Diwali information marathi | दिवाळी सणाची माहिती मराठी मध्ये

मित्रानो आज आपण दिवाळी सणाबद्दल काही माहिती या (diwali information marathi) लेखाच्या माध्यमातून माहित करून घेऊयात.

लक्ष्य दिव्यांचे तोरण ल्याली
उटण्याचा स्पर्श सुगंधी
फराळाची लज्जत न्यारी
रंगावलिचा शालू भरजरी
आली आली दिवाळी आली …!


आपल्या भारत देशात हिन्दू धर्माचा साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी…! दिवाळी हा सण म्हणजे दिव्याचा उत्सव. दिपावली किंवा दिवाळी हा एक खूप जुना हजारों वर्षांपासुन चालत आलेला हिन्दू उत्सव आहे. या सणाचा उगम प्राचीन काळी आर्यांचे वास्तव्य असलेल्या उत्तर ध्रुव प्रदेशात झाला असा समज आहे. तथापि वैदिक काळात आश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून आश्वयूजी किंवा आग्रयण यासारखे यज्ञ केले जात असत, ज्यांचा समावेश सात पाकयज्ञांमध्ये होतो, परंतु या धार्मिक आचारात दिवाळीचे प्राचीन सन्दर्भ सापडतात. काही लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले तो दिवस अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतिक मानला जातो. त्याच प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो.

पावसाळ्यातील समृद्धिच्या, आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसात सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात, त्यावर माहितीची खेळणी मांडतात, धान्य पेरतात. असे म्हंटले जाते की “दिवाळी” रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमाने भरलेला, मैत्रीचा अणि मानावतेने भरलेला उत्सव आहे. पाच दिवस चालणारा हा उत्सव फार मनोरंजक असतो. लोक एक दोन आठवड्या आधीच दिवाळीची तयारी सुरू करून देतात त्यामध्ये घराची साफसफाई अणि रंगरंगोटी चा समावेश असतो कपड़े अणि जरूरी वस्तू आधीच खरेदी केले जातात. घर अणि दुकान फुलांनी अणि आंब्याच्या पानांच्या तोरणांनी सजवले जाते, आकाशकंदिल घरासमोर लावले जातात, सुंदर रांगोळ्या काढल्या जातात.

Table

दिवाळीच्या पाच दिवसांचे वर्णन: Diwali information marathi

वसुबारस

अश्विन कृष्ण द्वादशी, म्हणजे गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस याचा अर्थ वसू म्हणजे द्रव त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृति कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे महत्व विशेष आहे. या दिवशी घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने संध्याकाळी गाईची पडसासह पूजा करतात.

सवत्स धेनुची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्या घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. हळद, कुंकू, फुले, अक्षदा वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगेरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासुन अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाही. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा असते.

धनत्रयोदशी

आश्विन कृष्ण त्रयोदशी धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करून देतात. लग्नानंतर चौथ्या दिवशी तो मृत्युमुखी पडणार असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्याचांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्याचांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखित प्रकाश केला जातो. वेगवेगळया गाणी गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव,
यम आपल्या जगात परततो.

अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात अशी आख्यायिका आहे. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिसेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे. धनत्रयोदशीबदल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षी दुर्वास यांच्या शाप निवारणासाठी समुद्र मंथन केले. तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव व अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ करतात.

कुबेर, विष्णु, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग, अणि द्रवनिधी यांची पूजा करून नैवेद्य दाखवतात. देवीची उपासना करून आपल्या परिवाराच्या स्वास्थ्य अणि समृद्धीची कामना केली जाते. काही लोकांचे मनाने आहे की याच दिवशी देवी लक्ष्मी गृहप्रवेश करतात त्यामुळे दारिद्र्याचे पतन होते. सकारात्मक ऊर्जा घरात पसरली जाते. हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो.

नरकचतुर्दशी

नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतुन सोडवले. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्व असते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीराला तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान. या दिवशी पहाटे यमासाठी नरकात, म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील आदल्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केलेल्या स्वच्छतागृहात पणती लावण्याची प्रथा आहे. हा दिवस छोटी दिवाळी म्हणून जाणला जातो. हा दिवाळीचा दूसरा दिवस असतो. या दिवशी लोक घर रंगाने सजवतात. महिला हातांवर मेहंदी काढतात. दिवाळीची संपूर्ण तयारीचा आढावा घेतला जातो. लहान मुलांना उपहार दिले जातात. नरकचतुर्दशीच्या पहाटेपासून फटाके उडवायला सुरुवात होते, तिचा शेवट भाऊबीजेच्या रात्री होतो. त्यानंतर घरात उरलेले फटाके तुळशीच्या लग्नादिवशी उडवून संपवतात.

दिवाळी- लक्ष्मीपूजन

पाच दिवसांच्या दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस ज्याला आपण दिवाळी असे ही म्हणतो. आश्विन अमावस्येस लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी प्रदोषकाळी लक्ष्मी पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. या दिवशी सर्व अभ्यंगस्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.

केरसुणीने घर स्वच्छ होऊन घरातील दारिद्र्य दूर होते असे मानले जाते. आपण भारतीय चालीरिती रिवाजाप्रमाणे माता लक्ष्मी, श्री गणेश भगवान आणि माता सरस्वती यांची पूजा करतो. या देवीदेवतांना आमंत्रित केले जाते.घरात नेहमीसाठी वास करण्याचे आवाहन केले जाते. त्यासाठी दरवाजे खिडक्या खुले ठेवले जातात. तेथे सुंदर दिव्यांची सजावट व रांगोळी काढली जाते. पूजा रितीरिवाजानुसार पूर्ण झाल्यावर देवतांच्या आगमनाच्या जल्लोषात फटाके फोडून द्विगुणीत केले जाते. गोड पदार्थ खाऊ घातले जातात. एकमेकांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या जातात. या दिवशी व्यापारी व व्यावसायिक आपल्या आपल्या दुकानांमधे भगवान कुबेर अणि माता लक्ष्मीची पूजा करतात.

पाडवा / बलिप्रतिपदा

कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात. या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात अणि इडा पीड़ा टळो व बळीचे राज्य येवो असे म्हणतात. साडेतीन मुहूर्तील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला महत्व आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मी प्राप्तीसाठी नव्या वह्यांची पूजा करतात. नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात. आजही बरेच लोक या दिवशी भगवान श्री कृष्णाची गोवर्धन पूजा करतात. ग्रामीण भागात घरातील विशेष गाई बैल अणि म्हशी यांना सजवून दिवाळीचे मिष्ठान खायला देतात.

भाऊबीज

कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबिज हा सण साजरा केला जातो. दिवाळीचा पाचवा दिवस हा भाऊ बहिणीच्या अतुट अणि असीम प्रेमाच्या नात्याला जोपासण्याचा असतो. कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी बहीण आपल्या भावाला दिव्यांचा आरास अणि मोठ्या आत्मीयतेने ओवाळून त्यांच्या समृद्धी अणि भरभराटीची शुभकामना करतात. भाऊ बहिणीला छानसे उपहार देतात. व आपल्या नात्याला अधिक मधुर बनवण्याचा प्रयत्न करतात. हा दिवस रक्षाबंधनइतकाच पवित्र मानला जातो. हा दिवस भाऊ बहिणी सोबत राहून साजरा करतात विवाहित बहिणी माहेरी येतात. भारतात हा दिवस काही ठिकाणी “टीका” या नावाने ओळखला जातो.

भारत हा असा देश आहे की, जेथे विविध जातीधर्माचे समुदाय एकसाथ एका बंधनात राहतात अणि एकमेकांचे सण मोठ्या आनंदाने साजरे करतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक एकमेकाना कमी भेटतात त्यावेळी दिवाळीचा सण आपल्या प्रिय व्यक्तींना भेटण्याची आनंदमयी संधी घेऊन येते. लोक एकमेकांना शुभकामना देवून अणि उपहार व दिवाळीचे मिष्ठान देऊन आपले नाते अधिक बळकट बनवतात. भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा केली जाते. हा दिवस कायस्थ समाजाचे लोक चित्रगुप्ताची जयंती
म्हणून साजरा करतात. आजच्या काळात सर्व देश नागरिक होणार्‍या प्रदूषणाला जागरुक आहे. त्यामुळे बरेच कुटुंब प्रदूषण रहित
दिवाळी साजरी करतात. चला तर मग आपण ही येणारी दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करण्याचा संकल्प करूया. आणि देशाच्या
हितामागे योगदान देऊया.

मित्रानो (diwali information marathi) दिवाळी बद्दल दिलेली माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. हा लेख (diwali information marathi) लिहिण्यामागील उद्देश एकच आहे जो मराठी मध्ये उपलब्ध नसलेली दिवाळी सणाबद्दल माहिती होय.

आपण हे पण वाचू शकता…

१) छत्रपती शिवाजी महाराज.

२) प्राचीन भारताचा इतिहास.

Leave a Comment