Marathi story – तो एक दिवस

Marathi story – तो एक दिवस

तो एक दिवस ही कथा आहे अलोक आणि प्रिया या जोडप्याची. अलोक पेशाने इंजिनियर असतो आणि प्रियाने देखील विज्ञान शाखेतून पदवी केलेली असते. परंतु ती सध्या गृहिणी असते. दोघांच आयुष्य खूप चांगला चालू असतं. दोघांचाही एकमेकांवर खूप विश्वास असतो आणि प्रेमही. अलोक हा एका नामांकित कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत असतो त्यामुळे कामाच्या निमित्ताने तो सतत बाहेर असे. प्रिया तिच्या दोन वर्षाच्या अयान मुला सोबत दिवसभर घरी असे. या दोन वर्षांच्या मुलासह दिवसभरात असलेले काम आवरून तिचा वेळ निघून जात असे. अलोक फार लवकर ऑफिसला जायचा आणि रात्री उशिरा यायचा. अलोक कामावर यायचं त्यावेळेस अयान झोपलेला असायचा आणि रात्री देखील झोपून जायचा तरीदेखील बिचाऱ्या प्रियाने कधीच तक्रार केली नाही.

Marathi story – तो एक दिवस

प्रिया नेहमी तिच्या नवऱ्याचं कौतुक करत असे. माझा नवरा खूप चांगला आहे. निर्व्यसनी आहे, माझा नवरा कधी म्हणजे कधीच दारू पीत नाही असं ती शेजारी मैत्रिणींना सांगत असे.

एक दिवस ऑफिस मधील काही अधिकाऱ्यांनी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. मंग अलोक ला वाटलं की आपण प्रिया ला सोबत घेऊन जाऊ. मग ते तिघेही पार्टीला जातात, आपल्या नवर्‍याचं कौतुक बगून प्रियाला खूप बरं वाटतं, पार्टी खूप छान चालू असते तेवढ्यात तिथे एक वेटर ग्लास घेऊन येतो आणि म्हणतो कि हा तुमच्या आवडीचा ब्रांड सरांनी तुम्हाला द्यायला सांगितला आहे. आणि पार्टी संपल्या वर डान्स बार मध्ये यायला सांगितले. अलोक म्हणतो अरे थांब तुझा काहीतरी गैरसमज होतोय मी दारू पीत नाही.

हे सगळं बघून प्रिया खुप चिडते आजूबाजूचे सगळे जण यांच्याकडे बघू लागतात तरी प्रियाचं चालूच असतं तू मला फसवलं वगैरे वगैरे प्रिया अलोक चे काही ऐकून घेत नाही .

Marathi story – तो एक दिवस

ती बाबांना फोन करते आणि रडत रडत सगळं सांगते. त्यावर बाबा म्हणतात तरी मी म्हणालो होतो इंजिनियर असेच असतात त्यांच्याशी लग्न नको करू.

तेवढ्यात पार्टीच्या ठिकाणी एक अधिकारी येतो आणि म्हणतो की सर मीच पाठवलं होतं, तो ब्रँड आवडला का. अलोक मला विचारायचं की मी पितो कि नाही, मला न विचारता तुम्ही हे सगळं कसं ठरवलं. त्यावरून अधिकारी म्हणतो की सर सगळे घेता म्हणून मला वाटलं तुम्ही पण पीत असाल, म्हणून मी पाठवलं. अलोक म्हणतो इंजिनियर आहे म्हणजे मी पितोच असं नाही ना. आणि वाद इथेच संपतो पण हा एक दिवस त्याच्या प्रेमात आणि विश्वासात खूप मोठी दरी निर्माण करून जातो.

Marathi storyतात्पर्य:

क्षेत्र कोणतेही असो त्या क्षेत्रातील प्रत्येक जण हा दारू पितो असं नाही. त्यामुळे कोणालाही गेज करताना त्याच्याकडून पूर्णपणे माहिती घ्या आणि मगच ठरवा तो कसा आहे .

लेखक – दुर्गा बिडगर

Leave a Comment