प्राचीन भारताचा इतिहास | प्राचीन भारताचा इतिहास मराठी

प्राचीन भारताचा इतिहास – इतिहासाचा विचार केला तर भारत फार प्राचीन आहे, आणि येथे विविध संस्कृतींचा जन्म झाला हे जगाने देखील मान्य केले आहे. हा देश विविधतेने परिपूर्ण आहे. कारण या ठिकाणी विभिन्न समुदायातील लोक आपल्या विविध धर्मांची संस्कृतीचे पालन करून आपला असलेला धर्मावविश्रवास ठेवतात . परंतु आपण आज ज्या देशामध्ये राहतो तो भारत भूतकाळात असा नव्हता. कारण इराण पासून इंडोनेशिया पर्यंत पसरलेला भारत एक सशक्त आणि समृद्ध असा एक खूप मोठा देश होता. कालांतराने अखंड भारत वेगवेगळ्या प्रदेशात विभागला गेला आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कल्पना व संस्कृती विकसित झाल्या. इतिहासाचा अभ्यास असे दर्शवितो की भारतात असे अनेक देश होते ज्यांनी सांस्कृतिक दृष्टया भारत एकत्र जोडला गेला होता.

तर चला आपण बघुयात ते कोणते देश होते, जे अखंड भारताचा हिस्सा होते आणि कालांतराने ते भारता पासून कसे विभक्त झाले .

Table

प्राचीन भारताचा इतिहास

१ ) इराण

प्राचीन भारताच्या इतिहासात इ.स.पू. २००० मध्ये इराणमध्ये आर्य समाजाचा उदय झाला. आर्य समाजाचा उदय पाहणारा इराण हा पहिला देश आहे. जेथे आर्य समाज उदयाला अला. आर्य हे बलुचिस्तानमार्गे इराणला पोहोचले होते . त्या वेळेस आर्य समाजाची इराणमध्ये भरभराट झाली होती , परंतु अरबांनी इराणवर आक्रमण केले आणि आर्यांची सत्ता काढून घेतली गेली . या प्रकारे आर्य सत्तेतून बाहेर पडले आणि तिथेच आर्य संकृती लोप पावली गेली . आर्य या शब्दाचा अप्भ्श होऊन या देशाचे नाव इराण पडले.

२ ) कंबोडिया

कंबोडिया जेथे कांडीयाम नावाच्या ब्राह्मनाणे पहिल्या शतकात कंबोडियात हिंदू राज्य स्थापन केले. ज्याच्या नावाने देशाचे नाव कंबोडिया ठेवले गेले होते. याच कंबोडिया देशात जगातील सर्वात मोठे भगवान विष्णूचे मंदिर आहे.

३ ) व्हिएतनाम

व्हिएतनामचे जुने नाव चंपा होते, त्याची स्थापना दुसर्‍या शतकात झाली. दुसर्‍या शतकात स्थापित, चंपा भारतीय संस्कृतीचे मुख्य केंद्र बनले होते , जिथे स्थानिक चंपा नावाच्या जमातीतील लोकांनी भारतीय संस्कृती स्वीकारली आणि तेथून हिंदू संस्कृतीचा प्रसार केला या देशात मोठ्या प्रमाणात झाला. इ. स. १८५० पावेतो या देशात हिंदू सत्ता होती. १८५० मध्ये तेथे हिंदू राज्याचा अंत झाला. आणि भारतीय वर्चस्व संपले .

४ ) मलेशिया

पहिल्या शतकात महान भारतीय लोक तिथे पोचले. आपल्या संस्कृतीचा मोठ्या प्रमाणात तेथे विकास होत गेला. तसेच त्यांनी लोकांना महान भारतिया संस्कृतीबद्दल सांगितले आणि त्यांची संस्कृती वाढविली. नंतर शैव, वैश्य आणि बौद्ध या पंताचा विकास या प्रदेशात झाला.

५ ) इंडोनेशिया

एकेकाळी इंडोनेशिया हे भारताचे समृद्ध राज्य होते. इंडोनेशियातील बाली द्वीप वर अजूनही अजूनही हिंदू चागल्या संख्येने आहेत . तेथील बरेच लोक रामाला आपले वंशज मानतात . तसेच तेथील मुस्लिम लोक अजूनही तेथील हिंदू संस्कृतीशी संबंधित आहेत.

६ ) फिलिपिन्स

फिलिपिन्समध्ये भारतीय संस्कृतीचा 15 व्या शतका परेंत प्रभाव होता. १५ व्या शतकात मुस्लिमांनी आक्रमण केले आणि हळूहळू तिथून भारतीय संस्कृतीचा प्रभाव कमी होत गेला.

७ ) अफगाणिस्तान

अफगाणिस्तान हा ३५० इ स पूर्व परेंत भारताचा अविभाज्य भाग होता. सातव्या शतकात मुस्लिमांचे आगमन झाल्यानंतर हिंदूंचा प्रभाव कमी झाला. तसेच भारताचा सांस्कृतिक प्रभाव कमी होत गेला. हळूहळू तो राजकीयदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या भारतापासून वेगळा झाला .

८ ) नेपाळ

नेपाळ जगातील एकमेव हिंदू राष्ट्र आहे, याची स्थापना १७६९ मध्ये एका गुरखा हिंदू राजाने केली.

९ ) भूतान

भूतानचे प्राचीन नाव भद्र असे होते. भारत आणि भूतान यांनी ८ ऑगस्ट १९४९ रोजी या करारावर स्वाक्षरी केली. त्याद्वारे स्वतंत्र डोंगराळ प्रदेश हा समृद्ध भूतान या देशाची ओळख बनली.

१० ) तिबेट

तिबेटचा उल्लेख आपल्या शास्त्रात तीन वेळा आला आहे. चौथ्या शतकात येथे बौद्ध धर्मचा प्रसार झाला. तिबेटचे हे क्षेत्र प्राचीन भारताच्या प्रभावाखाली होते. भारताच्या दूरदृष्टी च्या कमतरतेमुळे १९५७ मध्ये चीनने त्याचे चीनमध्ये विलीनीकरण केले.

११ ) श्रीलंका

श्रीलंक या देशाचे जुने नाव ताम्रपर्णी होते. हा भारताचा अविभाज्य भाग होता. पोर्तुगीजांनी १५०५ , १६०६ मध्ये आणि १७९५ मध्ये ब्रिटीशांनी राज्य केले. त्या नंतर १९३५ मध्ये ब्रिटीशांनी श्रीलंका भारतापासून वेगळे केले.

१२ ) म्यानमार (बर्मा)

इ. स. १८५२ पर्यंत ब्रिटिश शासन येईपर्यंत तेथे हिंदू राजा होता. हे १९३७ मध्ये म्यानमार भारतापासून वेगळे झाले.

१३ ) पाकिस्तान

१५ ऑगस्ट १९४७ पूर्वी पाकिस्तान हा भारताचा अविभाज्य भाग होता. परंतु फाळणीनंतर तो वेगळा झाला. परंतु आज हि त्या देशात भारतीय संस्कृती ची जाणीव होत असते. कारण बरेच हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली गेली . काही मंदिरांची मरणासन अवसता झाली आहे.

१४ ) बांगलादेश

अखेर १५ ऑगस्ट १९४७ पूर्वी बांगलादेश हादेखील भारताचा अविभाज्य भाग होता. १९४७ नंतर बांगलादेश पूर्व पाकिस्तान म्हणून विभक्त झाला होता . परंतु त्यानंतरही त्यांनी १९७१ मध्ये पाकिस्तान पासून बांगलादेश वेगळे झाले . या मध्ये भारताची काय भूमिका होती ते आपणास माहित असेल.

अशा प्रकारे आपण पाहिले की प्राचीन अखंड भारत कश्या रीतीने विभाजित झाला . पण भारतात नालंदा आणि तक्षशिला सारखी विदयालये होती आणि जगभरातील लोक इथे शिकायला येत असत. यावरून असे दिसून येते की भारताची संस्कृती खूप विकसित झाली होती. आजही आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटतो, आणि ती जपण्याचा प्रयत्न आपण प्रयत्न करत असतो.

प्राचीन भारताचा इतिहास हा लेख कसा वाटला ते टिपणी करून नक्की कळवा.

Leave a Comment