MBBS full form in Marathi
नमस्कार मित्रानो आज आपण बघणार आहोत MBBS चा फुल फॉर्म काय आहे, आणि जाणून घेऊयात कि MBBS होण्यासाठी कोणकोणते निकष असतात. त्यासोबत MBBS ची प्रवेश परीक्षा आणि MBBS करतांनी कोणते विषय असतात, आणि MBBS पूर्ण केल्या नंतर कोणकोणत्या ठिकाणी नौकरी ची संधी असतात. चला तर बघू काय आहे MBBS आणि MBBS अभ्यासक्रम.
Table
MBBS full form in Marathi
MBBS चा फुल फॉर्म आहे बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी (Bachelor of Medicine and Bachelor of Surgery) तसेच ल्याटिन भाषेत तिला Medicinae Baccalaureus Baccalaureus Chirurgiae असे म्हणतात. MBBS चा हा अभ्यासक्रम साधारण ५.५ वर्षांचा असतो. MBBS हि एक व्यावसायिक वैद्यकीय पदवी आहे. ज्या लोकांना डॉक्टर व्हायचे आहे त्यांच्यासाठी MBBS हि त्यांच्या स्वप्नातील व्यवसायाचे प्रवेशद्वार आहे.
भारतातील सर्वसाधारणपणे ५८८ मेडिकल कॉलेज आहेत जे प्रत्येक वर्षी ८०००० हजार विद्यार्थीना MBBS चा अभ्यासक्रम उपलब्ध करून देतात.
एमबीबीएस प्रवेश परीक्षा – MBBS Entrance Exam
MBBS साठी भारतात NEET हि एकमेव वैध वैद्यकीय प्रवेश परीक्षा आहे. प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांनी NEET ला उपस्थित राहणे आवश्यक आहे. हि परीक्षा उत्तीर्ण झाल्यास आपण वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतो.
एमबीबीएस पात्रता निकष – MBBS Eligibility Criteria
एमबीबीएस साठी पात्रता निकष खालील प्रमाणे आहे.
पात्रता परीक्षा | मान्यताप्राप्त संस्थेतून 12 वी उत्तीर्ण सोबत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र विषय असणे आवशकआहे. |
किमान वयाची आवश्यकता | १७ वर्ष |
प्रवेश परीक्षा | NEET |
पात्रता गुण | OPEN – 50%, ओबीसी/एसटी/एससी – 40%, पीडब्ल्यूडी – 45% |
परदेशातून एमबीबीएसचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्याना मान्यताप्राप्त विध्यापिठातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र हे विषय घेऊन 10+2 परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
एमबीबीएस अभ्यासक्रम – MBBS Syllabus
Semesters | Subjects Covered |
Anatomy | |
Semesters 1-2 (Pre-Clinical) | Biochemistry |
Physiology | |
Forensic Medicine | |
Community Medicine | |
Semesters 3-5 (Para-Clinical) | Pathology |
Microbiology | |
Clinical postings in Wards | |
Pharmacology | |
Community Medicine | |
Medicine and allied subjects | |
Semesters 6-9 (Clinical) | Obstetrics and Gynaecology |
Pediatrics | |
Surgery and allied subjects | |
Clinical postings |
एमबीबीएस विषय – MBBS Subjects
Anatomy | |
---|---|
Gross anatomy | Microanatomy |
Embryology and Genetics | Neuroanatomy |
Biochemistry | |
Biological cell | Biomolecules |
Enzymes | Metabolic pathways |
Food assimilation and nutrition | Molecular Biology |
Hormones | Cancer and cancer makers |
Physiology | |
General Physiology | Nerve–Muscle |
Respiratory System | Cardiovascular System |
Gastrointestinal System | Reproduction |
Pharmacology | |
General Pharmacology | Autonomic nervous system & Peripheral nervous system |
Central nervous system | Cardiovascular system |
Autacoids | Chemotherapy |
Pathology | |
General Pathology | Systemic Pathology |
एमबीबीएस साठी शुल्क – MBBS Fees
भारतातील सर्वोत्तम वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये, एमबीबीएस अभ्यासक्रमाची फी 5,00,000 ते INR 50,00,000 दरम्यान आहे. एमबीबीएस अभ्यासक्रमात मुख्य आणि निवडक एमबीबीएस विषय जसे फार्माकोलॉजी, शरीरशास्त्र, पॅथॉलॉजी, सामुदायिक आरोग्य आणि औषध शास्र इ. तसेच ते कार्डिओलॉजी, नेफ्रोलॉजी, एंडोक्राइन, स्त्रीरोगतज्ज्ञ, सामान्य शस्त्रक्रिया इत्यादी तज्ञांमध्ये मास्टर ऑफ सर्जरी (एमएस) किंवा एमडी देखील करू शकतात.
एमबीबीएस नंतर नौकरी च्या संधी – Job opportunities after MBBS
एमबीबीएस अभ्यासक्र पूर्ण केल्या नंतर उमेदवार हॉस्पिटल, नर्सिंग होम, खाजगी दवाखाने इत्यादींमध्ये डॉक्टर म्हणून आपले करिअर सुरू करू शकतात.
मित्रानो हा (MBBS full form in Marathi) लेख कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा.
आपण हे पण वाचू शकता…