली रे

Prem kavita marathi – प्रेम कविता मराठी

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे

या जन्मावर, या जगण्यावर,
शतदा प्रेम करावे

चंचल वारा,
या जल धारा,
भिजली काळी माती,
हिरवे हिरवे प्राण तशी ही,
रुजून आली पाती,
फुले लाजरी बघून कुणाचे,

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे

हळवे ओठ स्मरावे.
रंगाचा उघडूनिया पंखा,
सांज कुणी ही केली काळोखाच्या दारा वरती,
नक्षत्रांच्या वेली,
सहा ऋतूंचे सहा सोहळे,
येथे भान हरावे.

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे

बाळाच्या चिमण्या ओठांतून,
हाक बोबडी येते,
वेली वरती प्रेम प्रियेचे,
जन्म फुलांनी घेते,
नदीच्या काठी,
साजणा साठी,
गाणे गात झुरवे.

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे

ह्या ओठांनी चुंबन घेईन,
हजारदा ही माती,
अनंत मरणे झेलून घ्यावी,
इथल्या जगण्यासाठी, इथल्या पिंपळ पणावरती,
अवघे विश्व तरावे.

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे

मित्रानो, आज आपण या लेखातून (Prem kavita marathi – प्रेम कविता मराठी) मराठीतील प्रेम कविता बघितल्या. आपणास या कश्या वाटल्या ते कमेंट करून नक्की कळवा.

आपण हे पण वाचू शकता…

१) Horror Marathi story.

२) Marathi love stores.

Leave a Comment