Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana 2021
शेतकर्यांना सिंचनाची सुविधा मिळावी यासाठी राज्य सरकारतर्फे महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत, राज्य सरकार महाराष्ट्रातील शेतकर्यांना शेती सिंचनासाठी सौर पंप उपलब्ध करुन देईल. सर्व पंप सौरपंपात रूपांतरित होईल. मुख्यामंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत नवीन सौर पंप बसविण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून या योजने अंतर्गत अनुदान उपलब्दिध करून दिले गेले आहे .
Table
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना – 2021
या योजनेंतर्गत राज्य सरकारने शेतकर्यांना १,००,००० कृषी पंप देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेस अटल सौर कृषी पंप योजना असेही म्हणतात. या योजनेंतर्गत येत्या तीन वर्षात १ लाख सोर पंप बसविण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे (पुढील 3 वर्षात 1 लाख पंप बसविण्याचे लक्ष्य आहे). राज्य सरकार ने ३१ जानेवारी २०१९ पूर्वी मुख्यमंत्री सौर पंप योजनेच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली . त्यानुसार सौर पंप बसविण्याची प्रक्रिया फेब्रुवारी २०१९ च्या पहिल्या आठवड्यात सुरू झाली. या योजनेंतर्गत आपल्या शेतात सोलर पंपद्वारे सिंचनासाठी सौर पंप मिळवू इच्छिणारे राज्यातील इच्छुक लाभार्थी या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना २०२१ चे उद्दीष्ट
आपल्याला माहिती असून, राज्यात आजही असे बरेच शेतकरी आहेत जे आपल्या शेतात डिझेल आणि इलेक्ट्रिक पंपद्वारे शेती करतात, त्यामध्ये ते खूप मोठ्या प्रमाणात खर्च करतात कारण डिझेल पंप परवडणे योग्य नाही. ही समस्या लक्षात घेता राज्य सरकारने ही योजना महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना २०२१ च्या अंतर्गत सुरू केली असून, राज्यातील शेतकऱ्यांना सौर पंप उपलब्ध करुन दिले जात आहे . सौर पंप योजनेंतर्गत राज्य सरकार पंप किंमतीच्या ९५% अनुदान देते. लाभार्थीद्वारे केवळ ५% रक्कम दिली जाईल. महाराष्ट्र सौर पंप योजना २०२१ च्या माध्यमातून सौर पंपाचे वितरण करून शेतकरयांचे उत्पन्नही वाढेल आणि त्यांना बाजारपेठेपेक्षा जास्त किंमतीला पंप खरेदी करावा लागणार नाही. तसेच हे सौर पंप पर्यावरण पूरक असल्याने प्रदूषण होणार नाही.
१ | योजनेचे नाव | मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना |
२ | सुरु केली | महारष्ट्र शासन |
३ | लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी |
४ | उद्देश्य | शेतकर्यांना सौर पंप प्रदान करणे |
५ | अधिकृत संकेतस्थळ | https://www.mahadiscom.in/solar/index.html |
या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील शेतकरयांना देण्यात येत आहे.
5 एकरपेक्षा कमी शेतजमिन असलेल्या सर्व शेतकर्यांना शेतांसाठी 3 एचपी आणि 5 एचपी चे सोर पंप मिळतील.
महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या पहिल्या टप्प्यात सरकारने २५ हजार सौर पंपांचे वितरण केले असून दुसर्या टप्प्यात ५० हजार सौर पंपांचे वितरण करण्यात आले आहे. तर तिसर्या टप्प्यात सरकार २५ हजार सौर पंप शेतकर्यांना वाटप करणार आहे.
या योजनेंतर्गत राज्यातील शेतकर्यांना सिंचनासाठी कृषी पंप उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
ज्या शेतकर्यांकडे यापूर्वी वीज जोडणी आहे त्यांना योजनेंतर्गत सौरऊर्जेद्वारे संचालित एजी पंपचा लाभ दिला जाणार नाही.
महाराष्ट्र सौर पंप योजना २०२१ मुळे २०२१ पासून सरकारचा अतिरिक्त वीज भार कमी होईल.
जुने डिझेल पंप नवीन सौर पंपात बदलले जातील. जेणेकरून वातावरणातील प्रदूषणही कमी होईल.
सिंचन क्षेत्रात विजेसाठी शासनाचे दिले जाणारे अनुदानदेखील कमी होईल त्सयामुळे सरकारवरील काही प्रमाणात असलेले ओझे कमी होईल .
योजनेच्या पात्रता
पाण्याचे निश्चित स्रोत असलेले शेतकरी या योजनेंतर्गत पात्र आहेत.
पारंपारिक वीज जोडणी नसणे .
पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचे विद्युतीकरण न झालेले क्षेत्रातील शेतकरी. (म्हणजेच महावितरण कंपनीने)
दुर्गम आणि आदिवासी शेतकरी.
वनविभागातील एनओसी अभावी अद्याप विद्युतीकरण झाले नाहीत अश्या भागातील शेतकरी.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 चा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे
ओळखपत्र, अर्जदाराचे आधार कार्ड, पत्ता पुरावा, शेतातील कागदपत्रे,
बँक खाते पासबुक, मोबाइल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 मध्ये अर्ज कसा करावा ?
राज्यातील इच्छुक ज्या लाभार्थ्यांना महाराष्ट्र सौर पंप योजना 2021 अंतर्गत अर्ज करायचे आहेत त्यांनी खाली दिलेल्या पद्धतीचा अवलंब करावा.
सर्व प्रथम अर्ज करणाऱ्या व्यक्तीला या योजने अंतर्गत दिली गेलेली वेबसाईट वर जावे लागेल .
येथे क्लिक करा > वेबसाईट
येथे क्लिक केले कि प्रथम अर्जदारास योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर घेऊन जाईल . अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर मुख्यपृष्ठ उघडेल.
या मुख्यपृष्ठावर आपल्याला benefiary services चा पर्याय दिसेल ,
त्यावर क्लिक केले कि apply online हा पर्याय ओपन होईल.
APPLY ONLINE वर क्लिक करून तुमी ३ किंवा ५ hp साठी क्लिक करू शकता .
क्लिक केले कि खाली दिलेला अर्ज ओपन होईल .
हा फॉर्म तुमाला संपूर्ण भरावा लागेल .
तसेच हा फॉर्म भरल्यानंतर जी हवी असेल ते दस्तऐवज अपलोड करावे लागतील .
हे सर्व भरले कि, अर्ज सबमिट वर क्लिक करावे लागेल .
या नुसार आपला अर्ज यशस्वीरीत्या सबमिट होईल .
हि माहिती तुमी घरबसल्या मोबाईल वरून पण भरू शकता .
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 च्या अर्जाची स्थिती कशी तपासायची ?
अर्जाची स्थिती बगन्यासाठी तुमाला पुन्हा त्याच वेबसाईट वर जावे लागेल.
या मुख्यपृष्ठावर आपल्याला benefiary services चा पर्याय दिसेल.
त्यावर क्लिक केले कि apply online हा पर्याय ओपन होईल.
त्या नंतर तिथे TRACK APPLICATION STATUS च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल .
या नंतर तुमच्या समोर असे पेज ओपन होईल .
हे पेज ओपन झाले कि तुमी तुमचा ID टाकून आपल्या अर्जाची स्थिती बगू शकता .
हा लेख कसा वाटला ते नक्की कळवा .
आणि बाजूला दिसत असलेली बेल वर क्लिक करा जेणे करून नवीन येणारी माहिती तुमच्याकडे लवकर पोचेल .