Surrogacy meaning in Marathi | सरोगसी म्हणजे काय मराठी मध्ये?

नमस्कार मित्रानो, आज आपण या लेखात सरोगसी म्हणजे काय ते बघणार आहोत. (Surrogacy meaning in Marathi) सोबत सरोगेट आई म्हणजे काय, लोक सरोगसी का निवडतात, सरोगसी चे प्रकार, सरोगसी चा वापर कोणी करावा, सरोगेट माता कशी शोधावी, यासाठी कोणती काळजी घ्यावी या सर्व घटकांचा अभ्यास आपण या लेखात करणार आहोत. तर चला मग बघू कि सरोगसी आहे तरी काय…

Table

सरोगसी म्हणजे काय – Surrogacy meaning in Marathi

आज आपण २१ व्या शतकाच्या सुरवातीस आहोत. या काळात विज्ञान आणि वैद्यकीय विकासामुळे कुटुंब नियोजन करतानी आपण नाविन्यपूर्ण पर्याय स्वीकारले आहेत. सरोगसी म्हणजे ज्या जोडप्यांना आई – वडील होण्याची इच्चा असून पण काही तांत्रिक कारणामुळे होऊ शकत नाही. अश्या जोडप्यांसाठी सरोगेट आई म्हणजे अशी स्री जी स्वतःच्या गर्भाशयात अश्या जोडप्यासाठी बाळ वाढवते ज्यांना मुल होत्त नाही. या प्रक्रियेला सरोगसी असे म्हणतात. त्यामुळे सरोगसी ही नवीन जोडप्यांसाठी किंवा अश्या जोडप्यांसाठी वरदान ठरलेली आहे.

सरोगेट आई म्हणजे काय?

सरोगेट याचा अर्थ आहे पर्याय. तसेच सरोगेट आई म्हणजे अशी स्री जी स्वतःच्या गर्भाशयात अश्या जोडप्यासाठी बाळ वाढवते ज्यांना मुल होत्त नाही. या मध्ये ही माता आपले गर्भाशय भाड्याने देते. ज्यामुळे अश्या जोडप्यांना पालकत्वाचा आनंद घेता येतो. हे वाटते तितके सोपे नसते, परंतु हा पर्याय आज कायद्याच्या चौकटीत राहून वापरला जातोय.

विविध देशात सरोगशी हा पर्याय मोठ्या प्रमाणत वापरला जातोय. लोक मुल दत्तक घेण्या ऐवजी सरोगशीचा पर्याय निवडतात. जगातील सर्वाधिक सरोगेट माता ह्या भारतात आहे, याचे मुख्य कारण म्हणजे भारतात सरोगेट माता या कमी पैशात मिळतात. तसेच येथे कायद्याचे थितील निर्बंध असल्याचे पहावयास मिळते. यामुळे परदेशातील बरेच जोडपे भारतात सरोगसी चा पर्याय निवडतात. काही कालावधीतच भारत सरोगशी ची राजधानी बनेल यात तिळमात्र शंका नाही.

लोक सरोगसी का निवडतात?

सरोगसी पर्याय निवडण्याची बरीच कारणे आहेत. यामध्ये मुख्यत्व स्री ला गर्भधारणेस येणाऱ्या समस्या असतात. तसेच बऱ्याच स्रियांना गर्भाशयात समस्या असतात त्यामुळे अश्या स्रिया गर्भ धारण करू शकत नाहीत. तसेच काही महिलामध्ये जन्मताच गर्भाशय नसते, तर काही मध्ये आजारपणामुळे हा अवयव काढला जातो. तसेच ज्या स्रीचे जास्त वेळेस मिसकॅरेज झाले असेल अश्या स्रियांना सरोगसीचा पर्याय निवडावा लागतो.

सरोगसी चे प्रकार:

१) पारंपारिक सरोगसी

पारंपारिक सरोगसी मध्ये, सरोगेट महिला गर्भवती होण्यासाठी तिच्या स्वत: च्या अंडाशयाचा वापर करते. या पद्धती मध्ये सरोगेट मातेचा संबंध बाळ हवे असलेल्या व्यक्तीशी जाणीवपूर्वक किंवा कृतीम पद्धतीने घडून आणला जातो. या पद्धतीला पारंपारीक सरोगसी म्हणतात. या प्रकारे जोडप्यातील स्रीचा त्या बाळाशी कोणताही अनुवंशिक संबंध येत नाही. त्यामुळे असे संबंध कायद्याच्या द्रुष्टीने चुकीचे असतात. त्यामुळे जगात असे संबंध बेकायदेशीर मानले जातात.

२) जेंस्टेशनल सरोगसी

जेंस्टेशनल सरोगसी मध्ये सरोगेट माता दुसर्‍या व्यक्तीसाठी गर्भधारणा करण्यास सहमत असते . तसेच जोडप्यातील स्री तिचे स्रीबीज व तिच्या नवर्याचे शुक्राणू वापरूनआयव्हीएफ (IVF) पद्धतीने मिलन घडवून तो गर्भ सरोगेट मातेच्या गर्भाशयात सोडण्यात येतो किंवा त्या स्त्रीचे स्त्रीबीज व तिच्या नव-याचे शूक्राणू जीआयएफटी Gamete Intra-Fallopian Transfer या पद्धतीने सरोगेट मातेच्या गर्भाशयात सोडण्यात येतात. अश्या पद्धतीने सरोगेट मातेच्या गर्भाशयात गर्भधारणा होते. नऊ महिने सरोगेट माता बाळाचे तिच्या गर्भाशयात संगोपन करते. काही वेळेस मूल पाहिजे असलेल्या स्त्रीचे स्त्रीबीज वापरणे शक्य नसेल तर स्त्रीबीज दात्या कडून स्त्रीबीज घेण्यात येते. हे बाळ या महिलेबरोबर जैविक संबंध सामायिक करेल, परंतु ती बाळाची अनुवंशिक माता होउ शकत नाही. हे कायदेशीर रित्या सुद्धा योग्य असते.

सरोगसी चा वापर कोणी करावा?

अमेरिकन सोसायटी फॉर रीप्रोडक्टिव्ह मेडिसिन च्या मते, ज्या वेळेस एखाद्या जोडप्याला वैद्यकिय कारणामुळे मुल होण्यास अडचणी निर्माण होत असेल अश्या वेळेस सरोगसी करणे योग्य असते. परंतु या मध्ये काही अटी असतात.

१) गर्भाशयाच्या विसंगती किंवा गर्भाशयाची अनुपस्थिती असल्यास.

२) मुख्य वैद्यकीय परिस्थिती, ज्यामुळे गरोदरपणात आई किंवा गर्भाच्या जीवाला धोका असतो तेंव्हा.

३) मुलाला बाळगण्यात जैविक असमर्थता. उदा. समलिंगी नर जोडी किंवा एकल पुरुष.

सरोगेट माता कशी शोधावी?

बहुतेक लोक सरोगेट माता शोधताना क्लिनिक, वेबसाइट, वकील आणि खाजगी एजन्सीद्वारे शोध घेतात.

काही लोक आपल्या कुटूंबातील सदस्य हा सरोगेट माता म्हनून निवडतात.

सरोगसी मध्ये काय विचारात घ्यावे?

सरोगसीमध्ये अनेक कायदेशीर, नैतिक आणि आर्थिक बाबींचा समावेश असतो.

काही वेळेस सरोगेट मातेने बाळ देण्यास नकार दिला तर काय करावे.

सरोगेट मातेला किती पैसे द्यावेत? कारण ती पैश्या साठीच हे काम करते.

सरोगेट माता या काळात आजारी पडली तर तिची काळजी कोण घेणार.

सरोगेट माता या काळात आजारी किंवा मरण पावल्यास तिला किंवा तिच्या परिवाराला तुमी कशी मदत कराल.

यामध्ये बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या तुमी सरोगसी संदर्भात मार्गदर्शन करणाऱ्या संस्था किवा वकील यांचा सल्ला घेणे आवशक आहे.

मित्रानो Surrogacy meaning in Marathi हा लेख कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा.

आपण हे पण वाचू शकता…

१) कौमार्य म्हणजे काय?

२) व्हर्जिनिटी मिनींग इन मराठी.

३) डिप्रेशन म्हणजे काय?

4) Assets meaning in Marathi.

Leave a Comment