जालियनवाला बाग हत्याकांड १३ एप्रिल १९१९

जालियनवाला बाग हत्याकांड

जालियनवाला बाग हत्याकांड १३ एप्रिल १९१९ रोजी पंजाब, मधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळील जालियनवाला बाग येथे घडले.असे मानले जाते की या घटनेने ब्रिटिश सत्तेच्या अंताची सुरूवात झाली. १९९७ मध्ये राणी एलिझाबेथ यांनी या स्मारकाच्या ठिकाणी मृतांना श्रद्धांजली वाहिली.

१३ एप्रिल १९१९ बैसाखी सणाच्या दिवशी अमृतसर येथील जालियनवाला बागेत एक सभा आयोजित केली गेली होती. उपस्थित असलेले बहुतांश लोक ग्रामीण भागातून आलेले होते. सरकारने शहरात घातलेली संचार बंदीची माहिती लोकांना नव्हती. लोक १० एप्रिल ला सत्याग्रहीवर झालेल्या गोळीबाराचा आणि डॉक्टर सत्यपाल व डॉ किचलू यांना पंजाब मधून हद्दपार केल्याचा निषेध करत होते.

या सभेचे आयोजन करणे म्हणजे सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे होईल. असे जनरल डायरला वाटले म्हणून त्यांनी संपूर्ण बागेला सशस्त्र सैनिकांचा वेढा दिला. कोणतीही पूर्वसूचना न देता सैनिकांना गोळीबार करण्याचा आदेश दिला. सैनिकांच्या बंदुकीतील गोळ्या संपेपर्यंत लोकांवर बेछूट गोळीबार चालू होता. बागेतून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग सैनिकांनी अडवून धरले होते. सभेत सहभागी झालेल्या निर्दोष लोकांची चाळणी झाली होती. सुमारे एक हजार लोक मारले गेले. यामध्ये युवक, स्त्रिया,वृद्ध आणि बालकांचा समावेश होता.

जालियनवाला बाग हत्याकांड झाल्संयामुळे पूर्ण देश सुन्न झाला होता . या घटनेमुळे देशाने मौन धारण केले होते. संपूर्ण देशात या हत्याकांडाची निर्भत्सना करण्यात आली. या घटनेला चा विरोध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या नाईहुड या पदवीचा त्याग केला. शंकर राम नागर यांनी व्हाइसरॉयच्या कार्यकारणीचा राजीनामा दिला. अनेक ठिकाणी सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गाचा त्याग करून हिंसेचा मार्ग स्वीकारला.

यामुळे १८ एप्रिल १९१९ रोजी गांधीजींनी सत्याग्रह समाप्तीची घोषणा केली. कारण त्यांच्या सत्याग्रह मध्ये हिंसेला कोणतेही स्थान नव्हते. सरकारने गुन्हेगारांना दंडित करण्याऐवजी त्यांची बाजू घेतली आणि जनरल डायरचा सत्कार करण्यात आला.

सरकारने १९ ऑक्टोबर १९१९ रोजी लॉर्ड हंटरच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन केली. त्यात तीन भारतीयांचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्येच सर चिमणलाल सेटलवाड, साहबजादा सुलतान अहमद आणि जगत नारायण, या हंटर कमिटी ने जालियनवाला बाग हत्याकांडात ३७९ भारतीय लोक मरण पावले असल्याचे सांगितले, तर महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समितीने पंडित मदन मोहन मालवीय, मोतीलाल नेहरू या हत्याकांडात पंधराशे होऊन अधिक लोक मरण पावल्याचे सांगितले.