Refurbished म्हणजे काय मराठी मध्ये | Refurbished meaning in Marathi | नूतनीकरण केलेले उत्पादने

Table

Refurbished meaning in marathi

Refurbished meaning in Marathi – Refurbished Product काय असतात ? हे उत्पादन खरेदी करावे या नाही ? आज आपन ऑनलाइन शॉपिंग च्या इतके आधीन गेलो आहोत कि आपन कधी फसवले जातोय हे पण समजत नाही. ऑनलाइन खरेदी करताना आपल्याला Refurbished Product ची सूची बगायला मिळते. परंतु आपल्याला Refurbished Product ची माहिती नसते. तर आज मी आपणास सांगू इच्छितो कि Refurbished Product काय आहे आणि हि उत्पादने खरेदी करावे या नाही.

Refurbished उत्पादने

Refurbished चा अर्थ होतो नूतनीकरण केलेली उत्पादने. जी उत्पादने ग्राहकाकडून कोणत्या तरी कारणामुळे परत केली जातात. तसेच हि उत्पादने नूतनीकरण करून बाजारात किंवा ऑनलाईन विक्री केली जाते. अशी उत्पादने Refurbished उत्पादने म्हणून ओळखली जातात. या मध्ये Phone, Laptop, Whatch, Speeker या प्रकारे उत्पादने येतात.

Refurbished उत्पादनाच्या किमती

ही उत्पादने भले हि तुमाला कमी किमतीत मिळत असतील, परंतु या उत्पादनांची गुणवत्ता कशी आहे हे माहित नसल्याने आपण हि उत्पादने खरेदी करतांनी खूप गोंधळात असतो. बाकी उत्पादना पेक्षा ह्या उत्पादनाची किमत खूप कमी असते. नवीन मोबाईल किंवा इतर उत्पादने हि सर्वसाधारण पणे 16000 ला असेल तर Refurbished उत्पादन 10000 किमतीला मिळू शकते. पण अश्या वेळेस आपल्या मनात विचार येतो कि हि उत्पादने कमी किमतीला का मिळतात?

बरेच लोक विचार करत असतील कि Refurbished Product खराब असतील. परंतु असे काही नसते. त्यासाठी आज मी तुमाला सांगू इच्छितो कि Refurbished Product काय आहेत आणि ती चांगली असतात का. आणि या सर्व गोष्टींचा विचार करून आपण Refurbished Product खरेदी करावे नाही?

आजकाल आपण ऑनलाईन खरेदी करतो त्या मध्ये मुख्यत्वे फ्लिपकार्ट आणि अमेज़न वर जास्त खरेदी करतो. तर ह्या वेबसाईट वर Refurbished Product विकले जातात. त्यासाठी एक वेगळी सूची देखील असते. ह्या मध्ये Refurbished Product ची किमंत खूप कमी असते. तर किमत कमी का असते त्याची मुख्य कारणे खाली दिली आहे. ज्यामुळे हि उत्पादने कमी किमतीला मिळतात.

Refurbished उत्पादनाच्या किमती कमी असण्याची कारणे

  • ज्या वेळेस ग्राहका कडून हि उत्पादने पसंत नसल्याने परत केली जातात.
  • ज्या वेळेस काही उत्पादनात काही दोष निघतात.
  • तसेच काही कारणास्तव या उत्पादनाची विक्री होत नाही.

Refurbished Product हे असे उत्पादने असतात कि ज्यांची समस्या सोडून हि उत्पादने पुन्हा विक्री साठी ठेवली जातात. आणि ह्याच उत्पादनांना Refurbished Product असे बोलले जाते. आणि Refurbished Product च्या या प्रक्रियेस Refurbished असे बोलले जाते.

ही उत्पादने ऑनलाईन विकणाऱ्या कंपन्या सांगतात कि हि उत्पादने विकण्यापूवी या उत्पादनाची तीन स्तरांत चाचणी केली जाते.

१) Repaired & Restored  २) Quality Check ३) Grade आणि Repacked

या तीन चाचण्या मधून पास होणारीच उत्पादनेच विक्री साठी ठेवली जातात.

Refurbished Product ची वर्गवारी

Refurbished Product हे वेगवेगळ्या श्रेणीत विक्री साठी ठेवले जातात. ती त्यांचा अवस्थेवरून ठरवले जाते.

Grade-A – या मध्ये उत्पादने नवी असतात, परंतु ग्राहकांना पसंत न पडल्यामुळे ती परत केलेली असतात.

Grade-B – या मध्ये उत्पादने ग्राहकांकडून वापरलेली असतात आणि त्यावर काही प्रमाणात स्क्रैच पडलेले असतात.

Grade-C – या मधील उत्पादने हि कंपनी कडून नाही तर जुने उत्पादने रिपेयर करून विक्रेते लावतात.

Grade-D – या श्रेणीतील उत्पादने खूप वापरलेली असतात व त्यावर खूप प्रमाणात स्क्रैच पडलेले असतात.

Refurbished Product खरेदी करण्याचे फायदे

  • हि उत्पादने आपल्याला कमी पैशात मिळतात त्यामुळे आपली बरीच बचत होते.
  • ज्या लोकांकडे पैशांचा अभाव आहे आणि ते खरेदी करू शकत नाही असे लोक हि उत्पादने खरेदी करू शकता.
  • या उत्पादनावर नवीन उत्पादना प्रमाणे वारंटी पण दिली जाते जेणेकरून काही समस्या आल्यास ती कंपनी ला परत पाठवू शकतात.
  • या मध्ये बरेच उत्पादने नवीन उत्पादना सारखी असतात. आणि जुन्या Product पेक्षा चांगली निगतात.

Refurbished Product खरेदी करण्याचे तोटे

  • ही उत्पादने नवीन तर नसतात,आणि त्यांचा थोडा तरी वापर झालेला असतो.
  • या उत्पादनावर Accessories मिळेल कि नाही याची ग्यारंटी नसते.
  • या उत्पादांवर नवीन उत्पादना सारखी पैकिंग मिळेल कि नाही याची ग्यारंटी नसते.
  • ही उत्पादनाचा बहुतेक वेळेस कंपनीचा चा काहीच संभंद नसतो.

Refurbished Product खरेदी करावे का ?

Refurbished Product बद्दल एवढी माहिती मिळाल्या नंतर हि उत्पादने खरेदी करावी कि नाही हे आपणास समजले असणारच.

  • तुमी हि उत्पादने तेंव्हाच खरेदी करा ज्या वेळेस आपली आर्थिक परस्थिती खराब असेल.
  • तसेच या उत्पादनाची आपणास आवशक असेल तर.
  • जेंव्हा हि उत्पादने खूप चांगल्या किमतीला मिळत असतील तर.

Refurbished Product खरेदी करते वेळेस घ्यावयाची काळजी

  • ही उत्पादने 500 किंवा 1000 च्या फायद्या साठी खरेदी करू नाहीत.
  • ही उत्पादने जरी कमी किमतीला मिळत असले तरी खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.
  • आपण हि उत्पादने चांगल्या वेबसाईट मार्फत किंवा दुकानदाराकडून खरेदी करावी.
  • या उत्पादनावर वारंटी बघून खरेदी करावी.
  • परंतु या उत्पादनावर कंपनी वारंटी देतेय हे सुनिश्चित करा.
  • तसेच या उत्पादनावर मिळणारे सामान तपासून बघा.
  • या उत्पादनावर काही अटी व शर्ती असतात त्या बघून घ्या.

Refurbished Product कोठून खरेदी करावे

Amazon

या वेबसाईट वर आपणास सर्व प्रकारचे Refurbished Product उपलब्ध असतात. त्यामध्ये Phone, Laptop, Whatch, Speeker, या प्रकारची सर्व Refurbished Product उपलब्ध असतात.

Flipkart

या वेबसाईट वर पण आपणास सर्व प्रकारचे Refurbished Product उपलब्ध असतात.

Refurbished meaning in marathi हा लेख कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.

व्हर्जिनिटी म्हणजे काय ?

Leave a Comment