डिमॅट अकाउंट | डिमॅट अकाउंट म्हणजे काय | डिमॅट खाते माहिती मराठी | डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे | Demat account meaning in marathi | Information of Demat account in Marathi

डिमॅट अकाउंट म्हणजे काय

सेबीने बनवलेल्या नियमांनुसार जर तुम्हाला स्टॉक मार्केटमधून शेअर खरेदी करायचे असेल किंवा विकायचे असेल तर तुमच्याकडे डिमॅट खाते असने आवश्यक आहे. शेअर डिमॅट खात्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे विकले किंवा खरेदी केले जाऊ शकत नाही. याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला भारतातील स्टॉक मार्केटमधून शेअर खरेदी करावे किंवा विकत घ्यायचे असतील तर डिमॅट खाते असणे अनिवार्य आहे. तसेच तुम्हाला IPO साठी अर्ज करायचा असला तरीही डिमॅट खाते असणे खूप महत्वाचे आहे. डिमॅट खाते हे कोणत्याही सामान्य बँक खात्या प्रमाणे कार्य करते. येथे सुद्धा तुमची बँक शिल्लक पास-बुकमध्ये नोद केली जाऊ शकते. परंतु हे खाते आपण ते भौतिक स्वरूपात ठेवू शकत नाही. हे खाते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सुरक्षित केले गेलेले असते. या खात्या मध्ये देवाण घेवाण हि इतर बँक खात्या प्रमाणे पार पाडली जाते.

जर आपण डिमॅट खाते उघडले तर आपण आपले शेअर्स त्या खात्यात ठेऊ शकता आणि ते शेअर्स इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सुरक्षित केले जातात, त्यास डिमॅट खाते असे म्हणतात.

आपण येथे क्लिक करून शेअर मार्केट चे खाते उघडू शकता .

Table

डिमॅट खात्याची ओळख

डिमॅट खाते उघडण्याच्या वेळी, अर्जदाराची वैयक्तिक वैरिफिकेशन (आयपीव्ही – इन-पर्सन वैरिफिकेशन) विभागाकडून मान्य असते. डीपी कर्मचार्‍यास अकाउंट ओपनिंग फॉर्ममध्ये संलग्न असलेले छायाचित्र तसेच संबंधित व्यक्तीची ओळख पटवून अर्जदारयाची ओळख स्थापित करावी लागेल. संयुक्त खाते असल्यास खात्यातील सर्व धारकांसाठी आयपीव्ही करण्याचा नियम आहे.

डीमॅट खात्या विषयी जाणून घेणे खूप महत्वाचे असते. आजच्या काळात ब्रोकिंग सेवा देणाऱ्या बऱ्याच संस्था असतात. त्यामध्ये अनेक वित्तीय आणि बँकिंग संस्थांकडून डिमॅट सेवा दिल्या पुरवल्या जातात. डिपॉझिटरी सेवा प्रदान करणार्‍या संस्था डिपॉझिटरी पार्टनर म्हणून सभोदल्या जातात. या मध्ये डिपॉझिटरी पार्टनर म्हणून एनएसडीएल / सीएसडीएल व गुंतवणूकदार यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करतात.

हे खाते उघडण्यासाठी गुंतवणूकदारांना सेबीच्या नोंदणीकृत डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) सह डिमॅट खाते उघडण्याची आवश्यकता असते. डिमॅट खाते उघडण्यासाठी गुंतवणूकदाराने खाते उघडण्याचे फॉर्म, ओळखपत्राचा पुरावा, पत्त्याचा पुरावा भरण्यासह सेबीकडे मंजूर कागदपत्रे सादर करावी लागतात. खाते उघडताना पॅनकार्ड व अर्जदारांची मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी आवश्यक असतात.

डिपॉझिटरी पार्टिसिपंट कडून कराराची प्रत आणि शुल्काचे पत्रकही गुंतवणूकदारांना मिळते. खाते उघडण्याच्या कागदपत्रांवर प्रक्रिया केल्यानंतर, डिपॉझिटरी पार्टिसिपंट अर्जदारास खाते क्रमांक (क्लायंट आयडी) प्रदान करतात. एकदा डीपी कडून अर्जदाराचे खाते उघडल्यानंतर, अर्जदार ग्राहक बनतो जो लाभार्थी म्हणून ओळखला जातो. त्याला दिलेला खाते क्रमांक हा बीओ-आयडी – बनेफिशियरी ऑनर आइडेंटिफिकेशन म्हणून ओळखला जातो.

डिमॅट खाते उघडतानी काही महत्वपूर्ण गोष्टी जाणून घेणे महत्वाचे असते. हि एक वित्तीय सेवा आहे जी ब्रोकर तुमाला पुरवत असतात. खाते उघडतानी डिमॅट खात्याशी संबंधित अनेक प्रकारचे शुल्कही असतात हि माहिती जाणून घेणे महत्वाचे असते . यामध्ये दलाल निवडताना विशेष लक्ष दिले पाहिजे. खाते उघडण्याचे शुल्क आणि दलाली शुल्क या व्यतिरिक्त व्यवहार शुल्कदेखील विचारात घेतले पाहिजे.

आपण येथे क्लिक करून शेअर मार्केट चे खाते उघडू शकता .

डिमॅट अकाउंट शुल्क

डिमॅट खाते उघडण्यासाठी तुम्हाला काही फी भरावी लागते . ही फी प्रामुख्याने तीन भागात विभागली गेलेली असते.

१ ) वार्षिक देखभाल शुल्क – वार्षिक देखभाल ठेवण्यासाठी शुल्क आकारले जाते.

२ ) कस्टोडियन फी – कस्टोडियन फी भागधारकांना बाजारात होणारया अवैध कामकाजापासून वाचवण्यासाठी ही फी आकारली जाते.

३ ) व्यवहार शुल्क – काही डिपॉझिटरी प्रत्येक व्यवहारासाठी सुस्पष्ट शुल्क घेतात तर काही कमीतकमी रकमेच्या अधीन असलेल्या व्यवहार मूल्यामध्ये फी घेतात. व्यवहाराच्या प्रकारानुसार (खरेदी किंवा विक्री) फी देखील वेगवेगळी असते.

ही डीमॅट खाते फी कर्ज सिक्युरिटीज आणि खात्यावर मासिक आधारावर आकारली जाते. याव्यतिरिक्त, डीपी शेअर्सचे प्रत्यक्ष स्वरूपात किंवा उलट रूपांतर करण्यासाठी फी देखील आकारते. डिमॅट आणि त्या विपरीत या दोन्ही विनंत्यांसाठी शुल्क वेगवेगळे असू शकते. डिमॅटसाठी काही डिपॉझिटरी एका प्रमाणपत्रासाठी व्हेरिएबल फीसह एक-वेळ शुल्क आकारतात, तर इतर केवळ व्हेरिएबल फी आकारतात.

डिमॅट खात्या साठी महत्वाची कागदपत्रे

१ ) पॅन कार्ड २ ) मतदार ओळखपत्र ३ ) पासपोर्ट ४ ) ड्रायव्हिंग लायसन्स ५ ) बँक सत्यापन ६ ) आयटी रिटर्न्स ७ ) वीज / लँडलाईन फोन बिल ८ ) अर्जदाराने खाते उघडण्याच्या फॉर्मसह पासपोर्ट आकाराचा फोटो देखील सादर करणे आवश्यक आहे.

नवीन डिमॅट खाते उघडणे अता खूप सोपे झाले आहे. आपन ५ ते १० मिनिटात ऑनलाईन पद्धतीने खाते उघडू शकतात. त्याच प्रमाणे बरेक ब्रोकर त्यांचे मोबाईल अप्लीकेशन पुरवतात.

आपण येथे क्लिक करून शेअर मार्केट चे खाते उघडू शकता .

डीमॅट खात्याचे फायदे

यापूर्वी शेअर्स खरेदी – विक्री करणे अवघड होते. त्यावेळेस विषम संख्येचे शेअर्स विकता येत नवते. पण आता तसे नाही आपण अगदी १ शेअर्स पुन विकू शकता किंवा घेऊ शकता.

शेअर्सची ट्रेडिंग पद्धत

डिमॅट खात्या व्यतिरिक्त, हे देखील जाणून घ्या की आपल्या देशात दोन डिपॉझिटरीज आहेत – नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ( NSDL ) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड ( CDSL ), ज्याद्वारे विविध ग्राहकांकडून शेअर्सचे व्यवहार केले जातात.

आपण येथे क्लिक करून शेअर मार्केट चे खाते उघडू शकता .

Leave a Comment