IND vs ENG tisra odi : तिसऱ्या वनडेत एक-दोन नव्हे, तब्बल पाच बदलांची शक्यता
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना उद्या, 12 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेच्या निकालाच्या दृष्टीने हा सामना केवळ औपचारिकता असेल, कारण भारताने आधीच पहिली दोन सामने जिंकून अपराजेय आघाडी घेतली आहे.
तथापि, आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या तयारीच्या पार्श्वभूमीवर हा सामना महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे, कर्णधार रोहित शर्मा संघातील राखीव खेळाडूंना संधी देऊ शकतो.
संभाव्य बदल आणि नव्या खेळाडूंना संधी:
सध्याच्या वनडे मालिकेत काही भारतीय खेळाडूंना अद्याप खेळण्याची संधी मिळालेली नाही. काहींनी पहिला सामना खेळला असला, तरी दुसऱ्या सामन्यात त्यांना विश्रांती देण्यात आली. आता तिसऱ्या सामन्यात प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याची शक्यता आहे, ज्यामुळे संघाच्या अंतिम अकरामध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
गिल, अय्यर आणि अक्षर पटेलला विश्रांती?
शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी पहिल्या दोन सामन्यांत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना तिसऱ्या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते. गिलच्या जागी यशस्वी जयस्वाल पुनरागमन करू शकतो, तर अय्यरच्या अनुपस्थितीत मधल्या फळीतील फलंदाजीसाठी केएल राहुलला बढती मिळू शकते. ऋषभ पंतलाही या सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकते.
गोलंदाजीत मोठे बदल?
जर अक्षर पटेलला विश्रांती देण्यात आली, तर वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान मिळू शकते. तसेच, अतिरिक्त फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये हर्षित राणा किंवा मोहम्मद शमी यांच्यापैकी एकाला विश्रांती दिली जाऊ शकते आणि त्यांच्या जागी अर्शदीप सिंगला अंतिम संघात स्थान मिळू शकते.
भारताची संभाव्य प्लेइंग XI (तिसरा वनडे)
रोहित शर्मा (कर्णधार)
यशस्वी जयस्वाल
विराट कोहली
ऋषभ पंत
केएल राहुल (विकेटकीपर)
हार्दिक पंड्या
वॉशिंग्टन सुंदर
हर्षित राणा/मोहम्मद शमी
अर्शदीप सिंग
वरुण चक्रवर्ती
कुलदीप यादव
IND vs ENG tisra odi : या बदलांमुळे भारताचा तिसऱ्या सामन्यासाठी संघ अधिक संतुलित होऊ शकतो आणि नव्या खेळाडूंना मोठ्या स्पर्धांसाठी स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल.
हे पण वाचा..