महाराष्ट्रातील जिल्हे व विभाग | Maharashtratil Jilhe v vibhag

नमस्कार मित्रानो, आज आपण या लेखात महाराष्ट्रातील जिल्हे आणि महाराष्ट्रातील विभाग याबद्दल सविस्तररीत्या माहिती समजून घेऊ. महाराष्ट्रात सध्या ३६ जिल्हे अस्तित्वात आहे.

Table

महाराष्ट्रातील जिल्हे Maharashtratil Jilhe

महाराष्ट्रातील जिल्हेमहाराष्ट्र राज्यातील जिल्यांचा विचार करण्याआधी महाराष्ट्र राज्य कसे अस्तित्वात आले ते आपण बघूया. भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर राज्य निर्मिती साठी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली होती . या पुनर्रचना प्रक्रियेत भाषावार प्रांतरचनेच्या विचाराचे वर्चस्व होते. तरी पण मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पावित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. अखेर १ मे, १९६० ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली.

महाराष्ट्रातील प्रादेशिक विभाग

महाराष्ट्रातील खालील सहा प्रादेशिक विभागात ३६ जिल्हांची विभागणी करण्यात आली आहे.

१ ) औरंगाबाद विभाग – १ ) औरंगाबाद २ ) बीड ३ ) जालना ४ ) उस्मानाबाद ५ ) परभणी ६ ) लातूर ७ ) नांदेड ८ ) हिंगोली

२ ) कोकण विभाग – १ ) मुंबई शहर २ ) मुंबई उपनगर ३ ) ठाणे ४ ) पालघर ५ ) रायगड ६ ) रत्नागिरी ७ ) सिंधुदुर्ग

३ ) नागपूर विभाग – १ ) नागपूर २ ) वर्धा ३ ) भंडारा ४ ) गोंदिया ५ ) गडचिरोली ६ ) चंद्रपूर

४ ) नागपूर विभाग – १ ) अकोला २ ) अमरावती ३ ) बुलढाणा ४ ) यवतमाळ ५ ) वाशीम

५ ) नाशिक विभाग – १ ) नाशिक २ ) धुळे ३ ) नंदुरबार ४ ) अहमदनगर ५ ) जळगाव

६ ) पुणे विभाग – १ ) पुणे २ ) सातारा ३ ) सांगली ४ ) सोलापूर ५ ) कोल्हापूर

महाराष्ट्रातील एकून जिल्हे:

महाराष्ट्रात सध्या ३६ जिल्हे अस्तित्वात असून राज्य निर्मिती वेळी असलेल्नंया २६ जिल्ह्यांमध्ये अधिक १० जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

1मुंबई शहर19वर्धा
2मुंबई उपनगर20भंडारा
3ठाणे21गोंदिया
4पालघर22गडचिरोली
5रायगड23चंद्रपूर
6रत्नागिरी24औरंगाबाद
7सिंधुदुर्ग25बीड
8नाशिक26जालना
9धुळे27 उस्मानाबाद
10नंदुरबार28परभणी
11अहमदनगर29लातूर
12जळगाव30नांदेड
13पुणे31हिंगोली
14सातारा32अमरावती
15सांगली33बुलढाणा
16सोलापूर34यवतमाळ
17कोल्हापूर35वाशीम
18अकोला36नागपूर
Maharashtratil Jilhe

महाराष्ट्रा राज्य निर्मिती नंतर अस्तित्वात आलेले जिल्हे:

1सिंधुदुर्ग – रत्नागिरी पासून 6वाशिम – अकोला पासून
2जालना – औरंगाबाद पासून7नंदुरबार – धुळे पासून
3लातूर – उस्मानाबाद पासून8हिंगोली – परभणी पासून
4गडचिरोली – चंद्रपूर पासून9गोंदिया – भंडारा पासून
5मुंबई उपनगर – बृह न्मुंबई पासून10पालघर – ठाणे पासून
Maharashtratil Jilhe

मित्रानो महारष्ट्रातील जिल्हे व विभाग हा लेख कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा.

आपण हे पण वाचू शकता.

१) भारतातील राज्य व राजधानी.

२) भारतातील सर्वात मोठे धरण.

Leave a Comment