भारतात किती राज्य आहेत | भारतात एकूण किती घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत

Table

भारतात किती राज्य आहेत

नमस्कार विध्यार्थी मित्रानो आज आपण बघणार अहोत कि भारतात आजच्या तारखेला एकून किती राज्य आहेत. भारत स्वातंत्र झाल्यापासून वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळी राज्ये अस्तित्वात आली. वेगवेगळी राज्य स्थापन करण्या मागील मुख्य उदेश म्हणजे भाषावार प्रांतरचना होय.

भाषावार प्रांतरचना आयोगाची स्थापना १० डिसेंबर १९५३ रोजी फाजल आली यांच्या नेतृत्वा खाली झाली. या आयोगाने इतर दोन सदस्य होते त्यामध्ये एक सरदार के . एम . पन्नीकर व दुसरे पंडित हृदयनाथ कुंझरू हे होते.

या आयोगाने ३० सप्टेंबर १९५५ रोजी केंद सरकारकडे आपला २६७ पानांचा अहवाल सादर केला. या अहवाला नुसार या आयोगाने भाषिक प्रांतरचनेस अनुकुलता दर्शवली होती.

हा अहवाल १४ डिसेंबर १९५५ रोजी लोकसभेत मांडला गेला. त्यानंतर हा अहवाल ३१ ऑगस्ट १९५६ रोजी लोकसभेत मंजूर केला गेला. तसेच हा अहवाल १ नोव्हेंबर १९५६ पासून अमलात आणला गेला.

फाजल अली कमिशन ने सुरवातीला १४ राज्य आणि ६ केंद्रशासित प्रदेश निर्माण केले होते.

आजच्या घडीला भारतात २८ घटकराज्य व ८ केंद्रशासित प्रदेश आहेत.

क्रमांकराज्यराजधानीस्थापना
आंध्र प्रदेशअमरावती१ ऑक्टो. १९५३
2आसामगुवाहाटी१ नोव्हें.   १९५६
3बिहारपाटणा१ नोव्हें.   १९५६
4कर्नाटकबेंगलोर१ नोव्हें.   १९५६
5केरळतिरुवनंतपूरम१ नोव्हें.   १९५६
6मध्य प्रदेशभोपाळ१ नोव्हें.   १९५६
7ओडिशा  भुवनेश्वर१ नोव्हें.   १९५६
8राजस्थानजयपूर१ नोव्हें.   १९५६
9तमिळनाडूचेन्नई१ नोव्हें.   १९५६
10उत्तर प्रदेशलखनऊ१ नोव्हें.   १९५६
11पश्चिम बंगालकोलकाता१ नोव्हें.   १९५६
12महाराष्ट्रमुंबई१ मे १९६०
13गुजरातगांधीनगर१ मे १९६०
14नागालँडकोहिमा१ डिसेंबर १९६३
15पंजाब चंदिगढ१ नोव्हें.  १९६६
16हरियाणाचंदिगढ१ नोव्हें.  १९६६
17हिमाचल प्रदेशशिमला२५ जाने. १९७१
18मेघालयशिलॉंग२१ जाने. १९७२
19मणिपूरइंफाळ२१ जाने. १९७२
20त्रिपुराआगरतला२१ जाने. १९७२
21सिक्किमगंगटोक२६ एप्रिल  १९७५
22अरुणाचल प्रदेशइटानगर२० फेब्रु.   १९८७
23मिझोरामऐझवाल२० फेब्रु.   १९८७
24गोवापणजी३०  मे      १९८७
25छत्तीसगडरायपूर१   नोव्हें.   २०००
26उत्तरांचलडेहराडून९   नोव्हें.   २०००
27झारखंडरांची१५ नोव्हें.   २०००
28तेलंगणाहैद्राबाद२  जून     २०१४
भारतातील एकून राज्य

भारतातील आठ केंद्रशासित प्रदेश

अंदमान आणि निकोबार 
चंदीगड 
दादरा नगर हवेली आणि दीव दमण 
दिल्ली 
जम्मू काश्मीर 
लडाख 
लक्षद्वीप 
पुदुचेरी
भारतातील आठ केंद्रशासित प्रदेश

आपण हे पण वाचू शकता…

१) भारत में कुल कितने राज्य हैं?

२) Bharat me kul kitne rajya hai?

Leave a Comment