संजय गांधी निराधार योजना | संजय गांधी निराधार योजना फॉर्म online

संजय गांधी निराधार योजना

संजय गांधी निराधार पेन्शन योजना महाराष्ट्र सरकार द्वारा राबवली जाणारी महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा उद्देश महाराष्ट्र राज्यातील निराधार व्यक्तींना आर्थिक मदत करणे.

या योजनेचे क्षेत्र: महाराष्ट्र राज्य

निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठी आजार, घटस्फोटीत स्त्रिया, दुर्लक्षित महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त स्त्रिया, अत्याचारी महिला, ट्रान्झेंडर इत्यादींना आर्थिक मदत करणे.

संजय गांधी निराधार योजने साठी पात्रता :

या योजनेचा फायदा घेण्यासाठी साधारणपणे वयाची पात्रता हि ६५ वर्ष ठेवण्यात आली आहे. त्यापेक्षा कमी वयाची लोक अपात्र ठरतात. तसेच त्या कुटुंबाचे उत्पन्न प्रतिवर्षी रुपये २१,०००/- पर्यंत मर्यादित असले पाहिजे.

या योजनेचा कोण लाभ घेऊ शकतो

या योजने अंतर्गत राज्यातील निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठी आजार असलेले , घटस्फोट झालेल्या स्त्रिया, दुर्लक्षित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या स्त्रिया, अत्याचारात पिडीत असलेल्या महिला, ट्रान्झेंडर इत्यादी. या सारखे समाजातील उपेक्षित लोक या योजनेचा फायदा घेऊ शकतात. तसेच ते सविस्तर पणे खाली दिले आहे.

१ ) अपंगातील अस्थीव्यंग, अंध, मूकबधिर, मतिमंद, कर्णबधिर इ. प्रयार्गतील स्त्री व पुरुष, किव्वा.

२ ) क्षय रोग , पक्षवात, कर्करोग, एड्स, कुष्ट रोग, सिकलसेल व सामाजिक आरोग्य विभागाने ठरवलेले दुर्धर आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे स्त्री व पुरुष.

३ ) निराधार पुरुष/महिला/तृतीयपंथी, निराधार विधवा, घटस्फोट झालेला परंतु पोटगी न मिळालेला किव्वा योजनेखाली विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणाऱ्या महिला, देवदासी, अत्याचारित महिला व वैश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला.

४ ) आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न या योजनेखालील विहित केलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असल्यास ते कुटुंब.

संजय गांधी निराधार योजनेचे फायदे

प्रत्येक लाभार्थीस दरमहा ६०० / – आणि एकापेक्षा अधिक लाभार्थी असलेल्या कुटुंबाला दरमहा 900 रुपये मिळतील. लाभार्थींना त्याच्या / तिच्या मुलांना २५ वर्षांचा होईपर्यंत किंवा ज्याला पहिल्यांदा येऊ दिले जाते त्यानुसार लाभ दिला जाईल. जर लाभार्थीकडे फक्त मुलीच असतील, तर ते २५ वर्षांचे होतील किंवा विवाहित असतील तरच ते कायम राहील.

संजय गांधी निराधार योजने साठी अर्ज कसा करावा

संजय गांधी निराधार योजनेसाठी काही दस्तऐवज आवशक असतात ते खालील प्रमाणे.

१ ) विहित नमुन्यात अर्ज

२ ) निवास प्रमाणपत्र

३ ) वयाचे प्रमाणपत्र

४ ) दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या उत्पन्नाचा दाखला / पुरावा

५ ) सिव्हिल सर्जन आणि सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक द्वारे जारी करण्यात आलेल्या अपात्रता किंवा दुर्धर रोगाचे प्रमाणपत्र.

संजय गांधी निराधार योजने साठी संपर्क – तहसिलदार, संजय गांधी योजना संबंधित तालुका

संजय गांधी निराधार योजना फॉर्म ONLINE PDF

Leave a Comment