होम रूल लीग मराठी माहिती | होम रूल चळवळ माहिती मराठी

नमस्कार मित्रानो, आज आपण होम रूल लीग या लेखातून होम रूल लीग आणि होम रूल चळवळ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्यामध्ये होम रूल लीग ची स्थापना, होम रूल चळवळ आणि होम रूल लीग मध्ये अ‍ॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Table

होम रूल लीग माहिती:

विसाव्या शतकात, आयरलँडच्या लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी होम रूल लीग चळवळ सुरू केली. त्या आधारे भारतात चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यामध्ये लोकमान्य टिळक आणि अ‍ॅनी बेझंट यांनी विसाव्या शतकाच्या सुरूवातीस होम रूल लीग चळवळ सुरू केली. इ.स. १९१६ मध्ये मंडाले कारागृहातून लोकमान्य टिळकांची सुटका झाल्यानंतर पुण्यात इंडियन होमरुल लीग ची स्थापना करण्यात आली. त्याच वर्षी मद्रासमध्ये अ‍ॅनी बेझंटने इंडियन होमरल लीगची स्थापना केली.

डिसेंबर १९१४ च्या कॉंग्रेसच्या अधिवेशनात जहालवाद्यांना प्रवेश मिळाला नाही. पण १११६ च्या लखनो अधिवेशनात टिळक आणि अ‍ॅनी बेझंटच्या प्रयत्नातून अधिवेशनात प्रवेश केला . स्थानिक पातळीवर कॉंग्रेसला १९११ पर्यंत समित्या सुरू करता आल्या नाहीत. तसेच त्याच वेळी लोकांना शिक्षित करण्याची योजना राबविली जाऊ शकली नाही. कॉंग्रेसचे हे मवाळवादी धोरण लक्षात घेता टिळक आणि अ‍ॅनी बेझंट यांनी त्यांच्या होम रूल चळवळीच्या हालचाली सुरू केल्या. टिळक आणि अ‍ॅनी बेझंट यांनी आपले कार्य क्षेत्र त्यांच्या जवळील वेगवेगळे क्षेत्र निवडले. लोकमान्य टिळकांच्या चळवळीचा कार्यक्षेत्र हे महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि बरार होते, तर उर्वरित अ‍ॅनी बेझंट यांच्या अखत्यारीत होते.

होम रूल लीग स्थापन करण्याचा उद्देश:

१) देशातील राष्ट्रवादी राजकीय आंदोलन पुन्हा सुरु करणे. भारतात स्वशासानाच्या स्थापनेची जोरदार मागणी, स्थानिक पातळीवर कॉंग्रेस समित्यांचे पुनरुज्जीवन, प्रादेशिक भाषा आणि शिक्षणावर जोर देणे, जेणेकरून स्वराज्याची मागणी प्रादेशिक स्तरावर प्रभावीपणे मांडली जाईल. देशातील जास्तीत जास्त लोकांना कॉंग्रेसचे सदस्यत्व देणे . चांगल्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी कॉंग्रेसच्या रूपाने एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण.

2) 1907 मध्ये सूरत येथील कॉंग्रेसच्या अधिवेशनात जहाल आणि मवाळवादी दोन गटात विभागले गेले. टिळकांच्या तुरूंगवासामुळे आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी इंग्रजांसोबत पूरक भूमिका घेतल्याने कॉंग्रेस मरणासन्न अवस्तेच्या मार्गावर होती. कॉंग्रेसमधील या मतभेदांचा पुरेपूर फायदा ब्रिटिशांनी घेतला. ते कॉंग्रेसच्या मवाळ लोकांचा वापर जहाल नेत्यांवर दबाव आणण्यासाठी करीत होते. जहाल लोकांना असे वाटले की ब्रिटिश राजवटीला मदत करणारे मवाळवादी लोकांची फसवणूक करीत आहेत.

३ ) मंडाले कारागृहात सहा वर्षांच्या तुरूंगवासानंतर भारतात परतलेल्या टिळकांनी पहिल्यांदाच जहाल लोकांना कॉंग्रेसमध्ये स्थान देण्यावर भर देण्यावर लक्ष केंद्रित केले. तुरूंगात असताना त्यांच्या असे समजले की जहाल व मवाळ यांच्या संघर्शाचा ब्रिटीश लोक पूर्ण फायदा घेत आहेत. यामुळे कॉंग्रेसमध्ये फुट झाल्यामुळे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा उत्साह कमी होत आहे. इ स १९१६ मध्ये जेव्हा ते पुन्हा कॉंग्रेसमध्ये परत आले तेव्हा टिळकांचे प्रयत्न यशस्वी झाले. कॉंग्रेसमध्ये परतल्यानंतर टिळकांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यलढ्याची लढाई सुरू केली आणि त्यासाठी त्यांनी होम रूल लीगची स्थापना केली.

४ ) टिळक आणि अ‍ॅनी बेझंट यांचे काम करण्याचे मार्ग उत्तम होते. त्यांनी शहरांमध्ये वादविवाद आणि संवादांचे आयोजन केले आणि ग्रंथालये स्थापन केली, लोकांना या परीचर्चेत अधिकाधिक सहभागी होण्यासाठी उद्युक्त केले जात होते. या चर्चेमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर वादविवाद होत असत. या वाचनालयात राष्ट्रीय परिपत्रके ठेवली जात असत.

५ ) लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी, स्वातंत्र्यलढ्यासाठी विविध कार्यक्रमांचा आणि ब्रिटिश सरकारच्या अन्याई धोरणांचा तपशील या लोकांच्या माध्यमातून लिहिला जात असे. तसेच लीगचे कार्यकर्ते व्याख्याने देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत असत. नेत्यांनी राष्ट्रीय स्वराज्य चळवळीत लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी व्याख्याने देण्यासाठी वेळोवेळी भेट दिली.

टिळकाचे होम रूल आंदोलन:

  • टिळकांनी मार्च १९१६ मध्ये अ‍ॅनी बेझंट च्या अगोदर होम रुल लीगची स्थापना केली. एप्रिल १९१६ मध्ये बेळगाव येथे आयोजित मुंबई प्रादेशिक परिषदेत या आंदोलनास प्रारंभ झाला. टिळकांनी महाराष्ट्रातील जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी आपल्या चळवळीची स्थापना केली असे म्हणतात.
  • टिळक लीगच्या सहा शाखा होत्या. या सहा शाखां महाराष्ट्र, मुंबई शहर, कर्नाटक आणि मध्य प्रदेश प्रत्येकी एक आणि बरार येथे दोन शाखा होत्या. टिळकांनी मराठीत सहा आणि इंग्रजीत दोन पत्रके प्रकाशित केले त्यापैकी 47 हजार प्रती विकल्या गेल्या. हे पत्रक कन्नड आणि गुजराती भाषांमध्येही प्रदर्शित केले गेले.
  • टिळकांनी महाराष्ट्रात जाऊन विविध ठिकाणी भाषणे दिली. आपल्या भाषणात त्यांनी लोकांना होमरूल च्या मागण्यांविषयी माहिती सांगितली. या दौर्‍यामुळे टिळकानच्या लीगला लोकांचा पाठिंबा मिळाला आणि हळूहळू त्यांच्या हालचालींना वेग आला..
  • होमरूल चळवळ त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते असे ब्रिटिश सरकारला जेव्हा वाटले तेव्हा त्यांनी टिळकांना सुरक्षा म्हणून ६०००० रुपये जमा करण्याचे आदेश दिले आणि पैसे जमा न केल्यास एका वर्षासाठी या व्यवहारावर बंदी घालण्याची धमकी दिली. परंतु, या प्रकरणात, 1916 मध्ये हायकोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. याचा फायदा घेत टिळकांनी होम रुल लीगची प्रचार केला.
  • एप्रिल १९१७ पर्यंत टिळकांच्या लीगचे सदस्यत्व महाराष्ट्र आणि कर्नाटकपुरते मर्यादित होते. टिळकांच्या चळवळीबद्दल असे म्हटले जाते की ती ब्राह्मणवादी चळवळ होती परंतु असे म्हणणे चुकीचे आहे. कारण टिळकांच्या चळवळीत ब्राह्मणेतर व्यापारी, मराठे व गुजराती व इतर लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होते. आरोप करण्यापूर्वी हे लक्षात घेतले पाहिजे की टिळकांनी स्वतः असे म्हटले होते की जर त्यांनी शिवाशिवावर विश्वास ठेवला तर मी त्याला देव मानणार नाही. टिळकांनी मराठा वृत्तपत्रातूनही या लीगची जाहिरात केली.

ॲनी बेझंट यांचे होम रूल आंदोलन:

  • १ ) अ‍ॅनी बेझंट ही आयरिश महिला होती ज्यांना आयर्लंडप्रमाणेच भारतात होम रुल लीग चालवायची इच्छा होती. लिगच्या स्थापनेपूर्वी तिने थिओसोफिकल सोसायटीच्या माध्यमातून भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. १९०७ ते १९१५ या काळात कॉंग्रेसवरही त्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. १९१५ मध्ये, जाहलवाद्याना कॉंग्रेसमध्ये सामील होण्यात अ‍ॅनी बेझंट यांची मुख्य भूमिका होती.
  • २ ) अ‍ॅनी बेझंट यांनी सप्टेंबर १९१६ मध्ये लीगची घोषणा केली. त्या सोबत इंडिया आणि कॉमनविल च्या माध्यमातून त्यांनी लीगच्या कार्याची सुरवात केली. अ‍ॅनी बेझंटची लीग थिओसॉफिकल सोसायटीच्या संपर्कांवर आधारित होती. अ‍ॅनी बेझंटची चळवळ प्रामुख्याने मद्रास शहर आणि तामिळ बाम्हन, सिंधचे अमिल हिंदू अल्पसंख्याकांमध्ये प्रसिद्ध होती. थिओसॉफिकल सोसायटी ने प्राचीन हिंदू ज्ञान आणि थोड्याशा सामाजिक सुधारणेसह व वैभवाचा सिद्धांता वर आधारित होती. राजकारणाचा अद्याप या क्षेत्रात प्रवेश झालेला नव्हता. अरुंडेल, सीपी रामास्वामी अय्यर आणि बी.पी. वाडिया अंडयार मधे अ‍ॅनी बेझंटचे मुख्य सहकारी होते. या लीगमध्ये अलाहाबादचे नेहरू, कलकत्ताचे सीबी चक्रवर्ती आणि जे. बनरजी यांचा समावेश होता. अ‍ॅनी बेझंटच्या लीगला मावळ वाद्यांचे योगदान मिळाले होते.
  • ३ ) काही जहाल नेते कॉंग्रेसच्या कारभारावर नाराज होते. गोखले यांच्या सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीने लीगला पूर्ण पाठिंबा दर्शविला. या लीगचे स्वरूप अखिल भारतीय होते. नव्या प्रदेशात, नव्या गटांत आणि नव्या पिढ्यांमध्ये एकप्रकारे राष्ट्रवादी कार्यक्रमाच्या प्रसाराचे लीगने समर्थन केले. या लीगमुळे,अशा समाजातील मोठ्या संख्येने सुशिक्षित लोक सामील झाले, ज्यांना सांस्कृतिक सुधारणांवरसुद्धा लवलेश हि नवता . अ‍ॅनी बेझंटच्या लीगमधील कोणतेही तीनही लोक एकत्र येऊन लीगची नवीन शाखा स्थापन करण्याची योजना देखील होती. अ‍ॅनी बेझंटची लीग टिळकांपेक्षा कमकुवत होती, कारण लीगचे संघटन कमकुवत होते.

राष्ट्रीय आंदोलनात होम रूल लीग ची भूमिका:

पंडित जवाहरलाल नेहरू, सेठ जमनादास द्वारकादास आणि इंदूलाल याज्ञिक यांच्यासह होम रूल चळवळीचा प्रभाव असलेले तरुण भारतीय राजकारणातही सक्रिय होते. लीगच्या नेत्यांनी कामगार संघटनेप्रमाणेच लीगचे कामकाज चालवण्याचा प्रयत्न केला आणि तोच प्रयत्न मद्रासमध्ये बीपी वडीया यांनी केला. या लीगमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, सिद्ध, मद्रास, मध्य प्रदेश आणि आंदोलनात बरार सारख्या अनेक प्रदेशाचा समावेश केला होता. पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीगने भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणारी एक नवीन पिढी तयार केली. या आंदोलनाचे यश पाहून ब्रिटीश सरकारने आपले धोरण बदलले होते आणि आता भारतीय स्वातंत्र्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यास घाबरत होते.

होम रूल चळवळ कमकुवत पडण्याची कारणे:

होम लीग चळवळीच्या यशाने ब्रिटिश सरकार हादरले. म्हणून त्यांनी हे आंदोलन दडपण्याचा निर्णय घेतला. सरकारने अ‍ॅनी बेझंट आणि टिळकांच्या हालचालीवर लक्ष केंद्रित करण्यास सुरवात केली. त्यांनी टिळकांना आपले राजकीय कार्य थांबवण्याचे आदेश दिले. २० ऑगस्ट, १९१७ रोजी भारतीय सचिव मांटेग्यू-चेम्सफोर्ड यांनी जाहीर केले की हळूहळू राज्यकारभार भारतीयांच्या ताब्यात देण्यात येईल. यामुळे होम रूल लीग चळवळ कमकुवत झाली. मवाळवादयानि आपला पाठिंबा मागे घेतला. 1918 मध्ये लीगची चळवळ शांत झाली. १९१८ च्या उत्तरार्धात होमरुल लीगचे नेते बाळ गंगाधर टिळक ब्रिटेन येथे गेले आणि त्यांनी भारतीय अशांतता लेखक व्हॅलेंटाईन चिरॉल यांच्याविरूद्ध मानहानीचा दावा दाखल केला. इंग्लंडला गेल्यामुळे लीग कमकुवत झाली. हा काळ चळवळीसाठी महत्वाचा होता. त्यानंतर जुलै १९१८ मध्ये सुधार योजना प्रकाशित झाली आणि कॉंग्रेसचे दोन गट झाले, एक पाठिंबा देणारा आणि एक या योजनेला विरोध करणारा. अ‍ॅनी बेझंट या दोन्ही गटांच्या नेत्यांना पाठिंबा देण्यास किंवा विरोध दर्शविण्याच्या मूडमध्ये नव्हत्या. टिळकांनी या योजनेचा तीव्र विरोध केला परंतु नंतर ते इंग्लंडला रवाना झाले. टिळक परदेशात आणि अ‍ॅनी बेझंटची अवस्था दोलायमान झाल्यास लीग संपुष्टात आली.

आपण हे पण वाचू शकता…

१) शिवाजी महाराजांची माहिती.

२) संत तुकाराम यांची माहिती.

३) अमेरिकन राज्यक्रांती मराठी मध्ये.

Leave a Comment