गोदावरी नदीची माहिती | गोदावरी नदी महाराष्ट्र | Godavari nadichi mahiti

नमस्कार मित्रानो, आज आपण महाराष्ट्रातीलगोदावरी नदीची माहिती व गोदावरी नदीचे खोरे बघणार आहोत. गोदावरी नदीचे खोरे हे महाराष्ट्रातीलच नसून तर भारतातील समृद्ध खोरे म्हणून ओळखले जाते. दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी असून ती दख्खनच्या पठारावर पश्चिम घाटापासून पूर्व घाटापर्यंत वाहून पुढे बंगालच्या उपसागराला मिळते. महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील गंगा नदीच्या खालोखाल कि एक पवित्र नदी म्हणून ओळखली जाते तिला दक्षिण भारतातील गंगा असेही संबोधले जाते.

Table

गोदावरी नदीची माहिती:

गोदावरी नदी प्रणाली चे क्षेत्र:

सह्याद्री पर्वतात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी टेकडीवर गोदावरी नदीचा उगम होतो. हे ठिकाण बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. गोदावरीचे उगमस्थान अरबी समुद्रा पासून पूर्वेकडे फक्त ८० किलोमीटर अंतरावर आहे. गोदावरी नदीच्या प्रवाहाची सर्वसाधारणपणे दिशा पूर्व – आग्नेयेस अशी आहे. दख्खनच्या पठारावरून वाहणारी नदी महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्र प्रदेशातून वाहूत जाऊन पुढे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. गोदावरीची एकून लांबी सुमारे १४६५ कि.मी असून क्षेत्र १५३७७९ चौ .कि. मी आहे.

गोदावरी नदीची महाराष्ट्रात एकून ६६८ किलोमीटर लांबीचा प्रवास होतो, तसेच या नदीचे १ लाख ५३ हजार ७७९ चौरस किलोमीटर क्षेत्र विस्तारलेले आहे. महाराष्ट्रातील गोदावरी खोऱ्यामधून दरवर्षी सुमारे ३७ हजार ८३० दशलक्ष घनमीटर चा पाण्याचा प्रवाह वाहतो.

गोदावरी खोऱ्यामध्ये प्रवाहाच्या पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग, नगर जिल्ह्याचा उत्तर भाग व मराठवाड्यातील सर्व जिल्हे येतात. याशिवाय पूर्व महाराष्ट्रात यवतमाळ,वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली हे विदर्भाचे जिल्हे गोदावरी खोऱ्याने व्यापलेले आहेत. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात गोदावरी खोऱ्याने एकूण ५० टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.

गोदावरी नदीच्या खोऱ्याचे विभाग:

महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या खोऱ्याचे विभाग खालील प्रमाणे – १ गोदावरी नदीचे खोरे २ गोदावरी पूर्णा नदी चे खोरे 3 मांजरा नदीचे खोरे ४ पैनगंगा नदीचे खोरे ५ वर्धा नदीचे खोरे ६ प्राणहिता नदी चे खोरे ७ वैनगंगा नदीचे खोरे ८ इंद्रावती नदीचे खोरे.

१) गोदावरी नदीचे खोरे:

नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी टेकड्या मधून उगम झाल्यानंतर गोदावरी नदी डोंगराळ भाग ओलांडून खाली येते. तसेच नाशिकला येईपर्यंत नदीचे पात्र अरुंद असून तिचा प्रवाह खडकाळ प्रदेशातून होतो. गोदावरीच्या उजव्या तीरावरून किंवा दक्षिणेकडून दारणा, प्रवरा, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका या नद्या मिळतात. तर डाव्या बाजूकडून किंवा उत्तरेकडून कादवा, शिवना, खाम या नद्या मिळतात. तसेच गोदावरी नदी अहमदनगर, औरंगाबाद,व बीड जिल्ह्याची उत्तर सरहद औरंगाबाद व जालना जिल्ह्याशी निगडित आहे. पुढे तेलंगणा मधून नांदेड जिल्ह्यात प्रवेश करून गोदावरी नदी पूर्वेकडे वाहते आणि पुन्हा गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण सरहद्दी जवळून महाराष्ट्रात प्रवेश करते. येथे उत्तर-दक्षिण वाहणाऱ्या प्राणहिता आणि इंद्रावती नद्या येऊन मिळतात.

तसेच कळसुबाई शिखराजवळ उगम पावणारी दारणा नदी नाशिक च्या दक्षिणेला २४ किलोमीटर अंतरावर उजव्या किनाऱ्याने गोदावरीला मिळते. हरिश्चंद्र डोंगरावरून भंडारदर्‍या जवळ प्रवरा नदी उगम पावते. प्रवरा व मुळा नदीच्या संयुक्त प्रवाहावर नेवासे गाव वसलेले आहे. पुढे गोदावरीस प्रवाह उजव्या बाजू कडून मिळतो. सात माळाच्या डोंगरात शिवना नदी उगम पावून दक्षिणेला वाहते व गोदावरीस मिळते. याशिवाय बालाघाट डोंगरात बीड जिल्ह्यातून उगम पावणारी सिंदफना नदी पैठण च्या पूर्वेस गोदावरीला येऊन मिळते.

२) गोदावरी पूर्णा नदी चे खोरे:

अजिंठ्याच्या डोंगरात पूर्णा नदी ( दक्षिण पूर्णा ) उगम पावते. व पूर्णा स्थानकाच्या दक्षिणेकडे परभणी वरून आलेली पूर्णा नदी डावीकडून गोदावरीस मिळते. त्याआधी पूर्णा व दुधना नद्यांचा संगम होतो. पूर्णा नदीला डाव्या तीरावरून खेळला तर उजव्या तीरावरून अंजना, गिरजा, कापरा, दुधना या नद्या येऊन मिळतात.

३) मांजरा नदीचे खोरे:

बीड जिल्ह्यात पाटोदा पठारावरील आंबेजोगाईच्या दक्षिणेकडे मांजरा नदी वाहते. नंतर लातूर जिल्ह्यातून लातूर व निलंगा तालुक्यामधून वाहते. पुढे कर्नाटक मध्ये काही अंतर गेल्यावर पुन्हा लातूर जिल्ह्याच्या सरहदी वरून वाहते आणि नांदेड वरून पुढे गेल्यावर महाराष्ट्राच्या सीमेवर कोडलवाडी जवळ उजवीकडून गोदावरीस मांजरा नदी मिळते. या खोऱ्यात तावरजा, तेरणा, गिरणा, मन्याड या नद्या वाहतात. बीड जिल्ह्याची दक्षिण सरहद मांजरा नदीमुळे निर्माण झाली आहे. नांदेड ते नाशिक दरम्यान गोदावरी नदी ज्या भागातून वाहते तो भाग कठीण स्वरूपाचा असल्याने अपक्षरण कार्य कमी असते. सह्याद्री व डोंगररांगा मधून वाहणाऱ्या उपनद्या मुळे गोदावरी खोऱ्यात गाळाचे मैदान निर्माण झाले आहे. मुख्य गोदावरीच्या खोऱ्यात नाशिक, नेवासे, औरंगाबाद, जालना, पैठण, परभणी, नांदेड,व उदगीर सारखी महत्त्वाची शहरे वसलेली आहे.

४) पैनगंगा नदीचे खोरे:

अजिंठा टेकड्यात अग्नेय उतारावरून पैनगंगा नदीचा उगम होतो. पैनगंगा ही नदी बुलढाणा व यवतमाळ पठारावरून पूर्वेकडे वाहत जाते आणि यवतमाळच्या पूर्व सरहदी वर बल्लारपूर येथे वर्धा नदीला पैनगंगा नदी येऊन मिळते. पैनगंगा नदी ही वाशिम व यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिण सीमा आहेत. पैनगंगा नदीच्या उजव्या किनाऱ्याने कयाधू तर डाव्या किनाऱ्याने पूस अडान, अरुणा, वाघाडी, खुनी या उपनद्या येऊन मिळतात .

५) वर्धा नदीचे खोरे:

मध्य प्रदेशात बैतुल जिल्ह्यात सातपुडा रंगांच्या दक्षिण उतारावर वर्धा नदीचा उगम होतो आणि पूर्वेकडे तापी खोऱ्यात वाहणाऱ्या पूर्णा नदी पासून अगदी तकलादू तकलादू जल विभाजक का द्वारे वेगळी झालेली आहे. साधारणपणे उत्तर-दक्षिण दिशेने वर्धा नदी ४५५ किलोमीटर वाहते. वर्धा नदीला उजव्या किनाऱ्याने वेमला,निरगुडा,व विदर्भ तर डाव्या किनाऱ्याने कार, बोर, नंद,इरई,या उपनद्या मिळतात. वर्धा नदी हि वर्धा -अमरावती जिल्हा व पुढे यवतमाळ जिल्हाची पूर्व सरहद निर्माण करते.

६) वैनगंगा नदीचे खोरे:

महाराष्ट्राच्या सरहदी बाहेर मध्यप्रदेशात मैकल पर्वत रांगात शिवनी जिल्ह्यात दरकेसा टेकड्यांजवळ भाकल येथे वैनगंगा नदी उगम पावून दक्षिणेकडे सुमारे 300 किलोमीटर अंतर जाते. नागपूरच्या मैदानावरून वाहत येणार्काया कान्हा, पेंच तसेच गोंदिया जिल्ह्यातून वाहत येणारी बाग या सर्व नद्या वैनगंगेस मिळतात. चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा व वैनगंगा या नद्यांच्या संगम चंद्रपूरच्या दक्षिणेस होतो. यामुळे तिला प्राणहिता या नावाने ओळखले जाते. याशिवाय नाग, अंधारी, सूर, गाढवी वगैरे उपनद्या वैनगंगेस मिळतात. चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्याची उत्तर दक्षिण सरहद गंगा नदी मुळे निर्माण होते.

७ ) प्राणहिता नदी चे खोरे:

वर्धा व पैनगंगा नदी यांचा एकत्रित प्रवाह व पुढे वैनगंगेबरोबर संयुक्त प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात. महाराष्ट्र व तेलंगणातील सुमारे ११७ किलोमीटरची सरहद तयार करते. गडचिरोली जिल्ह्यात सरहद्दीवर गोदावरी ला प्राणहिता नदी येऊन मिळते.

८ ) इंद्रावती नदी चे खोरे:

मध्य प्रदेशात उगम पावणारी इंद्रावती नदी विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्याची अग्नेय सरहद निर्माण करून वाहते व ती पुढे गोदावरी नदीस मिळते. इंद्रावती नदीला बांदिया, अकेरा, डोंगरी व कोठारी या उपनद्या मिळतात.

गोदावरी आणि तिच्या उपनद्यांनी नदीच्या खोऱ्यातील दख्खनच्या लाव्हाची झीज केली आहे. खोरयाची ची सरासरी उंची ३५० ते ५५० मीटर दरम्यान आहे. गोदावरी खोऱ्यात जसजसे पूर्वेकडे जावे तसतसा तिचा विस्तार कमी होत जातो. नांदेड जवळ तर खोऱ्याची रुंदी फक्त ५० किलोमीटर आहे, तर त्याचप्रमाणे खोऱ्याच्या वरच्या बाजूस त्याची रुंदी १५० ते २०० किलोमीटर आहे गोदावरी खोऱ्याची उत्तर व दक्षिण जलविभाजक स्पष्टपणे दिसतात आणि ते तीव्र उताराचे आहेत. उत्तरेकडून सातमाळा व अजिंठा डोंगरांची मोठ्या प्रमाणात नदीने झीज केले आहे. दक्षिणेस बालाघाट रांगेमधील लहान-लहान नद्या देखील त्यांच्या क्षेत्रात अपक्षरनाचे कार्य मोठ्या प्रमाणात करतात. काही ठिकाणी नदीचौर्य देखील पाहावयास मिळते.

मित्रानो, आज आपण या लेखात गोदावरी नदीची माहिती बघितली. आपणास गोदावरी नदीची माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

आपण हे पण वाचू शकता…

१) भारतातील सर्वात मोठे धरण.

२) भीमा नदीची माहिती.

Leave a Comment