Chatrapati Shivaji Maharaj information in Marathi | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती मराठी | History of shivaji maharaj marathi

नमस्कार मित्रानो, आज आपण या लेखात (Shivaji Maharaj information in Marathi) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती मराठी मध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. तसेच शिवाजी महाराजांचे प्रारंभिक जीवन आणि त्यांचा हिंदवी स्वराज्य स्थापनेत असलेला मोलाचा वाटा कसा होता, या सर्व गोष्टींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Table

chatrapati Shivaji Maharaj information in Marathi:

प्रौढ प्रताप पुरंदर . . .
क्षत्रीय कुलावंतस् . . .
सिंहासनाधिश्वर . . . .
महाराजाधिराज . . . .
श्री छत्रपती शिवाजी महाराज  !!! 

शिवाजी हे नाव घेताच डोळ्यासमोर येते ते दणकट शरीर, बुद्धिमान, शौर्य व धैर्याची मूर्ती एक महान देशभक्त आणि कुशल प्रशासक. त्यांचे पुर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले. मराठी साम्राज्याचे संस्थापक उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता , सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवला. शिवाजी महाराज हे स्वतः धर्मनिष्ठ हिंदू राजे होते.

शिवाजी महाराजांचे प्रारंभिक जीवन:

अशाच महान राजाचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला. महाराष्ट्रातील मराठा राज्याचे संस्थापक आणि पहिले अभिषिक्त छत्रपती. त्यांचा जन्म मराठवाडय़ातील भोसले या वतनदार घराण्यातील मालोजींचे पुत्र शहाजी आणि सिंदखेडकर जाधव यांच्या कन्या जिजाबाई यांच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर झाला.

शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचे “शिवाजी” असे नामकरण करण्यात आले. महाराजांना राज्यशासनाचे आणि युध्द कौशल्याचे धडे राजमाता जिजाऊंकडुन मिळाले. लहानपणापासून राम आणि श्रीकृष्णाच्या कथा ऐकून अन्याय आणि अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध त्यांच्या मनात चीड निर्माण झाली.

पहिली गुरु आई आणि दुसरे गुरु दादोजी कोंडदेव यांच्या सान्निध्यात आणि संस्कारात महाराजांचे बालपण अतिशय उत्तम रितीने गेले. दादोजींनी त्यांना युध्द कौशल्यात आणि नितिशास्रात पारंगत केले. जिजाबाई महाराजांना राम कृष्णाच्या, श्रीरामाच्या आणि शूरवीरांच्या गोष्टी सांगत त्यांच्यावर उत्तम संस्कार तर करतच होत्या त्या शिवाय तलवारबाजी, घोडेस्वारी करणे त्यात त्यांना तरबेज करत होत्या.

शिवाजी महाराज यांच्या यशस्वी वाटचालीत आई जिजाऊचे मोलाचे श्रेय असून प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन केले. मुघल साम्राज्य आपल्यावर करत असलेल्या अन्यायाची जाणीव त्यांना झाली. आणि या अत्याचारातून आपल्या जनतेला मुक्त करण्याचा वसा त्यांनी उचलला.

त्यांच्या हृदयात स्वराज्य स्थापन करण्याची एक ज्योत प्रज्वलित झाली होती. त्यांना स्वतत्र राज्य निर्माण करायचे होते. आपल्या राज्यासाठी स्वातंत्र्य मिळवून द्यायचे होते. त्याच वेळी महाराजांना काही धाडसी आणि खऱ्या मित्रांची सोबत लाभली ज्यांनी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यामध्ये मदत केली.

Chatrapati Shivaji Maharaj information in Marathi

photo of chhatrapati shivaji maharaj

स्वराज्य स्थापनेची ओढ:

महाराज लहानाचे मोठे शिवनेरीत येथे झाले. शिवनेरी सोबतची माहुली व पुणे येथे देखील त्यांचे बालपण गेले. शहाजी महाराजांनी शिवाजी आणि जिजाबाई यांच्या हाती संपूर्ण महाराष्ट्राच्या जहागिरीची व्यवस्था सोपविली अणि त्यांना पुण्यात पाठविण्यात आले. जहागिरीची व्यवस्थापन स्वत दादाजी कोंडदेव आणि काही विश्वासू सरदार बघायचे.

जिजामाता सारखाच शिवाजी महाराजांमध्ये कणखरपणा, देशासाठी असलेले प्रेम आणि कठीण प्रसंगातून बाहेर येण्याचे ध्येय होते. अशा गुणांमुळे शिवाजी तयार झाले. “स्वराज्य म्हणजे स्वताचे राज्य.” महाराजांना वाटू लागले जर आपल्याला आपल्या स्वराज्याचे रक्षण करायचे असेल तर त्यासाठी गड किल्ले आपल्या ताब्यात असले पाहिजे. ही जाणीव त्यांना लहानपणापासून होती.

दादोजी कोंडदेव यांच्या निधनानंतर आता सर्व महाराष्ट्राची जबाबदारी शिवाजी महाराजांवर आली होती. त्यांनी हळूहळू सर्व गड किल्ले ताब्यात घेण्यासाठी अनेक मोहिमा आखून त्या यशस्वीरित्या पार पाडल्या. आपल्या वयाचे धाडसी असे युवा त्यांनी जमवले. सुरवातीला महाराजांनी पुणे जिल्ह्य़ातील काही पडके किल्ले टेकड्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली.

तोरणा किल्ला:

तोरणा किल्ला हा महाराजांचा पहिला गड होता जो त्यांनी हस्तगत केला होता. त्यानंतर राजगड आणि हळूहळू असे ३६० किल्ले त्यांनी आपल्या ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत त्यावेळी तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर, कान्होजी जेधे अशी महान व्यक्तिमत्वे होते.

स्वराजाची शपथ:

रायरेश्वर किल्ल्यावर शिवशंभुच्या मंदिरात २६ एप्रिल १६४५ साली फक्त वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. स्वराज्याचे तोरण बांधताच त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. महाराजांनी धाडसी तरुणांचा समुह बनवला ज्याला त्यांनी “ मावळा” असे नाव दिले. ह्याच मावळ्यांच्या साथीने त्यांच्यामध्ये धर्मप्रेम निर्माण करून त्यांना लढाईचे प्रशिक्षण दिले आणि स्वराज्याची संकल्पना सांगितली. हिंदवी स्वराज्यासाठी मावळयांनी त्यांच्या रक्ताचे पाणी केले. त्यांनी विजापूर आणि दिल्ली या राजसत्तांना आपल्यासमोर झुकायला लावले.

Chatrapati Shivaji Maharaj information in Marathi

शिवाजी महाराजांचा विवाह:

शिवाजी महाराजांचा विवाह १४ मे १६४० मध्ये सईबाई निंबाळकर यांच्यासोबत लाल महाल पुणे येथे संपन्न झाला. महाराजांनी वैयक्तिक राजनीति चालू ठेवण्यासाठी एकूण आठ लग्न केली. मराठा सरदारांना एका छत्राखाली आणण्यात महाराज यशस्वी झाले. महाराजांनी प्रथम विवाह सईबाई यांच्या सोबत केला. त्यानंतर सोयराबाई मोहिते, पुतळाबाई पालकर, सकवारबाई गायकवाड, काशिबाई जाधव व सगुणाबाई शिंदे यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

याशिवाय गुणवंतीबाई इंगळे आणि लक्ष्मीबाई विचारे यांच्याशीही त्यांचा विवाह झाला. सईबाई पासून संभाजी (१६५७ ते १६८९ ) व सोयराबाई पासून राजाराम (१६७० ते १७०० ) असे दोन मुले झाले. त्याशिवाय शिवाजी महाराजांना काही कन्या पण होत्या. १६५९ मध्ये सईबाईचे निधन झाले. पुतळाबाई महाराजांसोबत सती गेल्या.

अफजल खानाचा वध:

आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे मुघल, निजाम, आदिलशाही मध्ये हाहाकार माजला होता. इ.स. १६५९ साली आदिलशाहाने दरबारात त्याच्या सैनिकांना आव्हान दिले की तुमच्यातल्या कोणीतरी एकाने मला शिवाजीला मारून दाखवा. तेवढ्यात त्यांच्या दरबारी असलेला धीट अफजलखान हा समोर येऊन त्याने शिवाजी महाराजांना संपवायचा विडा उचलला.

शिवाजी महाराजांवर आक्रमक करण्यासाठी अफजलखान विजापूर वरुन १०००० सैन्य घेऊन निघाला. अफजलखान धाडधिप्पाड शरीरयष्टीचा होता. शिवाजी महाराजांना डिवचण्यासाठी त्याने रस्त्यात अनेक मंदिरे उध्वस्त केली, अनेक निरपराध लोकांचा बळी घेतला. शिवाजी महाराजांनी त्याला प्रतापगडावर तोंड देण्यास ठरविले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वता: यावे असा अफजलखानचा आग्रह होता.

शिवाजी महाराजांना अफजलखानच्या दगाबाजीची कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधानी म्हणून चिलखत चढवले अणि सोबत बिचवा अणि वाघानखे ठेवली. अफजलखानने शिवाजी महाराजांना मारून टाकायचे या इराद्याने भेटीचे निमंत्रण पाठवले होते. प्रतापगडाच्या पायथ्याशी आलिशान शामियान्यात भेट ठरली. शिवाजी महाराजांसोबत तेव्हा जिवा महाल हे विश्वासू सरदार होते आणि अफजलखान सोबत सय्याद बंडा हे तत्कालीन प्रख्यात असे दांडपट्टेबाज होते. धाडधिप्पाड अफजलखानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजी महाराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफजलखान याने काट्यारिचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजी महाराज बचावले.


अफजलखानचा दगा पाहून शिवाजी महाराजांनी वाघनखे खानाच्या पोटात खुपसली. त्याचबरोबर अफजलखानची प्राणांतिक आरोळी सगळीकडे पसरली. सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्टायाचा वार केला जो लगेच जिवा महालाने स्वत:वर घेतला आणि शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. तेव्हापासून “होता जिवा म्हणून वाचला शिवा” ही म्हण प्रचलित झाली. आणि त्याचवेळी महाराजांपेक्षा दुप्पट असा अफजलखान जमिनीवर कोसळला. शिवाजी महाराजांनी अफजलखानच्या मृत्यूनंतर त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लाम मधील पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडावर बांधली.

Chatrapati Shivaji Maharaj information in Marathi

photo of chhatrapati shivaji maharaj

पावनखिंड युद्ध:

अफजलखानच्या मृत्यूनंतर आदिलशाह चिडला आणि त्याने सिद्धि जौहर ला सैन्यासोबत शिवाजी महाराजांचा नाश करण्यासाठी पाठवले. सिद्धि जौहर ने पन्हाळगड ला चौफेर वेढा घातला. त्या वेढ्यातून सिद्धीला तुरी देत राजे सैनिकांसह विशालगडाकडे रवाना झाले. शिवाजी महाराजांचा पाठलाग करत सिद्धीच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीत त्यांना गाठले आणि लढाई शुरू झाली. तेव्हा शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवाजी राजांना तेथून जाण्याची विनंती केली.

“लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे” म्हणुन शिवाजी महाराजांना बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवाजी राजांना विशालगडाकडे कूच करायची विनंती केली. बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या शौर्याची सीमा गाठत सिद्धि च्या सैन्याला रोखून धरले. संख्येने अधिक असलेल्या सैन्याला बाजीप्रभू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपली प्राणाची बाजी लावत झुलवत ठेवले.

शिवाजी महाराज गडावर पोहोचल्याचा संदेश समजल्यावर बाजीप्रभू देशपांडे यांनी आपले प्राण सोडले. शिवाजी महाराजांनी असे साथीदार तयार करून स्वराज्य स्थापन केले अणि त्याच्या वाढीसाठी अशा अनेक सरदारांनी आपल्या राजासाठी प्राणाची आहुती दिली. शिवाजी महाराजांनी घोडखिंडीचे नाव “पावनखिंड” असे बदलून बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाची आठवण जागवत ठेवली.

आग्र्याची गोष्ट:

इ स. १६६४ साली शिवाजी महाराजांनी व्यवसायीक केंद्र सुरत वर आक्रमणं करून त्याला नेस्तनाबूत केले यामुळे औरंगजेब प्रचंड चिडला. औरंगजेब राजा जयसिंग याला शिवरायांच्या खात्मा करण्यासाठी पाठवले. राजा जयसिंग दीड लाख सैन्यासोबत महाराजांवर चालून गेला मात्र या लढाईमध्ये महाराजांना हार पत्करावी लागली.

त्यांना आपले २३ किल्ले आणि ४ लाख मुद्रा नुकसान भरपाई म्हणून द्यावी लागली. मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर झालेल्या तहानुसार इ.स १६६६ साली औरंगजेबाने शिवाजी राजांना दिल्ली येथे भेटीसाठी बोलाविले. त्यानुसार शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात वाढदिवसाच्या दिवशी पोहचले.

त्यांच्यासोबत नऊ वर्षांचा राजपुत्र शंभूराजे देखील होते. तेथे पोहोचल्यानंतर महाराजांना मोगलांच्या दरबारी नजरकैदेत करण्यात आले. शिवाजी महाराज यांनी सुटकेचे केलेले प्रयत्न फोल ठरत होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. मिठाईच्या पेटीत बसून त्यांनी आपली आणि बाळ संभाजीची सुटका करून घेतली आणि विजापुर मार्गे ते रायगडावर पोहोचले.

पुढे महाराजांनी आपला बराच भाग मुघलांच्या ताब्यातून परत मिळवला. १६८१ ते १६८४ या काळात औरंगजेबाने शिवाजी महाराजांना परास्त करण्यात बरेच प्रयत्न केलेत पण तो पुर्णतः असफल ठरले.

Chatrapati Shivaji Maharaj information in Marathi

Photo of chhatrapati shivaji maharaj

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि सिंहासन:

अखेर तो दिवस उजडला ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. ६ जून १६७४ ला गागाभट्ट यांनी हिंदू परंपरेनुसार अनेक ज्येष्ठांच्या अणि श्रेष्ठांच्या उपस्थितीने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. त्यांनी शिवराई हे चलन शुरू केले. संपूर्ण रायगड त्या दिवशी नवरी सारखा सजवण्यात आला होता. महाराज केवळ शूर आणि युद्ध निपुणच नव्हे तर ते एक उत्तम प्रशासक देखील होते. धर्माच्या नावाखाली त्यांनी काहीही कुणासोबत पक्षपात केला नाही.

त्यांच्या दरबारातील काही अधिकारी आणि अंगरक्षक मुस्लिम समुदायाचे होते. त्यांनी कधीही कुठल्याही स्त्रीचा अनादर केला नाही. शत्रूच्या स्त्रियांना देखील सन्मानपूर्वक परत पाठवत असत. ०६ जून १६७४ रोजी छत्रपतींचा राज्याभिषेक रायगडावर पार पडला. यावेळी ३२ मन वजनाचे सुवर्ण सिंहासन घडविण्यात आले होते ज्यावर राजे विराजमान झाले.

राजमुद्रा:

छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पुण्याचा कारभार पाहत होते. तेव्हा त्यांना शहाजी राजांनी स्वतंत्र राजमुद्रा तयार करून दिली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती.

“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।”

शिवाजी महाराजांचा मृत्यू:

शिवाजी महाराजांचा मृत्यू ३ एप्रिल १६८० मध्ये त्यांची तब्येत खालावत गेली आणि रायगडावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराणी पुतळाबाई या महाराजांच्या चितेवर सती गेल्या. एक उत्तम शासक, एक उत्तम राजा, मराठा साम्राज्याचे संस्थापक, श्री छत्रपती शिवाजी महाराज कायम प्रत्येक भारतीयाच्या मनात आहेत. अशा या महान राजाला कोटी कोटी प्रणाम..!

Chatrapati Shivaji Maharaj information in Marathi

photo of chhatrapati shivaji maharaj

Q & A : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी विचारले जाणारे प्रश:

१) भारतीय इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मोलाचे स्थान का आहे?
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या संपुर्ण आयुष्यादरम्यान, शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य, गोलकोंडाची सल्तनत, विजापूरची सल्तनत आणि युरोपियन वसाहतवादी शक्तींशी युती आणि शत्रुत्व दोन्ही केले. शिवाजी महाराजांच्या लष्करी सैन्याने मराठा प्रभाव क्षेत्राचा विस्तार दिल्ली परेंत केला, वेगवेगळे किल्ले ताब्यात घेतले आणि बांधले आणि सोबत मराठा नौदल तयार केले.

2) छत्रपती शिवाजी महाराज का प्रसिद्ध आहेत?
शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टीवर मजबूत सैन्य आणि नौदल स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराज हे गनिमी काव्याचेही मास्टर मानले जात होते. छत्रपती शिवाजी महाराज हे आज भारतात आणि विशेषत महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय नायक/दैवत म्हणून पूजले जातात.

3) शिवाजी महाराजांची ओळख कशी केली जाते?
छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय नौदलाचे संस्थापक होते. ते पहिले आशियाई राजा होते ज्यांना संरक्षण क्षेत्रात नौदल बळ मिळाले. भारताच्या पश्चिम भागात असलेल्या मजबूत नौदल शक्तीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रावर आपली मक्तेदारी प्रस्थापित केली.

४) शिवाजी महाराज स्वातंत्र्यसैनिक आहेत का?
शूर योद्धा राजा ‘छत्रपती’ शिवाजी महाराज हे भारतातील मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. ते त्याच्या काळातील एक महान योद्धा म्हणून ओळखले जातात. त्याच्या कारनाम्यांच्या कथा लोककथांचा एक भाग म्हणून संपूर्ण भारतात कथन केल्या जातात.

५) छत्रपती शिवाजी माहाराज यांना एक महान राजा म्हणून का ओळखले जाते?
छत्रपती शिवाजी महाराज हे एक असे नेते होते जे आपल्या सैन्यातील सर्व सदस्यांमध्ये स्वातंत्र्य आणि मातृभूमीबद्दल प्रेम निर्माण करण्यास सक्षम होते. एवढी उच्च पातळीची बांधिलकी होती की “मावळे” म्हणजेच त्यांच्या सैन्यातील सदस्य या कारणासाठी आपल्या प्राणाची आहुती द्यायला पण तयार होते. तसेच ते आपल्या माणुसकीने आपल्या लोकांची मने जिंकू शकले.

६) आज शिवाजीबद्दल काय विशेष आहे?
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १६३० मध्ये पुण्यातील शिवनेरी किल्यावर झाला. मराठा सामराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान योद्धा होते. छत्रपती शिवाजींनी मुघलांविरुद्ध अनेक युद्धे जिंकून मराठा साम्राज्य निर्माण केले होते. इ.स. १६७४ मध्ये त्यांना औपचारिकपणे ‘छत्रपती’ किंवा सम्राट म्हणून राज्याभिषेक करण्यात आला.

७) छत्रपती शिवाजीचे महाराज यांचे सर्वात मोठे यश कोणते होते?
त्यांनी दख्खनपासून कर्नाटकापर्यंत मराठा साम्राज्याचा प्रभाव वाढवला आणि त्याला अखिल भारतीय स्तरावर स्थान दिले. त्यांनी एक कार्यक्षम प्रशासकीय यंत्रणा उभारली व उत्पन्नासाठी एक प्रामाणिक महसूल व्यवस्था उभी केली.

८) छत्रपती शिवाजी महाराज इतके यशस्वी कसे झाले?
छत्रपती शिवाजीचे महाराज यांच्या यशाचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे चारित्र्य आणि व्यक्तिमत्व होय. ते एक महान लष्करी प्रतिभाशाली व्यक्तिमत्व होते. त्या सोबत त्याच्याकडे प्रशासकीय गुण देखील होते. ते एक यशस्वी प्रशासक होते. त्यांचे गुरू रामदास, आई जिजाबाई आणि दादाजी कोंडेवा यांनी शिवाजीच्या चरित्रावर खूप मोठा प्रभाव टाकला होता.

९) छत्रपती शिवाजीचे महाराज हे सर्व भारतीयासाठी प्रेरणादायी का आहेत?
शिवरायांचे नाव आपल्या मनात त्यांच्या निर्भीड आत्मा आणते जे संकटे आणि संकटात कधीही डळमळू शकत नाही. छत्रपती शिवाजीचे महाराज आव्हानांना धैर्याने उभे राहिले आणि वाटेत आलेल्या अडचणींवर त्यांनी मेहनतीने मात केली. “प्रत्येकाच्या हातात तलवार असली तरी इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

१०) छत्रपती शिवाजीचे महाराज यांचा इतिहास कोणी लिहिला?
शिवाजी महाराजांच्या संस्कृत चरित्राला श्रीशिवभारत म्हणतात. हे संस्कृत कवी परमानंद यांनी रचले होते.

११) छत्रपती शिवाजीचे महाराज हे भारताचे महान राजा आहे का?
विशेष म्हणजे छत्रपती शिवाजीचे महाराज यांच्या काळात दोनदा भारताला भेट देणारा फ्रेंच प्रवासी बार्थेलेमी कॅरे याच्या प्रवासवर्णनात शिवाजीचे वर्णन एक महान नायक म्हणून करण्यात आले आहे. पॅरिस येथे १६९९ मध्ये प्रकाशित झालेल्या प्रवासवर्णनात त्यांनी लिहिले कि “छत्रपती शिवाजीचे महाराज हे पूर्वेकडील पाहिलेला सर्वात महान व्यक्ती आहे.

१२) छत्रपती शिवाजी महाराजाचे प्राण कोणी वाचवले?
१६६० मध्ये जेव्हा सिद्धी जोहरने छत्रपती शिवाजीचे महाराज यांना पकडण्यासाठी पन्हाळगडाला वेढा घातला तेव्हा शिवा काशीद या न्हावीच्या बलिदानाने जोहरचा प्रयत्न हाणून पाडला आणि शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले.

१३) सर्वात यशस्वी मराठा राजा कोण होता?
छत्रपती शिवाजीचे महाराज.

१४) छत्रपती शिवाजी महाराज शूर राजा होते का?
छत्रपती शिवाजीचे महाराज त्याच्या शौर्यासाठी आणि प्रभावी युद्धनीतीसाठी ओळखले जात असे. तरुण तडफदार छत्रपती शिवाजी महाराज भारतातील महान राजांपैकी एक आणि बलाढ्य मुघल साम्राज्याच्या कट्टर विरोधी बनले. त्यांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याने भारताच्या इतिहासाचा मार्गच बदलून टाकला आणि एक प्रमुख लष्करी शक्ती बनली.

१५) छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वात मोठा शत्रू कोण होता?
औरंगजेब शिवाजीचे महाराज यांचा मोठा शत्रू होता.

१६) छत्रपती शिवाजी महाराजांनी किती काळ राज्य केले?
१६७४ च्या उन्हाळ्यात, शिवाजी महाराजांनी स्वतंत्र सार्वभौम म्हणून मोठ्या धूमधडाक्यात सिंहासनावर विराजमान झाले होते. संपूर्ण दडपलेल्या हिंदू बहुसंख्यांनी त्यांचा महान नेता म्हणून त्यांच्याकडे धाव घेतली. आठ मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून त्यांनी जवळपास सहा वर्षे राज्य केले.

१७) सर्वात शूर मराठा कोण होते?
सर्वात शूर मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज होते. सोबत छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे महान योद्धा आणि रणनीतीकार होते. १६७४ मध्ये त्यांनी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला. त्यांना भारतीय नौदलाचे जनक म्हणूनही ओळखले जाते.

मित्रानो आज आपण (Shivaji Maharaj information in Marathi) या लेखातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनक्रम समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपले विचार आमच्या साठी खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे आपणास हा लेख कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा.

धन्यवाद…

आपण हे पण वाचू शकता…

१) विलासराव देशमुख.

२) यशवंतराव चव्हाण.

३) संत रामदासस्वामी जीवन परिचय.

Leave a Comment