नमस्कार मित्रांनो, आज आपण “संयुक्त राष्ट्र संघटनेवर चर्चा करणार आहोत. म्हणजेच युनायटेड नेशन. संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना २४ ऑक्टोबर १९४५ रोजी करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्र संघटना ही एक आंतरराष्ट्रीय संस्था असून ती मानव विकासासाठी काम करत आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेत प्रथमच सॅन फ्रान्सिस्को येथे झालेल्या परिषदेत ५१ देशांनी फॉर्मवर सही केली.
संयुक्त राष्ट्र संघटनेची काही महत्वपूर्ण मुद्दे
Table
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापने मागील उद्देश
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेचा मुख्य उद्दीष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता, आर्थिक विकास, आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी हक्कांचे संरक्षण , आरोग्य आणि कल्याणकारी योजना राबवणे, जगाला युद्धाच्या विनाशकारी परिणामापासून वाचविणे यासारखे बरेच उद्देश सोबत घेऊन हि संघटना काम करत आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय
संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय न्यूयॉर्क शहरा जवळील मॅनहॅटन बेट येथे आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेचे नामकरण
संयुक्त राष्ट्र संघटनेला संयुक्त राष्ट्र हे नाव डी. रुझवेल्ट यांनी दिले होते.
संयुक्त राष्ट्र संघटनेचा लोगो
“जैतुनाच्या दोन शाखा निळ्या पार्श्वभूमीवर वरच्या बाजूस उघडतात आणि त्यावर जगाचे मानचित्र आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अधिकृत भाषा
संयुक्त राष्ट्र संघाने ६ भाषांना अधिकृत भाषांचा दर्जा दिला आहेत. ज्या खालीलप्रमाणे आहेतः अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, यापैकी संस्थेचे कार्य इंग्रजी आणि फ्रेंच भाषेत चालते.
संयुक्त राष्ट्र संघटनेचे एकून सदस्य देश
सुरुवातीला संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांची संख्या ५१ होती, ती सध्या १९3 वर जाऊन पोचली आहे, या संघटनेचा शेवटचा सदस्य देश दक्षिण सुदान आहे.
संयुक्त राष्ट्रांबद्दल काही महत्वाची माहिती
१. संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कधी झाली?
पहिल्या महायुद्धाच्या झळा सहन कराव्या लागल्या नंतर १९२९ मध्ये जगातील बड्या देशांनी “लीग ऑफ नेशन्स” नावाची संस्था स्थापन केली होती. परंतु दुर्दैवाने ही संघटना आपले उद्दिष्ट साध्य करू शकली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे काही देशांची वैयक्तिक महत्वाकांक्षा होय. त्याचा परिणाम असा झाला की संपूर्ण जग दुसर्या महायुद्धाच्या दिशेने ढकलले गेले. आणि १९3९ ते १९४५ पर्यंत संपूर्ण जगाला या विध्वंसक परिणामांचा फटका बसला. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर जगाला शांतता निर्माण करण्यासाठी काम करणाऱ्या संघटनेची आवश्यकता वाटत होती. हे उद्दिष्ट लक्षात घेऊन जून १९४५ मध्ये अमेरिकेत एक परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेतून २४ ऑक्टोबर १९४५ रोजी युनायटेड नेशन्स म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघटना स्थापन झाली. सुरवातीला या संघटनेच्या सदस्यांची संख्या ५१ होती, जी वेळोवेळी वाढत गेली. सध्या संयुक्त राष्ट्र संघटनेत इकून १९३ देश सदस्य आहे. सर्वात शेवटी १९३ वा देश म्हणून दक्षिण सुदान या देशाने सदस्यत्व घेतले.
संयुक्त राष्ट्र संघटनेचे महत्वाचे भाग
संयुक्त राष्ट्रांचे ५ विभाग आहेत ते खालील प्रमाणे.
१) महासभा
२) सुरक्षा परिषद
३) आर्थिक व सामाजिक परिषद
४) आंतरराष्ट्रीय न्यायालय
५) सचिवालय
१ महासभा
संयुक्त राष्ट्र संघटनेचा मुख्य भाग म्हणजे महासभा, याला जागतिक संसद असेही म्हणतात. महासभेमध्ये संघटनेच्या सर्व देशांचे प्रतिनिधी असतात. संघटनेशी संबंधित सर्व कायदे करण्याचा अधिकार महासभेला देण्यात आला आहे. महासभेचे अधिवेशन वर्षातून एकदा तरी झाले पाहिजे असा नियम आहे. हे अधिवेशन साधारणपणे सप्टेंबर महिन्यात झाले पाहिजे. हे अधिवेशन न्यूयॉर्कमध्ये होते. ज्यामध्ये सर्व सदस्य देशांचे प्रतिनिधी सहभागी होतात आणि संयुक्त राष्ट्रांबद्दल आपले विचार मांडतात. एक सदस्य देश जास्तीत जास्त 5 प्रतिनिधी महासभेत पाठवू शकतो.
2 सुरक्षा परिषद
जगात शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने सुरक्षा परिषदेची स्थापन करण्यात आली होती . सुरक्षा परिषदेत एकूण 15 सदस्य असतात, त्यातील पाच सदस्य कायमस्वरुपी आणि 10 अस्थाई सदस्य असतात. अस्थाई सदस्यांचा कार्यकालाची मुदत 2 वर्षांसाठी निश्चित केली जाते. अस्थाई सदस्य जगातील सर्व खंडातून प्रमाणशीर पणे निवडले जातात.
सुरक्षा परिषदेत अमेरिका, चीन, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन आणि रशिया हि पाच राष्ट्रे स्थायी असून त्यांना नकाराधिकार ( विटो ) आहे. व्हेटोला निषेध हक्क म्हणून पण ओळखले जाते. कोणताही कायदा तयार करतानी जर स्थायी सदस्यांनी नकाराधिकार वापरल्यास त्याचे कायद्यात रुपांतर होत नाही. भारत सुरक्षा परिषदेत दोनदा अस्थाई सदस्य राहिला आहे. तसेच भारत कायमस्वरुपी सदस्य होण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
३ आर्थिक आणि सामाजिक परिषद
आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या सदस्य देशांची संख्या 54 आहे. युद्धासारख्या विषयांना वगळता इतर सर्व विषय जे आंतरराष्ट्रीय महत्वाचे आहेत ते आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या कार्यक्षेत्रात येतात. या परिषदेची बैठक वर्षातून दोनदा घेतली जाते, ज्यात एप्रिल ला न्यूयॉर्क तर जुलै मध्ये जिनिव्हा येथे आयोजित केली जाते. आर्थिक आणि सामाजिक परिषदेत आशियामधील ११ सदस्य देश आहेत.
४ आंतरराष्ट्रीय न्यायालय
आंतरराष्ट्रीय न्यायालय स्थापना ३ एप्रिल १९४६ रोजी झाली, त्याचे मुख्यालय नेदरलँड्सच्या हेग शहरात आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 22 असते. तसेच न्यायाधीशांचा कार्यकाल 9 वर्षे इतका असतो. आहे, तेथे नाही. न्यायाधीशांना पुन्हा निवडनुकीस उभे राहण्यास कोणतेही निर्बंध नाहीत.
५ सचिवालय
संयुक्त राष्ट्राची सर्व प्रशासकीय कामे सचिवालयातून केली जातात. सचिवालय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काम करत असते. मुख्य सचिवाची सुरक्षा मंडळाच्या कोणत्याही स्थायी सदस्य देशामधून नियुक्ती केली जात नाही. संयुक्त राष्ट्राचे पहिले महासचिव होते त्रिगवेली आणि विद्यमान महासचिव एंटोनियो गुटेरेस आहेत.
संयुक्त राष्ट्राच्या इतर प्रमुख भागीदार संस्था आणि मुख्यालय
1) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी – वॉशिंग्टन डीसी – अमेरिका
2) वर्ल्ड बँक – वॉशिंग्टन डीसी – अमेरिका
3) जागतिक कामगार संघटना – जिनिव्हा – स्वित्झर्लंड
4) जागतिक आरोग्य संघटना – 1948 – जिनिव्हा -स्वित्झर्लंड
5) युनेस्को- 1946 – पॅरिस – फ्रान्स
6) जागतिक हवामान संस्था – 1951 – जिनिव्हा – स्वित्झर्लंड
संयुक्त राष्ट्रसंघाने चालविलेले मुख्य कार्यक्रम….
१. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम
हा कार्यक्रम संयुक्त राष्ट्र संघाने १९६५ मध्ये सुरू केला होता, ज्याचे मुख्य उद्दीष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर गरीब आणि मागासलेल्या राष्ट्रांना मदत करणे हे आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम दरवर्षी मानव विकास निर्देशांक जाहीर करतो. यामध्ये सर्व देशांचा मानव विकास डेटा सादर केला जातो. मानवी विकास निर्देशांकात भारताचा क्रमांक १२९ वा आहे.
२. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम
हा कार्यक्रम संयुक्त राष्ट्राने १९७२ मध्ये सुरू केला होता. या संस्थेचे मुख्यालय नैरोबी केनिया येथे आहे. या कार्यक्रमाचा उद्देश जगभरातील पर्यावरणीय समस्यांचा विचार करणे आणि त्यांचे निराकरण करणे हा आहे. या संस्थेमार्फत पर्यावरण संरक्षणाची कामे केली जातात. या कार्यक्रमाची सुरवात स्टॉकहोम येथे झालेल्या परिषदेतून करण्यात आली होती.
३ .संयुक्त राष्ट्र बाल विकास निधी
ही संस्था युनिसेफ म्हणून ओळखली जाते. या संस्थेची स्थापना १९४६ साली करण्यात आली होती. या संस्थेचा मुख्य उद्देश दुसरया महायुद्धामुळे त्रस्त झालेल्या मुले व माता यांना मदत करणे होता. ही एक पोषण आणि संगोपनाशी संबंधित एक संस्था आहे. या संस्थेला १९६५ साली नोबेल पुरस्कार देखील देण्यात आला होता.
संयुक्त राष्ट्र आणि भारत
१९४२ च्या वॉशिंग्टन परिषदेच्या घोषणा पत्रावर स्वाक्षर्या करणा सदस्यांपैकी भारत एक आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे नियम, तत्त्वे आणि कायदे भारत नेहमी पाळत असतो. विशेषत: जागतिक शांततेसाठी संयुक्त राष्ट्र संघाने केलेले प्रयत्न . संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने अतुलनीय योगदान दिले आहे. भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अस्थाई सदस्य राहिला आहे. तसेच विजया लक्ष्मी पंडित ह्या महासभेच्या अध्यक्षही राहिल्या आहे.
दारिद्र्य निर्मूलन, हवामान बदल, दहशतवाद, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि शांतता, मानवाधिकार, आर्थिक आणि सामाजिक विकास इत्यादी मुद्द्यांवर भारत संयुक्त राष्ट्राबरोबर ठामपणे उभा आहे, व समाजासाठी जनकल्याणकारी योजना राबवित आहे. माजी पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी, माजी परराष्ट्रमंत्री कै. श्रीमती सुषमा स्वराज, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महासभेच्या मंच वरुन हिंदीत भाषणही केले.
भारताच्या सक्रिय भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून 21 जूनला संयुक्त राष्ट्र संघाने मान्यता दिली. ही भारतासाठी एक मोठी उपलब्धी आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील काश्मीर वादावर संयुक्त राष्ट्रांनीही आपले मत व्यक्त केले आहे. काश्मीर वादाच्या महत्त्वपूर्ण विषयावर संयुक्त राष्ट्र संघात भारताच्या बाजूने रशियाने आपला विटो वापरला होता. सुरक्षा परिषदेत कायमस्वरुपी सदस्यत्व मिळविण्यासाठी सध्या भारत प्रयत्नशील आहे.
हा लेख आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.
आपण हे पण वाचू शकता..