NGO full form in Marathi | एनजीओ फुल फॉर्म इन मराठी | एनजीओ म्हणजे काय?

नमस्कार मित्रानो, आज आपण या लेखात (NGO full form Marathi) एनजीओ म्हणजे काय ते बघणार आहोत. त्यामध्ये एनजीओ म्हणजे काय, एनजीओ बद्दल महत्त्वाचे मुद्दे, एनजीओ साठी निधी, एनजीओ सदस्यत्व, एनजीओ प्रकार आणि एनजीओ कसे कार्य करते या सर्व गोष्टी आपण यामध्ये बघणार आहोत. तर चला मग बघू तर एनजीओ आहे तरी काय….

NGO full form in English Non-Governmental Organization
NGO full form in Marathiअशासकीय संस्था
NGO full form in Hindiगैर सरकारी संगठन
NGO full form in Marathi

Table

एनजीओ म्हणजे काय?

एक गैर-सरकारी संस्था (NGO) हा एक ना-नफा या तत्वावर चालणारा गट आहे. जो कोणत्याही सरकारपासून स्वतंत्रपणे कार्य करतो. एनजीओना काहीवेळा नागरी संस्था असे पण म्हणतात. मानवतावादी कारणे किंवा पर्यावरण यासारख्या सामाजिक किंवा राजकीय ध्येयासाठी हा समुदाय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संघटित झालेला असतो, त्यांना एनजीओ असे म्हणतात.

महत्वाचे घटक:

एनजीओ किंवा गैर-सरकारी संस्था, आंतरराष्ट्रीय विकास, मदत आणि परोपकारात मोठी भूमिका बजावत असतात. एनजीओच्या व्याख्येनुसार ना-नफा या तत्वावर काम करणारी जी संघटना असते तिला एनजीओ असे म्हणतात. परंतु त्या दरवर्षी लाखो किंवा कोटी रुपयाचे बजेट चालवू शकतात. अशा प्रकारे, NGO खाजगी देणग्या सोबत सदस्यत्व देय रकमेतून आणि विविध अश्या निधी स्रोतांवर अवलंबून असतात.

एनजीओ बद्दल महत्त्वपूर्ण माहिती:

“एनजीओ” चे विविध अर्थ असले तरी, हा शब्द सामान्यतः ना-नफा, सरकारी नियंत्रणाबाहेर काम करणाऱ्या खाजगी संस्थांचा समावेश करण्यासाठी स्वीकारला जातो. काही स्वयंसेवी संस्था प्रामुख्याने स्वयंसेवकांवर अवलंबून असतात, तर काही पगारी कर्मचाऱ्यांवर अवलंबून असतात.

जागतिक बँक स्वयंसेवी संस्थांचे दोन विस्तृत गटाना ओळखते:

१) ऑपरेशनल एनजीओ, जे विकास प्रकल्पांच्या डिझाइन आणि अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करतात.

२) अडव्होकेसी एनजीओ, जे विशिष्ट कारणाचा बचाव करतात किंवा प्रचार करतात आणि सार्वजनिक धोरणावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात.

३) काही NGO एकाच वेळी दोन्ही श्रेणींमध्ये येऊ शकतात. एनजीओच्या उदाहरणांमध्ये मानवी हक्कांचे समर्थन करणार्‍या सुधारित आरोग्याचा पुरस्कार करणार्‍या किंवा राजकीय सहभागास प्रोत्साहन देणाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

स्वयंसेवी संस्थांना निधी कसा दिला जातो?:

ना-नफा म्हणून स्वयंसेवी संस्था निधीसाठी विविध स्त्रोतांवर अवलंबून असतात ते स्रोत खालील प्रमाणे…

१) सदस्यत्व फी

२) खाजगी देणग्या

३) काही वस्तू किवा सेवा विक्री करून

४) काही एनजीओ न अनुदान दिले जाते.

सरकारपासून त्यांचे स्वातंत्र्य असूनही, काही स्वयंसेवी संस्था सरकारी निधीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. मोठ्या NGO चे बजेट लाखो किंवा अब्जावधी रुपये असू शकते.

एनजीओ चे प्रकार:

वेगवेगळ्या एनजीओ मध्ये भिन्नता आढळून येते, ते खालील प्रमाणे…

१) GONGO = government-organized non-governmental organization – हि एनजीओ सरकार समर्पित म्हणून ओळखली जाते. या एनजीओ चे काम आंतरराष्ट्रीय क्षेत्रात ज्या देशाविरोधात दडपशाही केली जाते त्यांचा वतीने वकिली करण्यासाठी खासकरून स्थापन करण्यात आली आहे.

२) ENGO = environmental non-governmental organization – हि एनजीओ पर्यावरण क्षेत्रात काम करत असते. ज्याप्रमाणे ग्रीनपीस हि एनजीओ काम करते. या दोन्ही संस्था जागतिक पातळीवर काम करत असतात.

बहुचर्चित एनजीओ:

खालील काही जगप्रसिद्ध एनजीओ ची यादी दिली आहे.

१) ग्रीनपीस
२) ऍम्नेस्टी इंटरनॅशनल
३) मर्सी कॉर्प्स
४) डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स
५) आंतरराष्ट्रीय बचाव समिती
६) बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन

आज आपण (NGO full form Marathi) या लेखात बघितले कि NGO म्हणजे काय, NGO चे प्रकार, NGO चे कार्य, NGO साठी निधी आणि काही बहुचर्चित NGO. तर मग (NGO full form Marathi) हा लेख कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा.

आपण हे पण वाचू शकता..

१) Credit meaning in Marathi.

२) NDA full form in Marathi.

Leave a Comment