भीमा नदीची माहिती | भीमा नदी खोरे | भीमा नदीच्या उपनद्या

भीमा नदी –

गोदावरी नदीच्या खालोखाल महाराष्ट्रात कृष्णा नदीचे खोरे आहे. परंतु कृष्णा नदीची उपनदी असलेल्या भीमा नदीने महाराष्ट्रातील बराच भाग व्यापलेला आहे. तसेच भीमा कृष्णेला महाराष्ट्राच्या बाहेर मिळत असल्याने भीमा नदीचा स्वतंत्रपणे विचार केला जातो.

नदी प्रणाली ची क्षेत्र

भीमा नदीचा उगम पुण्याजवळ भीमाशंकर येथे होतो. महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगा पैकी हे एक क्षेत्र आहे. खंडाळ्याच्या उत्तरेस ४० किलोमीटर अंतरावर भीमा नदीचे उगमस्थान आहे. बालाघाट डोंगराच्या उत्तरेस गोदावरी नदी वाहते तर दक्षिणेस भीमा नदीचे खोरे निर्माण झाले आहे. नंतर भीमा नदी आग्नेयस ४५१ किलोमीटर अंतर वाहत जाते आणि कर्नाटक मधे रायचूर जवळ कुरुगुड्डी येथे कृष्णा व भीमा या नद्यांचा संगम होतो. महाराष्ट्रात भीमा प्रणालीचे एकूण क्षेत्रफळ ४६१८४ चौरस किलोमीटर आहे.

राजकीय क्षेत्र –

भीमा खोऱ्यात पुणे व सोलापूर जिल्ह्याचा संपूर्ण पणे समावेश होतो, तर सातारा जिल्ह्याचे खंडाळा, फलटण व दहिवड तालुके, नगर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील श्रीगोंदा, कर्जत व जामखेड तालुके, मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, भूम, तुळजापूर व उमरगा हे तालुके समाविष्ट होतात.

भीमा नदीच्या उपनद्या-

भीमा नदीस उजव्या किनाऱ्याने म्हणजे दक्षिणेकडून भामा, इंद्रायणी, मुळा व मुठा, निरा व माण या नद्या मिळतात. तर डाव्या किनाऱ्या कडून म्हणजे उत्तरेकडून वेळ, सीना व घोड या नद्या येऊन मिळतात.

भीमा नदीचा प्रवाह मार्ग-

भीमा नदीच्या उगम सुमारे एक हजार मीटर पेक्षा जास्त उंच डोंगरावर भीमाशंकर येथे झालेला आहे. पहिल्या ८ किलोमीटरच्या अंतरामध्ये नदी एकदम खाली कोसळले आणि २०० मीटर उंचीच्या प्रदेशावरून वाहू लागते. सुरुवातीस नदीचा प्रवाह पूर्वेस आहे नंतर तो अग्नीये कडे होतो. त्यानंतर भीमा नदी भामनेर खोऱ्याच्या अतिशय खडकाळ आणि अरुंद दरी मधून सुमारे ५० ते ५५ किलोमीटर अंतर कापते. त्यानंतर मार्गामध्ये भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या उजव्या किनाऱ्याने आणि वेळ नदी येऊन मिळाल्यावर प्रवाह ईशानेला वळतो. काही अंतरानंतर हा प्रवाह दक्षिणेकडे वाहू लागतो आणि रांजणगाव जवळ उजव्या बाजूने मुळा व मुठा या नद्या येऊन मिळतात. भीमा नदी अग्नियेस वळते व नागमोडी २० ते २२ किलोमीटर गेल्यावर भीमा व घोड नदीचा संगम होतो. नदीच्या डाव्या किनाऱ्याला कुकडी व मीना नद्या मिळतात. टेंभुर्णी जवळ उजव्या किनार्‍याने भोर तालुक्यातून वाहत येणारी नीरा नदी येऊन मिळते. याआधी नीरा व कन्हा या नद्यांचा संगम होतो. पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपुरातून भीमा नदी वाहत जाते व त्यानंतर उजव्या किनाऱ्याने येणारी मान नदी भीमा नदीला येऊन मिळते.

भीमा नदीच्या प्रमुख उपनद्या

१) वेळ नदी –

सह्याद्री पर्वत रांगांमधील धाकले येथे या नदीचा उगम होतो. ही नदी आग्नेयस वाहतांना भीमा नदीला समांतर वाहते. आणि तळेगाव ढमढेरे च्या खाली ८ किलोमीटर अंतरावर भीमा नदीस मिळते. या नदीची लांबी जवळजवळ ६४ किलोमीटर आहे.

२) घोड नदी –

घोड नदीच्या उगमाचे स्थान सह्याद्री पर्वतावर असून भीमा नदीच्या उगमाच्या उत्तरेस १५ किलोमीटर अंतरावर आहे. सुमारे २४ किलोमीटरच्या अंतरांमध्ये प्रदेशाची दोनशे मीटर उंची कमी होते. तिला कुकडी व मीना या उपनद्या येऊन मिळतात. ही नदी शिरूर जवळ भीमा नदीला येऊन मिळते.

३) इंद्रायणी नदी –

लोणावळ्याच्या नैऋत्येस पाच किलोमीटर अंतरावर कुरवंडी खेड्याचा जवळ नदीचा उगम होतो. नंतर ती पूर्वेस वाहते. डाव्या किनार्‍याने तिला आंध्र नदी येऊन मिळते . नंतर देहु आणि आळंदी या पवित्र तीर्थक्षेत्री इंद्रायणी वाहत जाते. नंतर भीमा व इंद्रायनी यांचा संगम होतो.

४) भामा नदी –

भीमाशंकरच्या दक्षिणेस १० किलोमीटर अंतरावर भामा नदीचा उगम होतो. तिच्या खोऱ्यास भामनेर असे म्हणतात. पिंपळगाव जवळ ची भीमा नदी येऊन मिळते.

५) मुळा- मुठा –

बोरगड च्या दक्षिणेस मुळा नदीचा उगम होतो. त्यानंतर ती पौड गावाजवळ वाहते. नंतर ती पूर्वेस वळते. मार्गात पवना व पुढे पुण्याजवळ उजव्या किनाऱ्याने मुठा नदीस येऊन मिळते. मुळा-मुठेच्या संयुक्त प्रवाह रांजणगाव जवळ भीमा नदीला मिळतो. मुठा नदीचा उगम सह्याद्रीतील डोंगरामध्ये होतो. प्रवाहाचा पहिला भाग पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे. पुढे मुठा नदी पुणे शहरातून वाहते व मुळा नदीस मिळते.

६) नीरा

भोर तालुक्यात निरा नदीचा उगम होतो. नंतर ते ईशान्येस वाहते व काही अंतर पुणे व सातारा ची सरहद निर्माण करते. नंतर नीरा व कऱ्हा नद्यांचा संगम होतो व शेवटी भीमा नदीस मिळते.


भीमा खोऱ्यात पुणे, अहमदनगर, बारामती, फलटण, पंढरपूर, सोलापूर, बार्शी, उस्मानाबाद आधी शहरे वसलेली आहे.

Leave a Comment