Table
मराठी म्हणी व त्याचे अर्थ
मराठी मध्ये म्हणी या प्रकाराला खूप महत्वपूर्ण स्थान आहे . ‘म्हणी’ म्हणजे लोकांनी वारंवार उच्चारलेले मार्मिक वाक्य होय . म्हणीमध्ये जीवनातील विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतात. ज्या मुळे म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती ‘म्हण’ होय. मानवाच्या चांगल्या वाईट प्रवृत्ती, आचार -विचार, नानाविध चालीरीती ,निरनिराळी नातीगोती इ.चे प्रतिबिंब त्यांत पडलेले असते. जगातील विविध भाषेमध्ये म्हणी आढळून येतात. स्पर्धा परीक्षांमध्ये या म्हणीना खूप महत्व देण्यात आले आहे.
१ ) हपापा चा माल गपापा – जशी येते तशी जाते .
२ ) हरामाचा माल , गाल झाले लाल – फुकटाचे मिळाले कि यथेच्छ खायचे .
३ ) हसे त्याला वाळसे – जो नेहमी हसत मुख असतो तो सदा निरोगी असतो .
४ ) हात ओला तर मित्र भला – आपल्यासाठी खर्च करणारा चांगला मित्र .
५ ) हातात कवडी, विद्या दवडी – जुगार खेळणाऱ्यांचे शिक्षणात लक्ष नसते .
६ ) अडली गाय फटके खाय – एखादी व्यक्ती अडचणीत सापडली कि तिला हैराण केले जाते .
७ ) अंथरून पाहून पाय पसरावे – आर्थिक क्षमता असेल तेवढे खर्च करणे .
८ ) पळसाला पाने तीनच – सगळीकडे परिस्थती सारखी असणे .
९ ) अधीच्या दिडी सावकाराची रूढी – आर्थिक दृष्ट्या अडचणीत असलेल्या व्यक्ती सावकाराच्या वव्हारात अडकणे .
१० ) अंग अंग म्हशी मला कुठे नेशी – चूक कबुल न करता ती चूक दुसर्याने केली असे भासवणे .
११ ) आगीतून फुफाट्यात – संकटातून सुटण्याचा प्रयत्न कर्तानी सुटका होण्या ऐवजी दुसर्या संकटात सापडणे .
१२ ) टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण येत नाही – खूप परिश्रम , संघर्ष केल्या शिवाय मोठेपण येत नाही .
१३ ) अल्प बुद्धी बहु गर्वी – कमी बुद्धि असलेल्या व्यक्तीस गर्व जास्त असणे .
१४ ) अळी मिळी गुप चिळी – विशीष्ट रहस्य सर्वाना समजू नये या साठी सबंधीत व्यक्तीने गप्प राहणे .
१५ ) ओठात एक पोटात एक – खोटे गोड बोलले तरी मनात वाईट भावना असणे .
१६ ) आतीशहाना त्याचा बैल रिकामा – मुर्क व्यक्ती स्वताला खूप शहाना समजते , तिच्या हातून कोणतेही काम ठीक होत नाही .
१७ ) जीवावरचे शेपटावर निभावणे – प्राणघातक संकटातून थोडक्यात वाचणे .
१८ ) अंत्यकाळा पेक्षा मध्यन्ह काळ कठीण – मृतुच्या वेदनेपेक्षा भुकेची तळमळ अधिक वेदनादायी .
१९ ) अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या प्रसंगी मूर्ख व्यक्तीचे नाईलाजाने कौतुक करावे लागते .
२० ) आयत्या बिळात नागोबा – एखाद्या व्यक्तीने केलेल्या कामची दुसऱ्या व्यक्तीने फायदा घेणे .
मराठी म्हणी व त्याचे अर्थ
२१ ) आपले दात आपले ओठ – खूप जवळच्या व्यक्तीची चूक असल्यास त्याविरुद्ध सगळ्या समोर बोलता येत नाही .
२२ ) अति तेथे माती – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यामुळे नुकसान होते .
२३ ) प्रयत्नांती परमेश्वर – अत्यंत कठीण गोष्ट खूप प्रयत्ना नंतर साध्य होणे .
२४ ) बोलेल तो न्याय – इच्छेविरोधात निर्णय असला तरी तो मान्य करावा लागतो .
२५ ) आपला हात जगनाथ – आपली प्रगती स्वताच्या प्रयत्नानेच होते .
२६ ) कानात बुगडी गावात फुगडी – श्रीमंतीचे प्रदर्शन करणारी व्यक्ती .
२७ ) झाकली मुठ सव्वा लाखाची – गप्प राहून स्वताची लाज राखणे .
२८ ) हातच्या काकणाला आरसा कशाला – एखादी गोष्ट प्रत्येक्ष समोर असताना पुराव्याची गरज नसते .
२९ ) फार झाले हसू आले – एखादी गोष्ट मर्यादेपेक्षा सतत केल्याने हास्यास्पद होऊ शकते .
३० ) आचार भ्रष्टी सदा कष्टी – ज्याची कृत्य वाईट असतात तो नेहमी दुःखी असतो .
३१ ) आधीचे तारे आणि त्यात शिरले वारे – एखाद्या मूर्ख व्यक्तीला आणखी मूर्खपणा करण्यासाठी काहीतरी कारण मिळणे .
३२ ) अन्नछत्री जेऊन मिरपूड मागणे – लाचारसारखे जगत असून मिजास दाखवणे .
३३ ) आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास – आळशी व्यक्तीला काम न करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणे .
३४ ) आईचा काळ बायकोचा मवाळ – आई कडे दूरलक्ष करणारा परंतु बायको ची काळजी घेणारा माणूस .
३५ ) अन्नाचा मारलेला खाली पाही नि तलवारीचा मारलेला वर पाहिली – एखाद्या व्यक्तीला मदत केल्यास ती व्यक्ती विनम्रपणे वागते, परंतु दृष्ट्पणाने वागल्यास ती व्यक्ती शत्रू बनते .
३६ ) आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मी – आधी विचार बिघडतात मग परस्थिती.
३७ ) नाव मोठे लक्षन खोटे – वरवरून देखावा केला तरी प्रत्यक्ष परिस्थिती त्याउलट म्हणजे तसे काहीच नसणे.
३८ ) पाची बोटे सारखी नसतात – सर्व माणसाचे स्वभाव सारखे नसतात.
३९ ) आई ची माया अन पोर जाईल वाया – मुलाचे खूप लाड केले तर मुलं बिगडतात.
४० ) अर्थिदान महापुण्य – गरजू व्यक्तींना दान केल्याने त्याचे पुण्य मिळते.
मराठी म्हणी व त्याचे अर्थ
४१ ) आलीय भोगाशी असावे सादर – जे नशिबात असेल ते भोगण्यास तयार राहावे.
४२ ) पाचामुकी परमेश्वर – बहुसंख्य लोक जे मत व्यक्त करतात ते मत सर्वसाधारणपणे विवेकी व नितीनियामाने असते अशी समजूत.
४३ ) अचाट खाणे मसणात जाने – खाण्यापिण्याचा अतिरेक केल्यास त्याचा प्रकृती वर वाईट परिणाम होतो.
४४ ) आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी – विशस्त परिस्थितीत मदत आवशक असताना दुसरीकडे मदत केली जाते.
४५ ) कामा पुरता मामा – जेव्हा गरज असते तेंव्हाच गोड बोलणे.
४६ ) पायाची वहाण पायातच बरी – एखाद्या व्यक्तीला त्याच्या योग्यते इतके महत्व द्यावे.जास्त महत्व देऊ नये.
४७) आडातला बेडूक समुद्राच्या गोष्टी सांगणे – कमी क्षमता असलेली व्यक्ती मोठेपणाच्या बाता करणे.
४८ ) आधी शिदोरी मग जेजुरी – आधी जेवण केले कि मग देवाचे दर्शन घेणे.
४९ ) आयत्या बिळात नागोबा – एखाद्या व्यक्तीने केलेल्या कामची दुसऱ्या व्यक्तीने फायदा घेणे .
५० ) असंगाशी संग प्राणाशी गाठ – दृष्ट व्यक्तीच्या सानिध्यात जीव गमावण्याचा धोका.
५१ ) आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते – एखादी व्यक्ती कष्ट करते , पन त्या कष्टाचा दुसरी व्यक्ती फायदा घेते.
५२ ) पाय धु तर म्हणे तोडे केवड्याचे – एखाद्या व्यक्तीला काम करायला सांगितले तर ते काम करण्याऐवजी तो निरर्थक चौकशी करतो.
५३ ) अंधारात चोरास बळ – अनुकूल वातावरण असल्यास बळ येते.
५४ ) असतील शिते तर दिसतील भुते – आर्थिक फायदा होण्याच्या अपेक्षेने श्रीमंत लोकांच्या संपर्कात राहणे.
५५ ) आई जेउ घालेना बाप भिक मागू देईना – दोन वेगवेगळ्या बाजूनी अडवणूक केली जाते अशी परीस्थिती निर्माण होणे.
५६) पालथ्या घड्यावर पाणी – एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट शिकवली किंवा उपदेश केलास त्याचा काहीच उपयोग न होणे.
५७ ) असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा – चांगली परीस्थिती असतानी चैन करणे. मात्र वाईट परीस्थिती आली कि उपाशी मरणे.
५८ ) आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार – जी गोष्ट अस्तित्वात नाही ती मिळणे शक्य नाही.
५९ ) आईजीच्या जीवावर बाईजी उदार – दुसऱ्याचे पैसे खर्च करून औदार्य दाखवणे.
६० ) कोणाची म्हैस कोणाला उठबैस – काम एकाचे आणि त्याचा त्रास दुसऱ्याला होणे.
६१ ) फुटका डोळा काजळाने साजरा करावा – दोष नाहीसा करणे शक्य नसल्यास त्याचा चांगला उपयोग करून घेणे.
६२ ) सुठे वाचून खोकला जाणे – कोणती त्रासदायक गोष्ट उपयाविना नाहीशी होणे.
६३ ) असंगाशी संग प्राणाशी गाठ – द्रुष्ट व्यक्तीच्या संगतीमुळे प्राण जाण्याची भीती निर्माण होणे.
६४ ) कानाला ठणका आणि नाकाला औषद – रोग इकीकडे आणि उपचार दुसरी कडे करणे.
६५) फुलाचा वास भुंग्याला चिखल बेडकाला – नशीबा प्रमाणे किंवा कर्मा प्रमाणे चांगले वाईट परिणाम प्राप्त होणे.
६६ ) लहान तोंडी मोठा घास घेणे – स्वतःच्या योग्यतेस न शोभल असे वागणे किंवा मोठ्या व्यक्तीशी उद्धत पणे वागणे.
६७ ) आवळा देऊन कोहळा काढणे – क्षुल्लक गोष्टीच्या मोबदल्यात मोठा फायदा करून घेणे.
६८ ) ताकास तूर लागू न देणे – इखाद्या गोष्टीची दुसर्याला अजिबात माहिती न देता ती गोष्ट गुप्तपणे करणे.
६९ ) भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी – एखाद्या व्यक्तीला मदत केली असता त्याने त्याचा गैरफायदा घेणे.
७० ) काशीत काशिदास मथुरेत मथुरादास – त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीशी जुळून घेणे.
७१ ) जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी – ज्या व्यक्ती पासून काही फायदा होत असेल अशा व्यक्तीची लोक खुशामत करतात.