Mpsc books list in marathi
नमस्कार मित्रानो आज आपण या (Mpsc books list in marathi) लेखातून राज्यसेवा परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या पुस्तकांची माहिती करून घेणार आहोत. महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्याला MPSC बद्दल माहिती असते परंतु त्यांना MPSC साठी अभ्यास करण्यासाठी आवशक असलेल्या पुस्तकांची माहिती नसते. हाच विचार करून मी हा लेख लिहीत आहे.
राज्यसेवा परीक्षेची तयारी करतांनी आपणास पुस्तकांची माहिती असणे आवशक आहे. जर आपणास राज्यसेवा परीक्षेसाठी कोणती पुस्तके आवशक असतात हे जर माहित नसेल तर आपण कमी वेळात परिपूर्ण आभ्यास करू शकत नाही. पुस्तके कोणती वापरावीत आणि कोणती पुस्तके गरजेची आहे हे जर आपणास कळाले तर आपण कमी वेळात चांगली पुस्तके वापरून mpsc परीक्षेची परिपूर्ण अशी तयारी करू शकतो.
Mpsc books list in marathi – Mpsc साठी आवश्यक असलेल्या पुस्तकांची सूची पुढील प्रमाणे..
Table
राज्यसेवा पूर्व परीक्षा
इतिहास
१ ) ५ ते १२ वी पर्यंतची स्टेट बोर्डाची पुस्तके वाचावीत.
२ ) समाजसुधारक साठी ज्ञानदीप प्रकाशनाचे विपुल थोरमोटे सरांचे पुस्तक वाचावीत.
३ ) तात्याचा ठोकळा.
४ ) आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास – अनिल कठारे सरांचे पुस्तक, तसेच रंजन कोळंबे व ग्रोव्हर यांची पुस्तके वाचावित.
भूगोल
१) ६ वी ते १२ वी पर्यंतची स्टेट बोर्डाची पुस्तके. तसेच ६ वी ते १२ पर्यंतची NCRT ची पुस्तके.
२ ) A. B. सवदी यांचे महाराष्ट्राचा भूगोल हे पुस्तक खूप महत्वाचे आहे.
अर्थशास्र
१) रंजन कोळंबे सरांचे भारतीय अर्थव्यवस्था हे पुस्तक खूप महत्वाचे आहे.
२) तसेच दीपस्तंभ प्रकाशनाचे देसले सरांचे अर्थशास्त्र साठी असलेले दोन्ही पुस्तके खूप महत्वाचे आहे.
३) तसेच परिक्रमा मासिक.
राज्यशास्त्र
१) राज्यशास्त्र विषया साठी रंजन कोळंबे सरांचे पुस्तक.
२) एम लक्षुमिकांत यांचे Indian polity हे पुस्तक.
विज्ञान
विज्ञान विषयासाठी LUCENT चे GENERAL SCIENCE.
पर्यावरण
पर्यावरण विषया साठी Environment By Shankar हे पुस्तक खूप महत्वाचे आहे.
चालू घडामोडी
चालू घडामोडी या विषया साठी पृथ्वी परिक्रमा हे माषिक.
C – SAT
१) C-SAT साठी दोन पुस्तके महत्वाची आहे ती म्हणजे..
२) R. S. अग्रवाल यांचे Quantitative aptitude आणि Reasoning हि दोन्ही पुस्तके.
राज्यसेवा मुख्य परीक्षा
GS – 1 – सामान्य अध्ययन पेपर एक – इतिहास व भूगोल
इतिहास
इतिहास या विषयासाठी खालील पुस्तके रेफर करणे आवशक आहे.
१ ) ११ वी चे स्टेट बोर्डाची पुस्तके वाचणे गरजेचे आहे.
२ ) समाज सुधारक साठी ज्ञानदीप चे पुस्तक.
३ ) तसेच समाधान महाजन, कठारे व ग्रोवर या लेखकांची पुस्तके.
भूगोल
भूगोल या विषयासाठी खालील पुस्तके रेफर करणे आवशक आहे.
१ ) ६ वी ते १२ पर्यंतची स्टेट बोर्डाची पुस्तके
२ ) ३ री ते ११ वी चे NCRT चे पुस्तके.
३ ) मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी.
४ ) कृषी व भूगोल- ए. बी. सवदी
५ ) भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे.
कृषी
१ ) अरुण कात्यायन
२ ) रेड्डी आणि रेड्डी
३ ) कृषी व भूगोल- ए. बी. सवदी
रिमोट सेन्सींग
११ वी ची NCRT ची पुस्तके.
GS – 2 – सामान्य अध्ययन पेपर दोन – भारतीय संविधान व भारतीय राजकारण व कायदा
१ ) भारतीय राज्यपद्धत्ती- वि.मा. बाचल
२ ) भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत
३ ) पंचायतराज- के. सागर किवा किशोर लवटे
४ ) पंचायतराज- अर्जुन दर्शनकर
५ ) आपले संविधान आणि आपली संसद हि दोन्ही पुस्तके – सुभाष कश्यप
६ ) महाराष्ट्र शासन आणि राजकारण- बी. बी. पाटील
Gs – 3 – सामान्य अध्ययन पेपर तीन – मानव संसाधन व मानवी हक्क
१ ) मानवी हक्क- प्रशांत दीक्षित
२ ) मानवी हक्क तत्व आणि दिशाभूल- उद्धव कांबळे
३ ) मानव अधिकार- NBT प्रकाश
४ ) मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे- लिआ लेव्हिन
५ ) मानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबे
GS – 4 – सामान्य अध्ययन पेपर चार – अर्थव्यवस्था व नियोजन, विकासविषयक अर्थशास्त्र, कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान विकास
१ ) स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र १ – किरण जी. देसले
२ ) अर्थशास्त्र- देसाई भालेराव
३ ) आर्थिक संकल्पना- विनायक गोविलकर
४ ) भारत आर्थिक पाहणी अहवाल
५ ) महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल
६ ) वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक- के सागर
७) विज्ञान तंत्रज्ञान- सेठ प्रकाशन
८ ) विज्ञान घटक- स्पेक्ट्रम
९ ) विज्ञान तंत्रज्ञान- के सागर
मराठी व इंग्रजी व्याकरण
मराठी
१ ) मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
२ ) मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे
३) य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके
इंग्रजी
१ ) इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
२ ) अनिवार्य इंग्रजी- के सागर प्रकाशन
३) बाळासाहेब शिंदे संपूर्ण इंग्रजी व्याकरण
मित्रानो हा ( Mpsc books list in marathi ) लेख कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा.
आपण हे पण वाचू शकता…
२) MPSC exam age limit, educational and physical qualification.