नमस्कार मित्रानो आज आपण प्रतिजन चाचणी (Antigen test meaning in Marathi) म्हणजे काय ते बघणार आहोत.
Table
कोविड -19 ची antigen test म्हणजे काय?
कोविड -19 प्रतिजन चाचणी (antigen test) चा तोंड आणि घशातील कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव शोधून काढण्यासाठी उपयोग केला जातो. त्यामुळे ही चाचणी रुग्णाला कोविड -19 ची लागण झाली आहे किवा नाही हे ठरवण्यास मदत होते.
अँटीजेन चाचणी ही कोविड -१९ विरूद्ध योग्य वेळेस केल्यास कोविड च्या विरुद्ध लढण्यास पहिली पायरी असेल. विशेषत: ज्या व्यक्तींमध्ये कोविड लक्षणे आहेत, कारण हि अत्यंत सोपी प्रक्रिया आहे आणि इतर पध्दतींपेक्षा जलद आहे. हि चाचणी साधारणपणे १५ ते २० मिनिटात पूर्ण होते. तर पीसीआर चाचणी साठी जास्त वेळ लागतो.
हि चाचणी पीसीआर चाचणीपेक्षा हे कमी अचूक अचूक असते, परंतु कमी वेळात निदान होण्यासाठी प्रतिजन चाचणी करणे महत्वाचे असते. संक्रमणाच्या सुरुवातीच्या वेळेस कधी कधी चुकीचा निकाल येऊ शकतो.
कोविड १९ ची antigen test कशी घेतली जाते?
कोविड -19 ची antigen test साठी रुग्णाच्या नाकातील आणि घशातील नमुना घेतला जातो. या नमुन्यात लाळ किंवा रक्त देखील असू शकते. या नमुन्यावर गर्भधारणा चाचणी सारख्याच मूलभूत प्रक्रियांचा वापर करून विश्लेषण केले जाते. या नमुन्याचे विश्लेषित केल्याच्या नंतर 15 ते 30 मिनिटांच्या आत रिपोर्ट आपणास मिळतात.
कोविड -19 antigen test च्या परिणामातून काय समजू शकेल. कोविड -19 च्या प्रतिजन (antigen test) चाचणीतून तुम्हाला तीन प्रकारचे परिणाम मिळू शकतात.
१) सकारात्मक प्रतिजन चाचणी परिणाम
सकारत्मक चाचणी म्हणजे आपणास कोरोना विषाणू ची लागण असण्याची शक्यता आहे.
२) नकारात्मक प्रतिजन चाचणी परिणाम
नकारात्मक चाचणी म्हणजे आपणास कोरोना विषाणू ची लागण नसण्याची शक्यता आहे.
३) शून्य प्रतिजन चाचणी परिणाम
शून्य प्रतीजन चाचणी म्हणजे आपली चाचणी केली ती चुकीची होती किंवा कीट मधील बिघाडामुळे हि चाचणी यशस्वी झाली नाही.
बऱ्याच वेळेस प्रतिजन चाचणी इतकी वेगवान असल्याने, बर्याच प्रकरणांमध्ये दुसरी चाचणी वेगाने घेतली जाते आणि त्याचे मूल्यांकन केले जाते.
कोविड -१९ ची प्रतिजन चाचणी कोणी करावी?
सध्याच्या कोरोना व्हायरस संसर्गाचे निदान करण्यासाठी सर्वात अचूक चाचणी म्हणून ICMR (Indian Council of Medical Research) कोविड -19 ची पीसीआर चाचणीची शिफारस करते.
खालील पैकी कोणतेही लक्षण अढळल्यास प्रतिजन चाचणी (antigen test) करण्याचा विचार करावा.
कोरोना ची लक्षणे
१) ताप, कोरडा खोकला, थकवा
२) घसा खवखवणे, जुलाब होणे, डोकेदुखी, डोळे लाल होणे.
३) त्वचेवर डाग पडणे किवा पुरळ येणे, चव किवा गंध न कळणे.
४) गंभीर लक्षणा मध्ये- श्वास घेण्यास त्रास होणे, छाती दुखणे, हालचाल करता न येणे व बोलता न येणे.
या सारखे लक्षणे दिसायला लागल्यास antigen test नक्की करून घ्यावी.
मित्रानो हा (Antigen test meaning in Marathi) लेख कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा.
हे पण वाचा…