IAS full form in Marathi | आय ए एस फुल फॉर्म इन मराठी | IAS म्हणजे काय?

नमस्कार मित्रानो, आज आपण IAS full form in Marathi या लेखात IAS म्हणजे काय? IAS म्हणजे काय आणि IAS चा मराठी मध्ये फुल फॉर्म काय होतो ते बघणार आहोत. तसेच आपण बघणार आहोत समाजात IAS या पदाची भूमिका काय असते आणि IAS व्यक्ती ती कोणत्या पद्धतीने पार पाडत असतो.

बऱ्याच वेळेस विविध परीक्षामध्ये IAS बद्दल माहिती विचारली जाते. त्यामुळे आपल्या साठी हे माहित करून घेणे अति महत्वाचे असते. जर तुम्हाला IAS चे फुल फॉर्म किंवा IAS शी संबंधित मूलभूत माहिती माहीत नसेल, तर या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला IAS बद्दल सखोल माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. तर मग आरंभ करूया आणि जाणून घेऊया IAS म्हणजे काय आणि IAS चे पूर्ण रूप काय आहे.

Table

IAS full form in Marathi:

IAS चा फुल फॉर्म काय आहे:

IAS चा फुल फॉर्म आहे (Indian Administrative Service) भारतीय प्रशासकिय सेवा. IAS अधिकारी हे भारतीय समाजात शक्ती आणि प्रतिष्ठेचे पपद मानले जाते. भारतातील सर्व सरकारी यंत्रणांच्या चाव्या IAS अधिकाऱ्यांच्या हातात असतात. आपण बघतो कि मोठमोठ्या शहरात जिल्हाधिकारी हे पद असते ते IAS या सेवेतून आलेले असते. तसेच काही राज्यात IAS (DM) अंतर्गत काम करतात. आयएएस अधिकाऱ्याकडे अमर्यादित अधिकार असतात, ज्यामुळे या पदाची जबाबदारी आणि प्रतिष्ठा आणखी वाढते.

इतक्या मोठ्या जबाबदारीसाठी योग्य व्यक्तीची निवड करणे ही एक मोठी जबाबदारी आहे, म्हणूनच नागरी सेवा परीक्षा अशा प्रकारे तयार केली गेली आहे की जी केवळ प्रतिभावान उमेदवारच ही परीक्षा उत्तीर्ण करू शकतात.

नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होण्याची सरासरी फक्त १ लाख उमेदवारांपैकी फक्त १६ -१७ उमेदवार निवडले जातात यावरून आपण समजू शकतो कि या परीक्षेसाठी किती स्पर्धा असते. सामान्य पदवीधरांपासून ते डॉक्टर, अभियंते, शास्त्रज्ञांपर्यंत सर्वजण या परीक्षेत बसतात. म्हणून, या परीक्षेतील निवड खूप कठीण असते. त्यामुळे भारतात नागरी सेवा परीक्षा (CSE) ही आपल्या देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते.

IAS बद्दल महत्वपूर्ण:

IAS परीक्षा ही भारतातील मुख्य परीक्षा आहे आणि सर्वात कठीण देखील. IAS ही समाजाची सेवा करण्यासाठी सर्वोत्तम अखिल भारतीय सेवा आहे. आपल्या देशातील तरुण आयुष्यात एकदा तरी आयएएस अधिकारी होण्याची इच्छा बाळगत असतात, आणि त्यापैकी बरेच यशस्वी होतात. UPSC द्वारे दरवर्षी हि परीक्षा घेतली जाते. अखिल भारतीय सेवा आणि विविध केंद्रीय नागरी सेवांसाठी दरवर्षी नागरी सेवा परीक्षा (CSE) आयोजित करते.

आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्याना आरक्षण:

आधीच अस्तित्वात असलेल्या आरक्षण श्रेणी व्यतिरिक्त, या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाने आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग (EWS) श्रेणीची एक नवीन श्रेणी जोडली आहे. जिचा उद्देश भारत सरकारद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना आरक्षण प्रदान करणे हा आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग (EWS) उमेदवारांसाठी पात्रता अटी त्याच असून त्या सामान्य उमेदवारांच्या पात्रता अटी सारख्या आहेत.

IAS ला अधिकृतपणे नागरी सेवा परीक्षा (CSE) म्हटले जाते केंद्रीय भरती एजन्सी, केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) द्वारे दरवर्षी या परीक्षांचे आयोजन केले जाते.

IAS परीक्षेत निवड:

आयएएस ही सेवा नसून मोठी जबाबदारी आहे. IAS अधिकारी एकापेक्षा जास्त स्तरावरील वेगवेगळ्या विभागातील अधिकार्याच्या प्रयत्नांना योग्य दिशा देण्याचे काम करतात. ते जिल्ह्यात एक प्रतिनिधी म्हणून काम करतात आणि प्रत्येकाला चांगले काम करण्याची प्रेरणा देतात.

शहर असो किंवा जिल्हा, मग ते राज्य सरकार असो किंवा भारत सरकार, प्रत्येक विभागाच्या शीर्षस्थानी IAS अधिकारी नेमलेले असतात. दरवर्षी, यूपीएससी फेब्रुवारी महिन्यात नागरी सेवा परीक्षेची अधिसूचना प्रस्तुत केली जाते. ज्यात IAS सोबत सुमारे २४ केंद्रीय नागरी सेवाची जाहिराती प्रदर्शित केली जाते.

भारतात IAS – भारतीय प्रशासकीय सेवा, IPS – भारतीय पोलीस सेवा आणि IFS – भारतीय वन सेवा यांना अखिल भारतीय सेवा म्हणून अधिसूचित केले आहे. तसेच उर्वरित सेवा पण केंद्रीय नागरी सेवांमध्येच येतात.

IAS परीक्षेसाठी पात्रतेचे निकष:

आता आपण IAS परीक्षेसाठी काय पात्रता असतात ते पाहू.

राष्ट्रीयत्व:

भारतीय नागरिकांसह तिबेट, नेपाळ आणि भूतानचे नागरिक या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात, परंतु ते आयएएस आणि आयपीएसमध्ये भरतीसाठी उमेदवार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

IAS शैक्षणिक पात्रता:

या परीक्षेसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. पदवीसाठी किमान टक्केवारीची अट नाही. केवळ आवश्यक अट अशी आहे की पदवी सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून घेतलेली असावी. परीक्षेची रचना अशी केली गेली आहे की वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील व्यक्तींना वेगवेगळ्या श्रेणीत बसवले जाते. ज्या उमेदवारांना पदवी अभ्यासक्रमामध्ये चांगले गुण आहेत, त्यांना कोणताही फायदा नाही, फक्त ते या साठी उतीर्ण असणे आवशक आहे.

जे उमेदवार त्यांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात आहेत असे उमेदवार त्या कालावधीत पदवी पूर्ण करतील या अटीच्या अधीन राहून अर्ज करू शकतात.

IAS साठी वय मर्यादा:

या परीक्षेसाठी उमेदवाराचे किमान वय २१ वर्षे असावे. वेगवेगळ्या श्रेणींसाठी वेगळी वयोमर्यादा निर्धारित करण्यात आली आहे. सामान्य श्रेणीसाठी ३२ वर्षे, ओबीसीसाठी ३५ वर्षे आणि एससी आणि एसटीसाठी ३७ वर्ष कमाल वय मर्यादा असेल. तसेच अपंग श्रेणीत अधिक शिथिलता आहे. तसेच अधिसूचना वर्षाच्या १ ऑगस्टपासून वयाची गणना केली जाईल.

IAS अधिकाऱ्यांचे पदे:

  • जिल्हाधिकारी
  • आयुक्त
  • मुख्य कॅबिनेट सचिव
  • निवडणूक आयुक्त इ.

UPSC चा फॉर्म भरण्याशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी:

फॉर्म भरताना उमेदवाराला नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव इत्यादी सर्व मूलभूत माहिती भरावी लागते. नागरी सेवा परीक्षेसाठी केंद्र चिन्हांकित करणे आवशक आहे. ही परीक्षा देशातील ७२ शहरांमधील वेगवेगळ्या केंद्रांवर एकाच वेळी घेतली जाते.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उमेदवारांना फॉर्म भरताना नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी पर्यायी विषय पण निवडावा लागेल. अधिसूचनेमध्ये, २६ पर्यायी विषयांपैकी एक निवडून फॉर्ममध्ये चिन्हांकित करणे आवश्यक आहे. फॉर्म भरताना, उमेदवारांनी त्यांच्या परीक्षेचे माध्यम देखील भरणे आवश्यक आहे. IAS ची पूर्व परीक्षा हि फक्त हिंदी किवा इंग्रजी मध्ये देऊ शकतात.

मित्रानो, IAS full form in marathi हा लेख आपणास कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा.

आपण हे पण वाचू शकता..

१) UPSC फुल फॉर्म इन मराठी.

२) MPSC फुल फॉर्म इन मराठी.

3) Global warming essay in English.

Leave a Comment