Sant Ramdas information in Marathi | समर्थ रामदास स्वामी

नमस्कार मित्रानो, आज आपण (Sant Ramdas information in Marathi) या लेखातून महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक संत – समर्थ रामदास स्वामी यांचा जीवन परिचय करून घेणार आहोत.

Table

Sant Ramdas information in Marathi

समर्थ रामदास स्वामी याचा परिचय
नावसमर्थ रामदास
समर्थ रामदास यांचे जन्म नावनारायण सूर्याजी ठोसर
समर्थ रामदास स्वामींनीच्या वडिलांचे नावसूर्याजीपंत ठोसर
आईचे नावराणुबाई
समर्थ रामदास स्वामी यांचे जन्म गाव श्री क्षेत्र जांब समर्थ
समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म शके १५३० तसेच सन १६०८ मध्ये झाला
समर्थ रामदास स्वामी यांचा मृत्यू १६८२

समर्थ रामदास यांचे जीवनचरित्र – Biography of Saint Ramdas

समर्थ रामदास यांचे जन्म नाव नारायण सूर्याजी ठोसर होते. ते महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमानाला मानणार्‍या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठ, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन उभे केले. समर्थ रामदास संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपुर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रातील संत होते.

पर्यावरणावर प्रबोधन आणि लिखाण पण त्यांनी केले. समर्थ रामदास स्वामींनीच्या वडिलांचे नाव ‘सूर्याजीपंत ठोसर’ असे होते. तर त्यांच्या आईचे नाव ‘राणुबाई’ होते. ते ऋग्वेदी असून जमदग्नि हे त्यांचे गोत्र होते. तसेच ते सूर्योपासक पण होते. समर्थ रामदास स्वामी (नारायण) यांचा जन्म श्री क्षेत्र जांबसमर्थ या गावी शके १५३० तसेच सन १६०८ मध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमींस, रामजन्माच्या शुभ मुहूर्तावर झाला.

समर्थ रामदास स्वामीचे बालपण

ठोसरांचे संपूर्ण घराणेच सूर्योपासक होते. नारायण सात वर्षाचे असतानाच वडील सूर्याजीपंताचे निधन झाले. घरची संपत्तिक स्थिती चांगली होती. पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होते. अतिशय बुद्धिमान, निश्चयी, खोडकर तसेच लहानपणी नारायण साहसी होते. झाडावरून उड्या मारणे, पुरात पोहणे, घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टीत ते तरबेज होते.

त्याचे आठ मित्र होते, एक मित्र सुताराचा मुलगा होता तर दुसरा गवंडयाचा, एक लोहाराचा तर दुसरा गवळ्याचा. नारायणाने या मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. निरीक्षणाने अणि अनुभवाने तो सगळ्या गोष्टी शिकला. एकदा नारायण लपुन बसला, काही केल्या सापडेना. अखेर एका फडताळात सापडला. “काय करीत होतास” असे विचारल्यावर “आई, चिंता करीतो विश्वाची” असे उत्तर त्यांनी दिले होते.

संत रामदास आणि सावधान

या मुलाला संसारात अडकविले, तर तो टाळ्यावर येईल या कल्पनेने त्याचे वयाच्या १२ व्या वर्षी लग्न ठरविण्यात आले. लग्न समारंभात पुरोहितांनी “सावधान” हा शब्द उच्चारताच तो ऐकून, नेसलेले एक व अंगावरील पांघरलेले दूसरे, अशा दोन वस्त्रानिशी नारायण लग्नमंडपातुन पळाले. लोकांनी पाठलाग केला. पण त्यांनी तातडी करून गावाबाहेरची नदी गाठली अणि नदीच्या खोल डोहात उडी मारली. पुढे तिथून पायी चालत चालत पंचवटीत येऊन रामाचे दर्शन घेतले, आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली.

वयाच्या १२ व्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ १२ वर्षे तपश्चर्या करीत होते. समर्थांनी स्वयंप्रेरणेने स्वताचा विकास विद्यार्थी दिशेत असतानाच करून घेतला असे मानले जाते. नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखु नये म्हणून त्यांनी रामदास हे नाव धारण केले.
टाकळी येथे ते इ.स. १६२१ ते १६३३ असे १२ वर्षे राहिले. आपल्या या साधनेसाठी त्यांनी टाकळीची निवड करण्यामागे येथील नंदिनी नदीच्या काठावरील उंच टेकडीवरील घळ व गुहा येथे असलेले एकांत हेच कारण असावे.

या तपसाधनेच्या कालावधीत ते पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत. सूर्योदयापासून मध्यान्हपर्यंत नदीच्या डोहात छातीइतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुरश्चरण करत. दोन तास गायत्री मंत्राचा तर चार तास श्री राम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा जप करीत. रामदासांनी रामनामाचा १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभु श्री राम हेच त्यांचे सद्गुरु झाले असे मानले जाते. समर्थ दुपारी केवळ ५ घरी भिक्षा मागून तिचा श्रीरामाला नैवेद्य दाखवत असत. त्यातील काही भाग पशुपक्ष्यांना ठेवून उरलेला भाग ग्रहण करत असत.

समर्थ दुपारी दोन तास मंदिरात श्रवण साधना करीत अणि नन्तर दोन तास ग्रंथांचा अभ्यास करीत. याच काळात त्यांनी वेद, उपनिषदे, सर्व प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला, रामायणाची रचना केली. त्यांच्या या साधकावस्थेमध्ये त्यांनी आर्ततेने श्री रामाची प्रार्थना केली तीच ‘करुणाष्टके’ होत. व्यायाम, उपासना अणि अध्ययन या तिन्ही गोष्टींचा समर्थांच्या जीवनात महत्वाचे स्थान होते. त्यांच्या जीवनातील ही १२ वर्षे अत्यंत कडकडीत उपासनेमध्ये व्यतीत झाली. १२ वर्षाच्या या तीव्र तपश्चर्येनंतर याना आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात.

त्यावेळी समर्थांचे वय २४ वर्षाचे होते. समर्थांनी नाशिकमध्ये टाकळी येथे हनुमानतांची मूर्ती स्थापन केली. हनुमान ही शक्तीची अणि बुद्धीची देवता आहे त्यामुळे तिची उपासना केली पाहिजे असा समर्थांचा यामागे विचार होता. समर्थांची तपश्चर्या संपल्यानंतर त्यांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले. तीर्थयात्रा केल्या. सारा हिन्दुस्तान पायाखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितिचे निरीक्षण केले. पुढे, ते फिरत फिरत हिमालयात आले तेव्हा त्यांच्या मनातील मुळचा वैराग्यभाव जागा झाला. त्यांची देहाबद्दलची आसक्ति नष्ट झाली.

आपल्याला प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाले, आत्मसाक्षात्कार झाला. भारतभ्रमण करत असता श्रीनगरमध्ये शीखांचे सहावे गुरू हरगोविंद यांची व समर्थांची योगायोगाने भेट झाली. समाजाच्या दुर्धर स्थितिसंबंधी दोघांची चर्चा झाली होती. हरगोविंदसिंगाबरोबर १००० सैनिक असायचे. त्यांच्या कमरेला दोन तलवारी असत. त्यांचा हा सर्व सरंजाम पाहून समर्थांना खूप आश्चर्य वाटले. समर्थांनी हरगोविंदांना विचारले- “आपण धर्मगुरू आहात. या दोन दोन तलवारी आपण का बाळगता?” तेव्हा गुरु हरगोविंद म्हणाले- “एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी तर दूसरी स्त्रियांच्या शील रक्षाणासाठी” समर्थांनी पुन्हा आश्चर्याने विचारले- “आणि हा सारा फौजफाटा?” त्यावर हरगोविंद म्हणाले – “धर्माचे रक्षण करणारे हे सैन्य आहे.

सध्या शत्रू एवढे अन्याय करीत आहेत. केवळ शांती अणि सलोखा यांनी प्रश्न सुटणार नाही. आपल्याला शस्त्रसज्ज झाले पाहिजे. या जगात दुर्बल माणसाला काही किम्मत नसते. आपण बलशाही झाले पाहिजे. ‘समान—शील-व्यसनेषु सख्यम्’ या न्यायाने दोघात सख्य झाले. समर्थ गुरु हरगोविंद यांच्या बरोबर सुवर्ण मंदिरात आले. तिथे ते दोन महिने राहिले. तेव्हापासून समर्थ शस्त्र बाळगू लागले त्याला ते गुप्ती म्हणत. बाहेरून दिसायला कुबडी. जप करताना या कुबडीवर बगल ठेवून चंद्रनाडी अणि सूर्यनाडी यांचे संचालन करता येत असे. कुबडीच्या दांड्याला आटे असत, त्यात छोटी तलवार असे. समर्थांची अशी तलवार असलेली कुबडी आजही सज्जनगडावर पाहायला मिळते.

समर्थ रामदास स्वामींचे भारत भ्रमण

भारत प्रवास करीत असताना ते आपल्याला प्रत्येक शिष्याला समर्थांचा अणि स्वाभिमानाचा संदेश देत. “समर्थांना हिमालयात प्रभु रामचंद्राकडून धर्मसंस्थापनेसाठी प्रेरणा मिळाली होती. त्यापाठोपाठ गुरू हरगोविंद यांनीही त्यांना सशस्त्र क्रांतीची प्रेरणा दिली. समर्थांनी ११ मारुतीची स्थापना केली. गावोगाव मारुतीची मंदिरे बांधली. मारुती ही शक्तिची देवता असल्याने मारुतीच्या मंदिराच्या परिसरात ते तरुणांना संघटीत करत अणि त्यांना व्यायामाची प्रेरणा देत.

सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थांनी स्थापलेले राम मंदिर अणि अकरा मारूतीचे मंदिरे याच परिसरात आहेत. भारत भ्रमण करत असताना शेवटी वयाच्या ३६ व्या वर्षी रामदास स्वामी पैठणला परत आले. पैठणला ते एकनाथांच्या वाड्यातच उतरले. नाथ अणि त्यांची पत्नी या दोघांनी देह ठेवलेला होता.

नाथांच्या पत्नी समर्थांची मावशी होती. पण समर्थांनी कुणालाच ओळख दिली नाही. एक फिरता साधू म्हणून ते त्या घरात राहिले. मात्र तिथे त्यांना जांब गावातील सगळ्या बातम्या समजल्या. लग्नमांडपातून पलायन केल्यावर २४ वर्षे जांबशी त्यांचा कोणताच संपर्क नव्हता. त्यांच्या वहिनीला दोन मुले झाल्याचे व आई राणुबाई अंध झाल्याचेही त्यांना तिथे समजले. त्यांच्या मनात जांबला जाऊन आईला भेटावे, असे विचार येत होते.

समर्थ जांबला पोहोचले, पण तेथेही त्यांनी कोणाला आपली ओळख दिली नाही. आपल्या घरच्या अंगणात उभे राहून त्यांनी भिक्षा मागितली. त्यांची वहिनी भिक्षा घेऊन दारात उभी राहिली. तिची राम अणि शाम ही दोन्ही मुले भिक्षा मागणार्‍याया गोसाव्याकडे पाहत होते. त्यांना ठाऊक नव्हते की हे आपले काका आहेत. २४ वर्षात दाड़ी, जटा वाढविल्याने अणि व्यायामाद्वारे शरीर बलदंड झाल्याने पार्वतीबाईदेखील दिराला ओळखू शकल्या नाही. अखेर समर्थांनी आपले खरे रूप प्रकट केले. नारायण आल्याने राणुबाईना खूप आनंद झाला. २४ वर्षाच्या साधनेने समर्थांना काही शक्ति प्राप्त झाल्या होत्या. त्याद्वारे त्यांनी रामचंद्रांना प्रार्थना करून मातेच्या डोळ्याला स्पर्श करताच राणुबाईना दिसू लागले, असे मानले जाते.

समर्थांच्या शिष्य मंडळींमध्ये सर्व प्रकारचे शिष्य होते. समर्थांचे एक वैशिष्टय़ होते- समोरचा मनुष्य ज्या पातळीवरचा असेल त्या पातळीवर जाऊन त्याला ते समजाऊन सांगत. समर्थांची उपदेशाची भाषा अत्यंत साधी सोपी होती. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर प्रथम सामन्य लोकांनीही परमार्थिक मार्गावर लावावे, अशी इच्छा रामदास स्वामींना साहजिकच झाली. पण पुढील १२ वर्षांच्या प्रवासात त्यांनी जे पाहिले, ते भयंकर विदारक अनुभव होते. त्यामुळे त्यांच्या चारित्र्यास वेगळीच कलाटणी मिळाली. त्या काळी भारतातील जनता कमालीच्या हीन, दीन, त्रस्त अणि अपमानित अवस्थेत काळ कंठीत होती. यावनी सत्तेच्या अमानुष जुलूमाखाली भरडली जात होती. लोकांची मालमत्ता, बायकामुले, आईबहिणी, देव, धर्म, संस्कृती काहीच सुरक्षित नव्हते. जनतेची अशी हृदयद्रावक अवस्था पाहून समर्थ अत्यंत अस्वस्थ व उद्विग्न झाले.

छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थ रामदास स्वामींचे शिष्य

छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थ रामदास स्वामींचे शिष्य होते. स्वराज्य रक्षणासाठी रामदासांनी शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ३१ नोव्हेंबर १६७८ मध्ये समर्थ रामदास स्वामींना एक विस्तृत सनद लिहून काही गावी इनाम म्हणून दिली होती. याबाबतचे एक पत्र इ.स. १९०६ मध्ये धुळ्याच्या शंकरराव देवांनी ‘समर्थांची दोन जूनी चरित्र’ या ग्रंथात प्रकाशित केले होते; पण या वेळे देवांना या पत्राची मुळ प्रत न मिळता एक नक्कल सापडली होती. या नंतर इतिहासाचार्य राजवाड्यांनाही या पत्राच्या काही नकला सापडल्या. शिवाय, अनेक नकला पुणे पुराभिलेखागारात इनाम कमिशनच्या दफ्तरातही सापडल्या. पण या सगळ्या नकला अथवा मूळ पत्राच्या कॉपी असून मूळ पत्र हे अनेक वर्षे कोणाच्याही पाहण्यात आले नव्हते.

अखेरीस मे २०१७ मध्ये लंडनच्या ‘ब्रिटिश लायब्ररी’ मध्ये या मूळ पत्राचीफोटोझिंकोग्राफ तंत्रज्ञानाने बनवलेली एक प्रत इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी याना सापडली असून, महाराष्ट्रात आजवर सापडलेल्या नकलांवर जे शेरे आहेत. त्याबरहुकूम ही प्रत असल्याचे सिद्ध होते आहे. सदर सनदेवर छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेली ‘मर्यादेयं विराजते’ अशी अक्षरे आहेत. पत्राच्या मुख्य बाजूवरचे अक्षर आवजी चिटणीसांच्या हस्ताक्षराशी मिळतेजुळते आहे.

रामदासस्वामी अद्वैत तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते. केवळ ब्रम्ह हेच सत्य आहे हा विचार त्यांच्या साहित्यात सर्वत्र दिसतो.

मित्रानो आपणास हा लेख (Sant Ramdas information in Marathi) कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा.

आपण हे पण वाचू शकता...

१) Shivaji Maharaj information in Marathi.

२) Sant Tukaram information in Marathi.

Leave a Comment